অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोलदारु

गोलदारु

गोलदारु

(पून, पुनई; हिं. जंगली बदाम, गंध बदाम; क. सेंबाडी, पेन्नारी; सं. नागलकुडा; इं. बॅस्टर्ड पून; लॅ. स्टर्क्युलिया फेटिडा; कुल-स्टर्क्युलिएसी). हा एक मोठा सु. २४-२७ मी. उंच, सरळ वाढणारा, शोभिवंत, पानझडी वृक्ष जंगली अवस्थेत क्वचित दिसतो पण इंडोचायना, मलाया, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, श्रीलंका, ब्रह्मदेश व भारत येथे बऱ्याच ठिकाणी लावलेला आढळतो. याची शारीरिक लक्षणे सामान्यतः स्टर्क्युलिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. साल पांढरी व फांद्यांची मांडणी मंडलाकार असते. पाने हस्ताकृती विभागलेली व संयुक्त; दले ५-९, लंबगोल व कुंतसम (भाल्यासारखी) असून ते उन्हाळ्यात गळतात; फुले एकलिंगी व द्विलिंगी, फिकट लाल, दुर्गंधी व लहान असून मार्च ते मेमध्ये येतात. पुं-पुष्पे अधिक लवकर गळून जातात; परागकोश १०-१५; स्त्री-पुष्पे थोडी व परिमंजरीच्या टोकास येतात. किंजदले केसाळ व बळकट किंजधरावर असून त्यांच्याभोवती वंध्यकेसरांचे वर्तुळ असते [→ फूल]. घोसफळातील प्रत्येक पेटिकाफळ ५-१० x ६ सेंमी., कठीण, शेंदरी व नावेसारखे असते. बिया १०-१५, मोठ्या, काळ्या, लांबट व गुळगुळीत असून प्रत्येकीच्या टोकास एक पिवळे बीजोपांग (बीजाच्या देठापासून वा त्यावरील छिद्राच्या जवळच्या भागापासून तयार झालेली वाढ) असते. सालीपासून धागा व डिंक (ट्रॅगकांथसारखा) काढतात. फळे व बीजांचे तेल रेचक व वायुनाशी; पाने कीटकनाशक; बिया भाजून खातात. लाकूड बळकट व टिकाऊ असून होडकी, डोलकाठी, खोके अशा किरकोळ उपयोगात आहे. (चित्रपत्र).

 

लेखक: सिंधु अ. पराडकर,

 

 

 

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate