केपटाउन
केपटाउन : दक्षिण आफ्रिका सरकारची विधान-राजधानी व केप ऑफ गुड होप प्रांताची राजधानी. लोकसंख्या १०,९६,५९७ (१९७०). यांपैकी ३,७८,५०५ गोरे, ११,२६३ आशियाई, १,०७,८७७ आफ्रिकी व ५,९८,९५२ इतर कृष्णवर्णी होते. केपटाउन टेबल मौंटनच्या उत्तरेस वसलेले असून, त्याच्या पूर्वेस डोंगरशिखरे व पश्चिमेस टेबल बे उपसागर आहे.