पालें बांग
पालें बांग : इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील द. सुमात्रा प्रांताची राजधानी व नदीबंदर. लोकसंख्या ५,८३,००० (१९७१). हे सुसी नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेले आहे. हे लोहमार्गाने तलुक्बटुंगशी, तर रस्त्यांनी इतर मोठ्या शहरांशी जोडलेले असून येथे विमानतळही आहे.