जयपूर
जयपूर : भारताची सुरेख आणि सुंदर रचनेची गुलाबी नगरी म्हणून सुप्रसिद्ध असलेली राजस्थान राज्याची राजधानी.लोकसंख्या ६,१५,२५८ (१९७१), संगनेर (११,६१७) व अंबेर (९,८९३) यांसह ६,३६,७६८. हे दिल्लीच्या नैर्ऋत्येस ३०७ किमी. व मुंबईच्या ईशान्येस लोहमार्गाने १,११४ किमी. आणि समुद्रसपाटीपासून ४३१ मी. उंचीवर आहे.