অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कापूस, जंगली

कापूस, जंगली

(रानकापूस ; हिं. लोत लोती; गु. वगडाऊ भीडो; लॅ. युरेना सिन्युअ‍ॅटा कुल-माल्व्हेसी). सु. ०.६-१.२ मी. उंचीचे झुडूप उष्णकटिबंधात व भारतात बहुतेक सर्व उष्ण ठिकाणी तणाप्रमाणे वाढते.

पाने केसाळ, लांब देठाची, तळाशी हृदयाकृती,अर्ध्यापेक्षा अधिक हस्ताकृती विभागलेली; खंडे ३-५ व दंतुर; गुलाबी फुले पानांच्या बगलेत झुबक्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरात येतात.

बोंड केसाळ व बोथट काट्यांनी आच्छादलेले. बी बाहेर फुगीर व आत पाचरीप्रमाणे व गुळगुळीत असते. सालीपासून मिळणारा धागा बळकट (ताग व अळशीप्रमाणे) असून दोर्‍याकरीता व पिशव्यांकरीता फार चांगला असतो. मूळ कटिवातावर बाहेरून लावण्यास चांगले.

वन भेडी

(लॅ. युरेना लोबॅटा). ही सु. ०.६-१.२ मी. उंच व सरळ वाढणारी ओषधी [→ औषधि]. वर वर्णन केलेल्या जंगली कापसाच्या वंशातील अन्य जाती असून तिचा प्रसार आणि स्वरूप साधारणतः तसेच असते.

पाने लांबीपेक्षा अधिक रुंद व खंडे ३-१० किंवा अधिक पानांचा आकार वरच्या जातीपेक्षा दुपटीने मोठा व ती अर्ध्यापेक्षा कमी विभागलेली सालीतील नरम धाग्यांचा उपयोग मॅलॅगॅसी (मादागास्कर) क्यूबा व ब्राझील या देशांमध्ये कॉफीच्या पिशव्यांकरिता व जाड कागद बनविण्यासाठी करतात.

मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे) असून संधिवातावर बाहेरून उपचार करण्यास चांगले या झाडाचा कोळसा दातवणाकरिता वापरतात. श्लेष्मल (बुळबुळीत) बियांचा उपयोग साबण कारखान्यात व पिठूळ अन्न बनविण्यास करतात.

 

लेखक: गो. वि. जोशी

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate