मुष्टियुद्ध
मुष्टियुद्ध : एक रोमहर्षक क्रीडाप्रकार. पूर्वी हा खेळ नुसत्या मुठींनी खेळत, श्रीकृष्ण-कंस , भीम-दुःशासन इत्यादींच्या मुष्टियुद्धांचे संदर्भ महाभारत काळात आढळतात. प्राचीन ग्रीसमध्ये थीरा येथील भित्तिलेपचित्रात (इ. स. पू. १५२०) मुष्टियुद्धाचे चित्रण आढळते.