অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सातारा संस्थान

सातारा संस्थान

सातारा संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्र राज्यातील एक संस्थान. त्यात तासगाव सोडून १८८५ मध्ये अस्तित्वात असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रदेशाचा अंतर्भाव होता. शिवाय सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील उपविभाग आणि विजापूर शहरासह त्या जिल्ह्याचा काही भाग त्यात अंतर्भूत होता. दक्षिणेस कृष्णा-वारणा आणि उत्तरेस नीरा-भीमा या नद्या, पश्चिमेस सह्याद्री घाट आणि पूर्वेस पंढरपूर व विजापूर यांनी सीमित हे संस्थान होते. संस्थानचे क्षेत्रफळ सु. ८,४१० चौ. किमी. असून लोकसंख्या १,६२,००० (१८२१) होती आणि उत्पन्न सु. तीन लाख सालिना तनखारूपाने ठरविण्यात येऊन वार्षिक सु. १५ लाखांचा प्रदेश संस्थानाधिपतीस देण्यात आला (१८२१).

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. ⇨छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली.

अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्रमी माणसे निवडून राज्यविस्तार केला. याकामी त्यांना ⇨बाळाजी विश्वनाथ, ⇨पहिला बाजीराव व ⇨बाळाजी बाजीराव हे कर्तबगार पेशवे आणि ⇨कान्होजी आंग्रे, ⇨रघूजीभोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले.

दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी; तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली; तथापि मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता.

म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी केली, तेव्हा सय्यद हुसेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला. त्या सोबत बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रूवारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणिरफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले.

सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या.त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंनास्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंचे बंधू मदनसिंग, मातोश्री येसूबाई यांची सुटकाकरण्यात आली; परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छ. संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपलानव्हता.

निजामाच्या मदतीने संभाजींनी शाहूंविरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीरावयाने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपतीअसून चौथ व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले. त्यानंतर संभाजी व शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजीवारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली. कोल्हापूर–सातारा अशी मराठी राज्याची दोन स्वतंत्र संस्थाने (छत्रपतींच्या गाद्या) उभयता मान्य करण्यात आली; तथापि कोल्हापूर व सातारा यांत आपापसांत पुढेअनेक वर्षे संघर्ष चालू होता.

शाहूंना पुत्रसंतती नव्हती; म्हणून त्यांनी महाराणी ताराबाई यांचा नातू रामराजा यांना दत्तक घेण्याचेठरविले आणि मृत्यूपूर्वी राज्यकारभार-विषयक सर्व अधिकार आज्ञापत्राद्वारे पेशवे बाळाजी बाजीराव यांना दिले. शाहूंच्यानिधनानंतर (१७४९) रामराजे (कार. १७४९–७७) विधिवत सातारच्या गादीवर आले; पेशवे व रामराजे यांत २५ सप्टेंबर १७५० रोजीसांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले.

बाळाजी बाजीरावांनी त्यांनासालिना ६५ लाख रुपये नेमणूक करून दिली. रामराजे पेशव्यांच्या कच्छपि जात आहेत, हे पाहून ताराबाईंनी संधी साधून रामराजांनाकैद केली (१७५५), तेव्हा बाळाजी बाजीरावांनी ताराबाईंशी समझोता केला, त्यामुळे प्रत्यक्षात ताराबाई राज्यकारभार पाहू लागल्याआणि रामराजांना फारसे अधिकार उरले नाहीत. पुढे ताराबाईंच्या मृत्यूनंतर (१७६१) जवळपासचा थोडाबहुत प्रदेश, इंदापूरची देशमुखीएवढाच मर्यादित अधिकार छत्रपतींना राहिला होता. तत्पूर्वीच मराठ्यांच्या सत्तेचे केंद्र पुणे होऊन प्रायः पेशवे मराठी राज्याचेसूत्रधार-सर्वेसर्वा झाले.

रामराजांच्या अखेरच्या दिवसांत त्यांना संतती नसल्यामुळे सखाराम बापू बोकील व नाना फडणीस यांनी वावी येथील विठोजी भोसलेयांच्या शाखेतील त्र्यंबकराजे यांचे ज्येष्ठ पुत्र विठोजी यांस १५ सप्टेंबर १७७७ रोजी विधिपूर्वक दत्तक घेऊन त्यांचे नाव धाकटेशाहूराजे ठेवले. रामराजे ९ डिसेंबर १७७७ रोजी मरण पावले. त्यानंतर ११ डिसेंबर १७७८ रोजी शाहूंना राज्याभिषेक झाला. त्यासपरशुराम व चतुरसिंग हे दोन भाऊ होते. राज्याभिषेकानंतर वडील त्र्यंबकजी व चतुरसिंग सातारच्या किल्ल्यात राहण्यास आले; परंतुबंधू परशुराम हे मात्र वावी येथेच राहत असत.

सवाई माधवराव पेशव्यांच्या वेळी (१७७४–९५) सर्व ठीक चालले, पण त्यांच्या मृत्यूनंतरशाहूंची स्थिती सर्व दृष्टींनी नाजूक झाली. चतुरसिंग यांना छत्रपतींचा बंदिवास व अपमानकारक प्रसंग सहन न होऊन पेशव्यांविरुद्घबंड करण्यास ते उद्युक्त झाले. ते धाडसी, पराक्रमी व हुशार होते. त्यांनी छत्रपतींचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी मराठे सरदारांनाएकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि कोल्हापूरच्या संस्थानिकांच्या सहकार्याने उठाव केला (१८०९). तो रास्ते व परशुरामभाऊपटवर्धनांनी साताऱ्यावर आक्रमण करून मोडून काढला. दुसऱ्या बाजीरावाने त्यांना कैद करून रायगडजवळच्या कांगोरी किल्ल्यातठेवले. तिथेच त्यांचे १५ ऑगस्ट १८१८ रोजी निधन झाले.

शाहू छत्रपतींना चार राण्या होत्या. त्यांपैकी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब याकर्तबगार, बुद्घिमान व व्यवहारदक्ष होत्या. त्या घोड्यावर बसण्यात पटाईत होत्या. त्यांच्या पोटी शाहूंना प्रतापसिंह ऊर्फ बुवासाहेब,रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब व शहाजी ऊर्फ आप्पासाहेब हे तीन मुलगे झाले. दुसरे शाहू ४ मे १८०८ मध्ये निवर्तले. त्यानंतर प्रतापसिंह(कार. १८०८–३९) हे अल्पवयीन चिरंजीव सातारच्या गादीवर विराजमान झाले.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate