काळपुळी, संसर्गजन्य
काळपुळी, संसर्गजन्य : (अँथॅक्स). बॅसिलस अँथ्रॅसिस या सूक्ष्मजंतूच्या संसर्गामुळे होणाऱ्या रोगाला संसर्गजन्य काळपुळी असे म्हणतात. मेंढी, शेळी, डुक्कर, गाय वगैरे पाळीव जनावरांचा हा रोग आहे; परंतु रोगी जनावरांशी संपर्क येणाऱ्या मनुष्यांसही हा रोग होऊ शकतो.