भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वीकारले गेले. भारताच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे. या खाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते लिहिले आहे. माहिती संकलक : अतुल पगार