टेहरी गढवाल संस्थान
टेहरी गढवाल संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील कुमाऊँ प्रदेशातील एक संस्थान. क्षेत्रफळ १०,८८० चौ. किमी. लोकसंख्या ६,०२,११५ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. ४१ लाख रुपये. उत्तरेस तिबेट, रावीन आणि बशहर ही पंजाबातील संस्थाने, पश्चिमेस डेहराडून, दक्षिणेस अलकानंदा व पूर्वेस यमुना यांनी सीमित झाले असून नद्यांपलीकडे ब्रिटिश वा पौडी गढवाल ही सीमा होती.