অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दूध भेसळ

दूध भेसळ

संयोग क्रियेतून तयार होणारे दूध हे दिसायला जरी साध्या दुधासारखे असले, तरी चवीला मात्र शंकास्पद वाटते आणि अशा दुधामध्ये पौष्टिक गुणधर्म काहीही नसतात. अशा दुधाचा आरोग्यावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन भेसळ दुधाबाबत जागरूक झाले पाहिजे.

  • दूध हे शरीरातील ऊर्जेची झीज भरून काढणारी
  • प्रथिने, हाडांच्या वाढीस आवश्‍यक असणारी

मूलद्रव्ये आणि निरोगी आरोग्य देणारी जीवनसत्त्वे, तसेच शरीरास आवश्‍यक असणारी ऊर्जा पुरविणारे स्निग्धांश आणि दूध शर्करा यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करते. हे घटक पचनास सुलभ आणि पूर्णपणे पचन होणारे असतात. अलीकडील काही वर्षांत दुधामध्ये भेसळीचे प्रमाण खूप वाढलेले दिसते. अशा प्रकारच्या दुधामध्ये विविध रसायने, पावडरी वापरल्या जातात. संयोग क्रियेतून तयार होणाऱ्या दुधामध्ये खालील घटक एकत्रित वापरले जातात.

  • खाद्यतेल, सोडा, युरिया आणि पाणी
  • खाद्योपयोगी तेल, स्निग्धांशविरहित दूध, युरिया, सोडा, मीठ, निरमा पावडर, साखर आणि पाणी.
  • खाद्योपयोगी तेल, स्निग्धांशविरहित दूध, युरिया, साबण चुरा आणि पाणी

अशा प्रकारच्या तयार होणाऱ्या दुधामध्ये तेल हे स्निग्धांशाचा स्रोत म्हणून वापरण्यात येते आणि इतर घटक पदार्थ हे स्निग्धांशविरहित दुधाचा स्रोत म्हणून वापरण्यात येतात. अशा प्रकारचे दूध हे गावपातळीवरील दूध संकलन केंद्रातील चाचण्यांमध्ये पास होते. कारण या ठिकाणी फक्त स्निग्धांश आणि स्निग्धांशविरहित घटकच पाहिले जातात, पण अशा प्रकारचे दूध हे शरीरास खूप हानिकारक असते. संयोग क्रियेतून तयार होणारे दूध आणि नैसर्गिक दूध यांमधील फरक

संयोग क्रियेतून तयार होणाऱ्या दुधाचा रंग जरी नैसर्गिक दुधासारखा दिसत असला, तरी ते दूध चवीला कडवट व त्याचा गंध, वास साबणाच्या पाण्यासारखा येतो. अशा दुधाची सर्वसाधारण तापमानाला साठवणूक केली तर ते दूध फाटते, नासते व त्याला पिवळसर रंग प्राप्त होत नाही. संयोग क्रियेतून तयार होणारे दूध खरबरीत पात्रावर घासले असता फेसाळते, फेस तयार होतो आणि उष्णता दिल्यास पिवळसर रंगछटा प्राप्त होते. त्याचा गंध/वास काहीसा साबणाच्या पाण्यासारखा येतो. अशा दुधाची युरिया, सोडा, साबण चुरा, साखर इत्यादींची भेसळ चाचणी केली तर त्या सर्व चाचण्यांमध्ये भेसळ झालेली दिसून येते. या दुधाचा सामू हा अति विम्लतेकडे असतो म्हणजेच आठपेक्षा जास्त असतो. नैसर्गिक दुधाचा सामू हा ६.६४ ते ६.६८ इतका असतो.
- देशमुख, ९४२२७३७०८९, चौधरी, ९६५७९६३०९१.
(लेखक गो संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर येथे कार्यरत आहेत.)

संयोग क्रियेतून तयार होणाऱ्या दुधाच्या सेवनामुळे होणारे अपाय

संयोग क्रियेतून तयार होणारे दूध हे दिसायला जरी साध्या दुधासारखे असले तरी चवीला मात्र शंकास्पद वाटते आणि अशा दुधामध्ये पौष्टिक गुणधर्म काहीही नसतात (नैसर्गिक दुधाच्या तुलनेत).
भारतीय औषध प्रमाणित संस्थेनुसार अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे मानवास कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात.
युरियाच्या अतिवापरामुळे, सेवनामुळे मूत्रविकारही जडू शकतात. त्याचप्रमाणे हृदयास व फुफ्फुसासही हानिकारक ठरू शकते.
सोड्याच्या अतिसेवनामुळे लहान मुलांमध्ये वाढीस असणारे प्रथिनांचे (लायसीन) प्रमाण कमी होते, यामुळे शरीरवाढीवर विपरीत परिणाम होतात.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate