मॉल्टा
मॉल्टा: भूमध्य समुद्रातील स्वतंत्र प्रजासत्ताक द्वीपराज्य. क्षेत्रफळ ३१५·६ चौ. किमी. लोकसंख्या ३,२९,१८९ (१९८३). भूमध्य समुद्राच्या मध्यभागी ३५° ४८′ ते ३६° उ. व १४° १०′ ते १४° ३५′ पू. यांदरम्यानच्या या देशात मॉल्टा (२४५·७ चौ. किमी.), गोट्सो (६७·१ चौ. किमी.) व कोमीनो (२·८ चौ. किमी.) या प्रमुख बेटांचा समावेश होतो.