অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुर्कू

तुर्कू

तुर्कू

(स्वीडिश–ओबू). फिनलंडच्या नैर्ऋत्येकडील तुर्कू–पोरी प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,६३,१६२ (१९७४). हेहेल्‌सिंकीच्या वायव्येस १६० किमी. आउरायोकी नदीच्या मुखाशी वसलेले, बारमहा खुले सागरी बंदर असून देशातील सर्वांत

जुने गाव व व्यापार केंद्र आहे. १८१२ पर्यंत स्वीडिश व नंतर रशियन अंमलांखाली ते देशाची राजधानी होते. बाराव्या शतकात इंग्लंडमधून या बंदरातूनच फिनलंडवर आक्रमण झाले आणि त्यानंतर येथे धर्मपीठ व किल्ला स्थापन करण्यात आला.

१६४० मध् ये येथे स्थापन झालेले राष्ट्रीय विद्यापीठ १८२७ मध्ये शहराला लागलेल्या प्रचंड आगीत जळाल्याने ते हेल्‌सिंकीस हलविण्यात आले. त्यानंतर १९१८ मध्ये स्वीडिश व १९२२ मध्ये फिनिश विद्यापीठे येथे स्थापण्यात आली. येथे स्वीडिश व फिनिश दोन्ही भाषा चालतात.

हे शहर लोहमार्ग व रस्ते यांचे केंद्र आहे. शिवाय आर्तुकाइनेन येथे विमानतळ आहे. शहरात जहाजबांधणी हा प्रमुख व्यवसाय असून पोलाद, साखर, शुद्धीकरण, यंत्रोत्पादन, कापड व लाकूड गिरण्या, औषधे, अन्नप्रक्रिया, चिनी मातीची भांडी, तंबाखू–प्रक्रिया इ. उद्योगही महत्त्वाचे आहेत.

हे शहर तेराव्या शतकातील किल्ल्यांचे अवशेष, तुर्कू कॅथीड्रल (१२९०), वस्तुसंग्रहालये, कलावीथी व स्वीडिश रंगभूमी इत्यादींमुळे पर्यटकांचे आकर्षण आहे.

 

लिमये, दि. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate