অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रूमानिया

रूमानिया

सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ रूमानिया. यूरोपातील नवनिर्मित स्वतंत्र देशांपैकी एक देश. यूरोपच्या आग्नेय भागातील या देशाचा विस्तार ४३३७' उ.ते ४८१५' उ. अक्षांश व २०१५' पू. ते २९४१' पू. रेखांश यांदरम्यान आहे. सर्वसामान्यपणे गोलाकार असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २,३७,५०० चौ.किमी. असून लोकसंख्या २,२७,२४,८३६ (१९८६) होती.

देशाची पूर्व –पश्चिम लांबी ७८९ किमी. व उत्तर- दक्षिण रुंदी ४७५ किमी. आहे. उत्तरेस व ईशान्येस रशिया, पूर्वेस काळा समुद्रा, दक्षिणेस बल्गेरिया, नैऋत्येस यूगोस्लाव्हिया, पश्चिमेस हंगेरी यांनी हा देश सीमित झालेला असून याला एकूण ३,१९० किमी. लांबीची (पैकी १९० किमी. सागरी) सरहद्द लाभली आहे. बूकारेस्ट (लोकसंख्या १९,६१,१८९–१९८४) ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन

भूरचनेच्या दृष्टीने पर्वतरांगा, टेकड्या व पठारे, मैदाने असे देशाचे प्रमुख तीन भाग पाडता येतात. या भूविशेषांनी देशाचा सर्वसाधारणपणे समसमान भाग व्यापलेला आहे. सुमारे ३३% भागात पर्वतरांगा असून येथील रांगा मध्यम उंचीच्या व कमी उताराच्या दिसून येतात.

कार्पेथियन ही देशातील प्रमुख पर्वतरांग असून तिचे ईस्टर्न कार्पेथियन, ट्रान्सिल्व्हेनियन आल्प्स व वेस्टर्न कार्पेथियन (आपूशने पर्वत) असे तीन भाग करण्यात येतात. या सर्व रांगा कमानीच्या आकारात पसरलेल्या असून खनिज संपत्ती, कुरणे,पर्यटनस्थळे, वीजनिर्मिती इत्यादींमुळे देशाच्या आर्थिक विकासात महत्वाच्या ठरल्या आहेत.

ईस्टर्न कार्पेथियन ही कार्पाती ओरिएंटलीया स्थानिक नावाने ओळखली जाणारी मालिका देशाच्या पूर्व भागात उत्तर-दक्षिण पसरलेल्या व एकमेकीस समांतर रांगांची बनलेली आहे. ती उत्तरेस रशियाच्या सरहद्दीपासून दक्षिणेस प्रारवॉव्हा नदीखोऱ्यापर्यंत (देशाचा मध्यभाग) पसरलेली असून तिची सरासरी उंची १,००० मी. आणि रूंदी ९७ किमी. आहे. उत्तरेकडील प्येट्रॉस (२,३०५ मी.) हे या मालिकेतील उंच शिखर आहे.

मालिकेतील मध्यभागी असलेली रांग कठीण व स्फटिकी खडकांची बनलेली असून या भागातून वाहणाऱ्या नद्यांनी अनेक खोल आणि अरूंद घळ्यांची निर्मिती केलेली आढळते. पश्चिमेकडील रांग ज्वालामुखीजन्य खडकांची बनलेली असून तीत अनेक शंकू व ग्रीवा आढळतात. सेंट ॲना हे देशातील एकमेव ज्वालामुखी सरोवर याच भागात आहे. हा प्रदेश खनिजसमृद्ध असून या भागात अनेक उष्णोदकाची कुंडे आणि आरोग्यधामे आहेत.

ट्रान्सिव्ल्व्हेनियन आल्प्सचा (सदर्न कार्पेथियन) विस्तार पूर्वेस प्राखॉव्हा नदीखोऱ्यापासून पश्चिमेस टीमीश व सेर्ना नद्यांच्या खोऱ्यापर्यंत सु. ३७० किमी. आहे. ही रांग पूर्णपणे ज्वालामुखीजन्य स्फटिकी खडकांची बनलेली असून मॉल्डॉव्हानुल (२,५४४ मी.) हे देशातील सर्वात उंच, तर नेगोई (२,५३५ मी.), ओमू (२,५०५मी.) इ. अन्य उंच शिखरेही याच रांगेत आहेत. या रांगेतील अनेक भूमंच कुरणांसाठी प्रसिध्दी आहेत; तर उंच डोंगराळ भागात हिमनद्यांपासून बनलेली निसर्गसुंदर सरोवरे, दक्षिण उतारावर बीस्त्रीत्सा,सेर्ना इ. नद्यांनी चुनखडकांमध्ये निर्माण केलेल्या अनेक गुहा हे या रांगेचे वैशिष्ट्य व आकर्षण समजले जाते.

वेस्टर्न कार्पेथियन रांग सु. ८८ किमी. लांब व ६४ किमी. रूंद असून ती देशाच्या पश्चिम भागात उत्तरेस करश नदी व दक्षिणेस मुरेश नदी यांदरम्यान उत्तर–दक्षिण दिशेने पसरलेली आहे. या रांगेतील बीखॉर (१,८५० मी.) हे सर्वोच्च शिखर असून हाही प्रदेश खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. याचा मंटी मेटॅलिसी हा भाग गोल्ड स्वेम्हणून ओळखला जातो.

ट्रान्सिल्व्हेनिया हा देशातील सर्वात मोठा पठारी भाग असून सस पासून सु. ३६६ मी. उंचीचा आहे. ईस्टर्न कार्पेथियन रांगेचे पश्चिम खोरे व ट्रान्सिव्हेनियन आल्प्सचे उत्तर खोरे यांचा या पठारी प्रदेशात समावेश होतो. हा प्रदेश मिथेन वायू व खनिज मीठ यांच्या उत्पादनांसाठी महत्वाचा आहे. देशाच्या पूर्व भागात मॉल्डेव्हियन पठारी प्रदेश असून त्याचा विस्तार कार्पेथियन पर्वतरांगेच्या पूर्वेस प्रुट नदीपर्यंत आहे.

सुमारे ४८६ मी. ते ६१० मी. उंचीच्या या प्रदेशात ट्रान्सिल्व्हेनियन पठारी प्रदेशापेक्षा वस्तीचे मान कमी आहे. दोब्रूज टेबललँड हा प्राचीन खडकांची मोठ्या प्रमाणात झीज होऊन बनलेला प्रदेश देशाच्या आग्नेय भागात असून त्याची सस पासून उंची सु. २५० मी. ते ४६० मी. आहे. या भागात काही टेकड्याही आढळतात. 

येथील बहुतेक मैदाने देशाच्या दक्षिण व पश्चिम भागातं आहेत. एकोणिसाव्या शतकापासून होणाऱ्‍यादेशाच्या आर्थिक विकासात या मैदानांचा मोठा वाटा आहे. देशाचा दक्षिण भाग डॅन्यूब मैदानाने व्यापलेला असून त्याचा पूर्व भाग (ऑल्ट नदीच्या पूर्वेकडील) रूमानियन प्लेनव पश्चिमेकडील भाग ऑल्टेनियन प्लेटोया नावाने ओळखला जातो. हा संपूर्ण प्रदेश लोएस व काळ्या चेर्नोसेम मृदेने व्यापलेला असून शेतीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो. याच भागात दक्षिण सरहद्दीवर डॅन्यूब नदीची पूरमैदानेही मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली दिसून येतात. देशाच्या आग्नेय कोपऱ्याचा उत्तर भाग डॅन्यूब नदीचे त्रिभूज प्रदेश व दलदलीयुक्त असून त्याने सु . ४,५३० चौ.किमी. क्षेत्र व्यापले आहे.

पूर्वीचा हा समुद्रव्याप्त भाग, प्रागैतिहासिक काळात निर्माण झालेल्या वाळूच्या बांधामुळे समुद्रापासून वेगळा झाला व नदीच्या गाळाने भरून आला आहे. देशातील एकूण मासेमारीच्या सु. ५०% मासेमारी येथील नद्यांतून होते. आग्नेय भागातील काळ्यासमुद्राची किनारपट्टी उत्तम प्रकारच्या पुळणी व सरोवरे यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे असून काही खनिजेही सापडतात.

द्या

देशातील बहुतेक नद्या डॅन्यूबच्या उपनद्या आहेत. त्या देशाच्या मध्य भागातील डोंगररांगांत उगम पावून पश्चिमेस, दक्षिणेस व पूर्वेस वाहत जाऊन डॅन्यूबला मिळतात. त्यामुळे डॅन्यूब नदीतून काळ्या समुद्राला मिळणाऱ्या पाण्यापैकी जवळजवळ ४०% पाणी येथील नद्याद्वारे पुरविले जाते. डॅन्यूब ही देशाच्या दक्षिण सरहद्दीवरून पश्चिम-पूर्व दिशेने वाहणारी प्रमुख नदी असून ती कीलीया, स्फंतू ग्यॉर्गे आणि सुलीना या प्रमुख तीन मुखांनी काळ्या समुद्राला मिळते.

मुखाकडील भागात या नदीने मोठे त्रिभूज प्रदेश निर्माण केले आहेत. ही नदी देशाच्या नैर्ऋत्य सरहद्दीवरील सु. ३.२ किमी. लांबीच्या ‘आयर्न गेट’ या प्रसिद्ध निदरीतून वाहते. डॅन्यूब नौसुलभ असून सागरगामी मोठी जहाजे या नदीतून ब्राईला शहरापर्यंत येतात. अंतर्भागातही अनेक ठिकाणी या नदीतून वाहतूक केली जाते.

डॅन्यूब शिवाय प्रुट ही देशाच्या पूर्व सरहद्दीवरून उत्तर-दक्षिण दिशेने वाहणारी नदी जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्वाची आहे. ऱ्येनी शहराजवळ ती डॅन्यूब नदीला मिळते. हिचा मुखाकडील सु. ११० किमी.चा प्रवाह नौसुलभ आहे. याशिवाय देशातील मुरेश, ऑल्ट, सीरेट, यालॉमीत्सा, सॉमेश इ. अन्य महत्वाच्या नद्या आहेत. बहुतेक सर्व नद्यांपासून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करणे शक्य आहे.

भूप्रदेश

भूरचनेनुसार जरी देशाचे प्रमुख तीन विभाग पडत असले, तरी इतिहासकाळापासून आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने देशाचे ट्रान्सिल्व्हेनिया, बूकव्हीना,मॉल्डेव्हिया, बालेकिया, बनात व दोब्रूज अशा एकूण सहा भूप्रदेशांमध्ये विभाजन केले जाते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/14/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate