অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्नपदार्थांचे त्रिदोषांवरचे परिणाम

अन्नपदार्थांचे त्रिदोषांवरचे परिणाम

कफ/वात/पित्त या त्रिदोषांवर निरनिराळया अन्नपदार्थांचे वेगवेगळे परिणाम होतात. उदा. दूध,भात इ. पदार्थ कफ वाढवतात. तूरडाळचहा इ. पदार्थ पित्त वाढवतात .हरबराभाजके शेंगदाणे इ. वात वाढवतात. खरे म्हणजे लोकांमध्ये या कल्पना प्रचलित आहेत आणि त्यांचा अनुभवही येतो. उदा. बेसन खाल्ल्यावर पोटात वायू होतो,तसेच विष्ठा कडक होते.

शीतउष्णइ. परिणाम

काही पदार्थ शरीराला 'थंडपडतात तर काही 'गरमअसा समज आहे. मात्र पदार्थाच्याप्रत्यक्ष तापमानाशी याचा संबंध नाही. ज्या अन्नपदार्थांमुळे शरीरात गरमपणाघामजळजळ,तहान इ. परिणाम दिसतात त्यांना 'उष्ण' (गरम) म्हणतात. मसालेदार तिखट पदार्थानंतर हा अनुभव बहुतेकांना येतो. याउलट धने,कोथिंबीर वगैरे पदार्थ 'थंड'असतात. या कल्पनांचा आपण प्रत्यक्ष अनुभव नेहमी घेतो.

रस

आयुर्वेदानुसार अन्नपदार्थात विविध रस असतात. इथे रस म्हणजे 'चवया अर्थाने पाहिले पाहिजे. मधुरकडूतिखटखारटतुरटआंबट असे 6 विविध रस असतात. प्रत्येक रसाचा वेगळा परिणाम होतो.

मधुरआंबटतुरट पदार्थ सर्वसाधारणपणे पोषक असतात. त्याने बळवजन इ. वाढते.

तिखट,खारट पदार्थांनी वजन वाढत नाही पण विशिष्ट परिणाम होतात. उदा. तिखटाने नाक वाहतेघाम येतोइ.

कडू पदार्थांनी 'औषधी'परिणाम होतातपण जास्त घेतले तर विषारी परिणाम होतात.

तुरट पदार्थांनी कोरडेपणाआक्रसणे इ. परिणाम जाणवतात. उदा. दंतमंजनांमध्ये तुरट पदार्थ असतो. त्यामुळे दात-हिरडया आवळल्याप्रमाणे व स्वच्छ-कोरडया झाल्यासारखे वाटते.

गुरू-लघु

अन्नपदार्थ पचायला जड (गुरू) किंवा हलके (लघु) असतात. मांसम्हशीचे दूधडाळी इ. पचायला जड असतातयाउलट लाह्यामूग,ताकशेळीचे दूध इ. हलके असतात. या पध्दतीने विचार करून अन्नपदार्थाचे जेवणातले प्रमाण ठरवायला पाहिजे. लहान मुलांना आणि वृध्दांना पचायला हलके पदार्थ द्यावेत तारुण्यात जड पदार्थही पचू शकतात. तसेच रात्रीच्या जेवणात हलके (लघु) पदार्थ असावेत.

स्निग्ध आणि रूक्ष

अन्नपदार्थ कोरडे (रूक्ष) किंवा ओले-तेलकट (स्निग्ध) असतात. शरीरावर त्यांचा तसा परिणाम होतो. उदा. भाजलेले शेंगदाणे रूक्ष असतात त्यामुळे पचनसंस्था बिघडते आणि बध्दकोष्ठ होण्याची शक्यता वाढते. बेसनपीठही रूक्ष असते. याउलट कांदालसूणफळेभाज्यातेलतूप इ. स्निग्ध असतात. रूक्ष पदार्थांनी तहान लागते.

निरनिराळया अन्नपदार्थांचे असे विविध गुणधर्म सोबतच्या तक्त्यात दिले आहेत. आहार-जेवण निवडताना प्रकृती लक्षात घेऊन अन्नपदार्थ निवडले पाहिजेत.

 

आयुर्वेदाप्रमाणे काही अन्नपदार्थांचे भौतिक गुणधर्म (तक्ता (Table) पहा)

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate