অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आमचे पण "बेटींग"

आमचे पण "बेटींग"

आमचे पण "बेटींग"https://static.vikaspedia.in/media_vikaspedia/mr/images/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92b94193292a93e916930947/copy_of_150.jpg"image-left" src="https://static.vikaspedia.in/media_vikaspedia/mr/images/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92b94193292a93e916930947/copy_of_150.jpg" />सर्वत्र फक्त झाडांचे खराटे उरलेले असतात. याच काळात उन्हे प्रचंड तापायला सुरवात झालेली असते. सध्याच्या वर्षीचा उन्हाळा तर म्हणे २०/२५ वर्षांतला सर्वात गरम उन्हाळा आहे. या अशा काळात जर तुम्हाला सांगीतले की चला आपण जंगलात जाउ आणि छान फुलपाखरे बघून येऊ, तर सर्व जण वेड्यात काढतील. पण पावसाळ्यानंतरच्या काळानंतरचा हाच काळ फुलपाखरए बघण्याचा सर्वोत्तम काळ आहे. अर्थात या वेळेस आपल्याला "चिखल पान" करताना फुलपाखरे दिसतात. पण या चिखलपान करणाऱ्या फुलपाखरांच्या जाती अणि त्यांची संख्या खरोखरच विस्मयकारक असते.

कान्हा, रणथंभोरच्या जंगलात कीतीतरी प्राणी, पक्षी दिसत असले तरी जशी आमची नजर वाघाला, बिबळ्याला शोधत असते तसेच काहीसे या चिखलपानाच्या वेळी "राजांचे" होते.

चिखलपानाच्या वेळी सुक्या ओढ्यात, ओलसर चिखलावर स्पॉट स्वोर्डटेल, कॉमन गल, ईमीग्रंट, झेब्रा ब्लू, लाईन ब्लू, सेलर्स, प्लम जुडी, पॅन्सी अशी अनेल फुलपाखरे येत असली तरी आम्ही वाट बघत असतो तो राजांची. ब्लॅक राजा आणि टॉनी राजा ही वर्षात फक्त याच वेळी दिसणारी फुलपाखरे आहेत. त्यांच्या भन्नाट उडण्याच्या वेगामुळे एरवी ती फक्त सुसाट उडताना दिसली तरच दिसतात. या राजांची अजुन एक खासियत म्हणजे ती नुसत्या चिखलावर सहसा आकर्षित होत नाहीत. जर अती सडलेली फळे, दारू, प्राण्यांची विष्ठा किंवा मुत्र असेल तर त्यांची चंगळ असते आणि फक्त याच वेळेस ती खाली जमिनीवर उतरतात.

इतरवेळी एकतर ती सुसाट उडत असतात किंवा झाडवर उंच बसलेली असतात. यातील टॉनी राजा हे अतिशय देखणे आणि आकाराने मोठे असलेले फुलपाखरू आहे. या फुलपाखराच्या पंखांची वरची बाजू उठावदार पिवळसर भगव्या रंगाची असते आणि वरच्या पंखांच्या टोकांना जाड काळी किनार असते. मादी असएल तर या काळ्या किनारीच्या खाली एक पांढरा पट्टा असतो. पंखांची खालची बाजू निळसर पिवळी असते आणि त्यावर चंदेरी झळाळी असते. वरती बारीक तपकीरी, लालसर रेघांची नक्षी असते. यांना छान उठावदार शेपट्यासुद्धा बहाल केलेल्या आहेत.

जंगलात जर का तुम्हाला यांना नैसर्गिक अवस्थेत बघायचे असेल तर एक वेळ जमू शकेल पण त्यांचे छायाचित्रण फारच कठीण आहे. कारण ती उंचाचर उडत असतात आणि त्यांचा वेगसुद्धा ताशी ६० कि.मी. पेक्षा जास्त असतो. यामुळे यांना जर आकर्षित करायचे असेल तर "बेटिंग"च करावे लागते. फळांच्या "बेट" वर साधरणत: ब्लू ओकलीफ, गॉडी बॅरन अश्या जाती आकर्षित होतात पण राजांना आकर्षित करायला दारूत बुडवलेली फळेसुद्धा चालत नाहीत. मोरी माशाचा खास २/३ दिवस सडवलेलेआ तुकडा, कोलंबीची २/३ दिवस पाण्यात कुजवलेली फोलकटे असा अतिघाण वास येणारा ऐवज ठेवला तर ही "राजा" मंडळी क्षणार्धात त्यावर येतात.

एकदा का ती "बेट"बर आली की मग मात्र ती तीकडून उडायचे नाव घेत नाहीत आणि तुम्हाला त्यांचे यथेच्छ छायाचित्रण करून देतात. मात्र हे छायाचित्रण करताना प्रचंड दुर्गंधी आपल्याला सहन करावी लागते. साधारणत: २ मिनीटांपेक्षा जास्त तुम्ही तीथे थांबू शकत नाही. थोडेसे बाजूला जाउन, जरा मोकळी हवा घेउन परत त्या ठीकाणी जाउन छायाचित्रण करावे लागते. अर्थात याचा योग्य तो मोबदलासुद्धा आपल्याला छायाचित्राद्वारे मिळतो. अन्यथा यांची अशी छायाचित्रे मिळने केवळ अशक्य असते.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate