অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हक्काच घरकुल....

हक्काच घरकुल....

वय पासष्ट असताना देखील ही मूले अगदी लहान मुलासारखी वागतता. शरीराचा विकास होतो पण मेंदूची वाढ थांबते. अशी मुले भावनिक प्रतिक्रिया खुप लवकर देतात. यांना लगेच राग येतो, पण तेवढच जऱ आपण यांना प्रेम दिल तर ते त्याहुन अधिक प्रेम आपल्याला देतात. अशाच भिन्नक्षम (मतिमंद) मूलांना आयुष्यभर सांभाळण्यासाठी घरकुल नावाची अमेय पालक संघटना अविरत काम करत आहे. डोंबिवलीतील खोणी गावात हे घरकुल आहे. ८७-८८ च्या काळात अशी पाल्य असणारे पालक एकत्र आले. त्या पूर्वी त्यांचे पाल्य डोंबिवलीतील अस्तित्व शाळेत शिकत होती. तेथील प्रमुख मेजर काळे यांनी पालकांना योग्य मार्गदर्शन केले. पाल्य अठरा वर्षाचे झाल्यांनतर त्याचं शालेय शिक्षण संपते त्यानंतर मुलांच्या भविष्याबद्दलचा प्रश्न तुम्हाला सतावेल त्याबद्दल काय करायचं हे आताच ठरवण गरजेच आहे. शिवाय हा प्रश्न आपलाच आहे त्यामुळे यावर विचार करणे ही आपलीच जबाबदारी आहे.

या सगळया गोष्टींवर विचार करून तीस ते पस्तीस पालकानी एकत्र येऊन बँकेत रिक्रिंग खात चालू केल. या बँकेशी असणार कोणतही व्यवहार संस्थेशी निगडीत व्हावा म्हणून १९९१ साली अमेय पालक संघटना स्थापन करण्यात आली. नंतर पुढील दोन वर्षात या संघटनेने डोंबिवली जवळ सव्वा एकर जागा घेतली. ९६ च्या काळी त्या जागेवर एक घरकुल उभ केल. सध्या  संस्थेत एकूण वीस ते तीस मुलांचा समावेश आहे. ही मूले अगदी तीस ते साठ वयोगटातील आहेत. मुलांचा सांभाळ करने, त्यांना योग्य वेळी उठवून त्यांची अंघोळ, जेवणाची सोय करने, वेळेप्रसंगी त्यांना हाताने भरवने अशा अनेक गोष्टी येथील मंडळी आनंदात व वेळेवर करतात. या संस्थेत पाल्यांचा काही खर्च पालक तर बाकीचा खर्च संस्था करते. संस्था आर्थिक मदतीसाठी कोणत्याही बड्या व्यक्तीकडे जात नाही.

आपले नातेवाईक, मित्रपरिवार अशा अनेक मार्गातून आर्थिक मद्त मिळते. या संस्थेमध्ये कुणी मोठ नाही ना कुणी लहान आहे, इथे सगळे समान. ज्या व्यक्तीच्या मनात अशा कामाबद्दल सद्भावना असेल त्या सगळ्या व्यक्तींचं या संस्थेत स्वागत आहेच. आज त्याचच सार्थक म्हणून गेले वीस वर्ष हि अमेय पालक अशीच अविरत चालू आहे. ज्या जागेवर गवताची काडी नव्हती आज त्या जागेवर शंभर वृक्ष आहेत. दोन मजली इमारत उभी आहे. वातावरणात मन खुप प्रसन्न होऊन जाते.या संस्थेत कुणा मुलाला सहभागी करायचं असल्यास प्रथम त्या पाल्याला पालकांसमवेत संस्थेला भेट द्यावी लागते.हि भेट रविवारी सकाळी दहा वाजता असते. संस्थेचे ट्रस्टी त्या मुलासोबत बोलतात मग त्याची निवड होते.४००० वर्गणी आणि ५०००० डीपोजित घेण्यात येत,काही कालावधीत हे डीपोजित त्यांना परत मिळत.

पाल्याच्या पालनपोषणासाठी पालकांकडून ६००० रुपये दरमहा घेतले जातात.पण काही पालक देतात काही देत नाहीत म्हणून संस्था त्या मुलांचा सांभाळ करत नाही अस नसत.मुलांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अविनाश बर्वे सरांशी संपर्क करावा लागतो. विविध भागातील लोक या संघटनेला भेट दयायला येतात, कुणी वाढदिवसाला, कुणी मैत्री व्हावी म्हणून,तर कुणी आपल जीवन सफल करण्यासाठी येतात. यात जेष्ठ नागरिक, कॉलेज विद्यार्थी यांचा समवेश असतो.संस्थेला अनेक मोठे मान्यवर देखील भेट देऊन गेले आहेत. जैन हॉस्पिटलचे डीन डॉ अविनाश सर शिवाय दिलीप प्रभावळकर यांनी देखील भेट दिली आहे. आताच लुब्रीझॉल कंपनीने संस्थेला 15 लाखांचा सौर ऊर्जा प्रकल्प व मुलांसाठी एक गाडी दिली. या प्रसन्न ठिकाणी आपण नक्की गेल पाहिजे.

लेखक - संतोष बोबडे

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate