चित्तोडगढ
चित्तोडगढ : राजपुतांची वीरभूमी म्हणून ओळखला जाणार, राजस्थानाच्या मेवाड भागातील प्रसिद्ध गड. दुसरा पांडव भीम याने हा दुर्ग प्रथम बांधला, अशी आख्यायिका आहे. गडावर भीमलत्ताकुंड नावाचे ठिकाण आहे. तेथे भिमाने लाथ मारून पाताळातील पाणी आणले, अशी दंतकथा आहे.