অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पलायनकोट्टाई

पलायनकोट्टाई

पालमकोटा. तमिळनाडू राज्याच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक, व्यापारी व शौक्षणिक केंद्र. लोकसंख्या ७०,०७० (१९७१). तिरुनेलवेलीच्या पूर्वेस सु. ४ किमी. वरील हे शहर ताम्रप्रर्णी नदीकाठी वसले असून, दक्षिण लोहमार्गावरील  व मद्रास–कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. येथे १८६६ साली नगरपालिकेची स्थापना झाली. हे ख्रिस्ती मिशनचे द. भारतातील मुख्य केंद्र आहे. येथे खिस्ती शाळा, तीन खिस्ती महाविद्यालयांपैकी एक मुलींचे महाविद्यालय, मदुराई विद्यापीठाला जोडलेले हिंदूंचे मानव्य महाविद्यालय इ. शैक्षणिक सोयी आहेत. कापड व ताडी ही याच्या आसमंतातील प्रमुख उत्पादने होत. आल्हाददायी हवामानामुळे पलायनकोट्टाई हे पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनले आहे.

 

 

लेखक- चौधरी,वसंत

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate