Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 18:44:56.267337 GMT+0530
शेअर करा

T3 2019/05/26 18:44:56.271693 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 18:44:56.296358 GMT+0530

दुधाळ गाईची निवड

दुधाळ गाईची निवड करताना कोणत्‍या गोष्‍टी विचारात घ्‍याव्‍यात.

दुधाळ गाईची निवड करताना कोणत्‍या गोष्‍टी विचारात घ्‍याव्‍यात

लक्षणे

 1. दुधाळ गाईची निवड करताना तिचं बाह्यस्वरूप, दुधुत्पादन आणि प्रजननक्षमता विचारात घ्यावी.
 2. गाय विकत घेताना अगर निवडताना तिचे दुध २-३ वेळा काढून उत्पादनाची खात्री करून घ्यावी. केवन मोठया आकाराची कास याबाबतीत गृहीत धरू नये.
 3. गाईला पान्हावयास किती वेळ लागतो? टी आंबोणशिवाय धार देते का? किंवा नाही? तिला ठराविक गवळ्याची सवय आहे का? या गोष्टींचीही खात्री करून घ्यावी.
 4. तापट स्वभावाच्या गाई, उत्तेजित झाल्या, कि पान्हा चोरतात म्हणून शांत स्वभावाची गाय निवडावी.
 5. धारेच्या वेळी लाथा मारणारी, चीर्गुत, दगड आणि विटा चघळण्याची सवय असणारी गाय घेणं टाळाव.
 6. धरेला (पिळण्यासाठी) हलकी असणारी गाय निवडावी. जड गायी पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळं दूधही कमी निघते. धार काढून पाहताना चारही सडातील दुध काढून पाहावं.
 7. गाय विकत घेताना शक्यतो दुसऱ्या वेतातील गाय निवडावी.
 8. जातिवंत दुधाळ गाई तरतरीत आणि निरोगी दिसतात.
 9. त्यांचे डोळे पाणीदार असतात.
 10. सर्व अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध असते.
 11. शरीराचा आकार वरून, पुढून आणि बाजूकडून निरीक्षण केलं असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती दिसतो.
 12. गाईकड पुढून पाहिलं असता दोन पायातलं अंतर अधिक असाव.
 13. छाती भरदार असावी.
 14. वरून पाहिलं असता कमरेची हाडं दूरवर असावीत.
 15. बाजूनं पाहिलं असता शेपटीवरील दोन हाडं आणि कास यामध्ये अधिक अंतर असावं.
 16. गाय लठ्ठ नसावी.
 17. लांब आणि सडपातळ असावी.
 18. पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असावा.
 19. पाठीला बक असणाऱ्या गाई शक्यतो टाळाव्यात.
 20. गाईंच्या खुरांचा रंग काला असावा.
 21. वाढलेल्या नख्या किंवा खुरसडा याबाबतीत बारकाईने चौकसपणे बघावं.
 22. गाय विकत घेताना टी चालवून- फिरवून पहावी.
 23. कास हा दुभत्या जनावरांचा महत्वाचा अवयव. कासेची शरीराशी बांधणी घट्ट असावी. धार काढण्यापूर्वी दुधानं भरलेली कास आकाराने मोठी दिसते. सड फुगलेले दिसतात. दुध काढल्यानंतर कासेच आकार पूर्ववत लहान होणारा असावा. त्वचा मऊ असावी.
 24. कासेवर अनेक फाटे असणारं शिरांच जाळ असावं. शिरा जड असाव्यात.
 25. चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत.
 26. ज्या वेळी गाईची दुध उत्पादनाची, प्रजननक्षमतेची आणि वंशावळीची माहिती खात्रीशीरपणे उपलब्ध होते, त्याचवेळी या माहितीच्या आधारे आणि आताच सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे गाय विकत घेतान तिची निवड करावी.

 

स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव

3.088
गोकुळ nimbalkar Jan 18, 2018 10:19 AM

१ वर्षाच्या १० जातिवंत कालवडी पाहिजे .किंमत...मार्गदर्शन हवेत संपर्क 90*****46

सचिन शिंदे Jul 20, 2017 12:05 PM

सर मला दुध व्यवसाय करायचा आहे गाय कोनत्या घ्यावा याची व सरकारची योजना काय त्याची माहीती द्यावी अहमदनगर ता ,सगमनेर ८८०६४६०२६१

vicky more Jul 06, 2017 03:36 PM

Konti desi gay jast dudh dete aani tychi kimat kay asel

वैभव काळे ।रा,ब्राह्मणी ता ,वणी जि ,यवतमाळ} Apr 21, 2017 02:37 PM

मला गाय ग्यायची आहे तर मला सरकार च्या ज्या} काही योजना आहे।त्या आम्हाला पोहोचवा ही विनंती ।।माझं शिक्षण बी कॉम आहे ।पण घरची परस्थिती शिवण्याची नाही ।तरी सरकारला माझ्या नवीन व्यवसाय}या करिता माझी मदत करावी ही विनंती ।

sanjay savant Apr 21, 2017 01:06 PM

गाई घ्यायच्या आहेत सरकारी योजनांची माहीती सांगा
आणि पालन विषयी मार्गदर्शन करावे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 18:44:56.645989 GMT+0530

T24 2019/05/26 18:44:56.652695 GMT+0530
Back to top

T12019/05/26 18:44:56.190638 GMT+0530

T612019/05/26 18:44:56.208731 GMT+0530

T622019/05/26 18:44:56.257755 GMT+0530

T632019/05/26 18:44:56.258554 GMT+0530