অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॅस्कॅरिला बार्क

कॅस्कॅरिला बार्क

कॅस्कॅरिला बार्क

क्रोटन इल्युटेरिया व क्रो. कॅस्कॅकरला (कुल-यूफोर्बिएसी) या ब्रहामातील लहान वृक्षांच्या सालीला हे नाव दिले जाते.

जमालगोटा व पांढरी या भारतात आढळणाऱ्यावनस्पतींच्या वंशातील हे वृक्ष असल्याने त्यांची काही शारीरिक लक्षणे सारखी आहेत. या सालीत राळेसारखा पदार्थ, अनेक तेले, कॅस्कॅरिलीन हे कडू द्रव्य इ. पदार्थ असतात.

क्विनीनचा अंशही नसताना सिंकोनाऐवजी ती मलेरियावर वापरीत, वस्तुतः हिच्यात औषधी गुण जवळजवळ नाहीत; तथापि क्वचित जठरोत्तेजक व पौष्टिक औषधी म्हणून हिचा उपयोग करतात.

जळताना सुवास येतो म्हणून तंबाखूत हिचा भुगा मिसळून ओढतात.

 

 

लेखक: न. द. हेर्लेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate