केरळ
केरळ : मलबार. भारताच्या नैर्ऋत्य कोपऱ्यातील अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सर्वांत दक्षिणेचे चिंचोळे राज्य. क्षेत्रफळ ३८,८६४ चौ. किमी. लोकसंख्या २,१३,४७,३७५ (१९७१). ९० १५' उ. ते १२० ५३' उ. आणि ७४० ४६' पू. ते ७७० १५' पू.; दक्षिणोत्तर लांबी सु. ५४४ किमी. कमाल पूर्व - पश्चिम रुंदी मध्यभागात सु. १२० किमी.