Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/24 17:15:7.810368 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / जनावरांच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी पेटंट!
शेअर करा

T3 2019/06/24 17:15:7.816414 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/24 17:15:7.850266 GMT+0530

जनावरांच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी पेटंट!

जनावरांच्या शिंगकळ्या जाळणे (डीहॉर्निंग), कॅस्ट्रेशन करणे या प्रक्रियेमध्ये जनावरांना वेदना होतात. वेदनांमुळे जनावरांच्या कार्यक्षमतेमध्ये फरक पडतो. घटकांच्या वापराचे पेटंट नुकतेच त्यांना मिळाले आहे.

जनावरांच्या शिंगकळ्या जाळणे (डीहॉर्निंग), कॅस्ट्रेशन करणे या प्रक्रियेमध्ये जनावरांना वेदना होतात. वेदनांमुळे जनावरांच्या कार्यक्षमतेमध्ये फरक पडतो. या वेदना कमी करण्यासाठी कान्सास राज्य विद्यापीठातील संशोधकांनी काही औषधी घटकांचा वापर केला असून, या औषधी घटकांच्या वापराचे पेटंट नुकतेच त्यांना मिळाले आहे.

जनावरांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शिंगकळ्या काढण्यासारख्या अनेक उपाययोजना केल्या जातात; मात्र, त्या करतेवेळी जनावरांना मोठ्या प्रमाणात वेदना होतात. अनेक वेळा जनावरांना त्याचा धक्का बसल्याने काही दिवस जनावरे आजारी पडतात. त्यावर उपाय शोधताना संशोधकांनी मेलोक्‍सिकॅम हे एकल औषध किंवा मेलोक्‍सिकॅम आणि गॅबापेन्टीन यांचे मिश्रण वेदनाशमनासाठी वापरण्याचे प्रयोग केले आहेत. डीहॉर्निंगनंतर मेलोक्‍सिकॅम या औषधामुळे वजनामध्ये वाढ होते, तर कॅस्ट्रेशननंतर बोव्हाईन रेस्पिरेटरी डिसीज होण्याचे प्रमाण कमी होते. मेलोक्‍सिकॅम आणि गॅबापेन्टीन या दोन्ही औषधांच्या वापरामुळे लंगडेपणा कमी होतो.

माहिती देताना संशोधक बुच कुकॅनिक यांनी सांगितले, की तोंडावाटे दिलेल्या या औषधांमुळे मांसासाठी पाळल्या जाणाऱ्या जनावरांवरील ताण कमी होऊन वजनामध्ये वाढ होते. या तंत्रामुळे प्रतिजैविकावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळेल.

प्रा. हॅन्स कोईट्‌झी व बुच कुकॅनिक यांनी कान्सास राज्य विद्यापीठामध्ये असताना केलेल्या या संशोधनासाठी संस्थेला हे पेटंट मिळाले आहे. सध्या कोईट्‌झी हे लोवा राज्य विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत.

 

स्त्रोत: अग्रोवन

2.97916666667
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/24 17:15:8.715118 GMT+0530

T24 2019/06/24 17:15:8.722280 GMT+0530
Back to top

T12019/06/24 17:15:7.488842 GMT+0530

T612019/06/24 17:15:7.710259 GMT+0530

T622019/06/24 17:15:7.798157 GMT+0530

T632019/06/24 17:15:7.799055 GMT+0530