Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:20:56.420650 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / तलाव ठेका धोरण
शेअर करा

T3 2019/10/17 06:20:56.425584 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:20:56.450731 GMT+0530

तलाव ठेका धोरण

पाटबंधारे विभागांने बांधलेले तलाव मत्स्यव्यवसाय विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे शासनाचे धोरण १९६६ पासून आमलात आहे.

पाटबंधारे विभागांने बांधलेले तलाव मत्स्यव्यवसाय विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे शासनाचे धोरण १९६६ पासून आमलात आहे. स्थानिक मच्छिमार सहकारी संस्थांमार्फत पाटाबंधारे तलावात मत्स्यसंवर्धन करुन जलक्षेत्राचा विकास करणे व मच्छिमारांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक दर्जा सुधारणे आणि स्थानिक लोकांना प्रथिन युक्त आहार उपलब्ध करुन देणे हा मुख्य उद्देश आहे. मत्स्यव्यवसाय विकसित करुन मच्छिमारांना रोजगार उपलबध्द करुन देणे हे शासनाचे धोरण आहे या अनुषंगाने पाटबंधारे विभागांने बांधलेले तलाव मत्स्यव्यवसाय विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे धोरण खालिल आदेशांनुसार निश्चित करण्यात आले आहे.

 • शासन निर्णय ईरिगेशन ऑण्ड पॉवर डिपार्टमेंट क्र. एफ्‌आय्‌एस्‌/१०६३/७७१२-आय्‌(३), दि. २६.०४.१९६६.
 • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२९६/१४१८३/सीआर-१३२/पदुम-१३, दि. ०६.०४.२०००.
 • शासन निर्णय पाटाबंधार विभाग क्र. संकिर्ण-२००३/१३/(४००/०३)/जसंनी, दि. २०.०१.२००४.
 • २०० हेक्टर खालिल तलाव व जलाशयांचे मासेमारीचे हक्क स्थानिक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना खालिल शासन निर्णय नुसार ५ वर्षासाठी ठेक्याने देण्यात येतात. मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी न घेतलेले तलाव जाहीर लिलावाने देण्यात येतात. तसेच २००१ नंतर तयार झालेले जलाशय हे दिनांक १५.१०.२००१ चे शासन निर्णयातील अट क्र. ११ नुसार जाहिर निविदेद्वारे ठेक्याने देण्यात येतात. याबाबतचे धोरण खालिल आदेशांनुसार निश्चित करण्यात आले आहे.

  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२८९/३४७६५/सीआर-३४६/पदुम-१३, दि. २५.०२.१९९१.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-११९९/२०/प्र.क्र.८/पदुम-१३, दि. १५.१०.२००१.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२०१/प्र.क्र.२२४/पदुम-१३, दि. ०४.०१.२००२.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२०२/१९४४२/प्र.क्र.१३०/पदुम-१३, दि. ०८.०८.२००२.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२०३/प्र.क्र.२५/पदुम-१३, दि. १९.०७.२००३.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२०४/प्र.क्र.३९/पदुम-१३, दि. ०३.०८.२००४.
  • शासन पत्र क्र. मत्स्यवि-२००४/प्र.क्र.१५९/पदुम-१३, दि. १४.०२.२००५.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२०८/७१५५/प्र.क्र.७७/पदुम-१३, दि. १९.०६.२००८.

  २०० हेक्टर खालिल तलाव व जलाशयांमधील मत्स्यबीज संचयन व न्युनतम तलाव ठेका रक्कम

  जलविस्तार हेक्टरइष्टतम संचयनन्युनतम तलाव ठेका रक्कम रू./हेक्टर
  ० ते २० ५००० प्रति हेक्टर. ३००/- प्रति हेक्टर.
  २०.०१ ते ६० १.० लक्ष + २० हे. पुढील क्षेत्रासाठी २,००० प्रति हेक्टर. ६,०००/- + २० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. १२०/- प्रति हेक्टर.
  ६०.०१ ते ३०० १.८ लक्ष + ६० हे. पुढील क्षेत्रासाठी १,००० प्रति हेक्टर. १०,८००/- + ६० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. ६०/- प्रति हेक्टर.
  ३००.०१ ते १३०० ४.२ लक्ष + ३०० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. २५,२००/- + ३०० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. ३०/- प्रति हेक्टर.
  १३००.०१ ते ५००० ९.२ लक्ष + १३०० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. ५५,२००/- + १,३०० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. २०/- प्रति हेक्टर.

  ५०००.०१ पेक्षा जास्त

  २७.७ लक्ष + ५००० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. १,२९,२००/- + ५,००० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. १०/- प्रति हेक्टर.

  माहिती स्त्रोत : महाराष्ट्र शासन

  3.04761904762
  श्री. सूर्यकांत महादेव वाघ Jul 28, 2017 11:09 PM

  नमस्कार
  मला आरे काॅलनी, गोरेगाव (पूर्व) मुंबई, येथे मत्स्यव्यवयाकरीता म्हणजे मत्स्य उत्पादना साठी भाडेतत्वावर तलाव घेणे आहे. ह्या संदर्भात काहिच माहिती माझ्याकडे नाहि.
  तरी आपण हि माहिती मला द्यावी, हि विनंती...
  कळावे,
  ९०८२३३०१०९
  ९९८७९५९५२७

  सागर शंकर कचरे Apr 22, 2017 08:56 AM

  सर मी वडगाव शिंदोडी येथील रहिवासी आहे व घोड धरणात मासेमारी करून उदरनिर्वाह करतो व घोड धरणात किनारच्या गावांमध्ये आमच्या भोई व भिल्ल समाज मासेमारी करतात. परंतु मागील 5 वर्षापासुन शिरूर चे महेंद्र मल्लाव हा व्यक्ती माझा धरणावर ताबा आहे असे सांगून आमच्याकडून मासे हिसकावून घेणे व दमदाटी करणे असे प्रकार घडत आहेत तरी आम्ही काय करू सांगा

  कैलास मदन Jan 31, 2016 12:11 PM

  मला साठवण तलावात मत्स्यपालन व्यवसाय करण्यासाठी माहिती द्यावी ही विनंती

  आपल्या सूचना पोस्ट करा

  (वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

  Enter the word
  नेवीगेशन

  T5 2019/10/17 06:20:56.671334 GMT+0530

  T24 2019/10/17 06:20:56.677528 GMT+0530
  Back to top

  T12019/10/17 06:20:56.356527 GMT+0530

  T612019/10/17 06:20:56.375971 GMT+0530

  T622019/10/17 06:20:56.410366 GMT+0530

  T632019/10/17 06:20:56.411172 GMT+0530