इराक
इराक : नैर्ऋत्य आशियातील एक अरब प्रजासत्ताक राष्ट्र. क्षेत्रफळ ४,३७,२२२ चौ. किमी.; लोकसंख्या १,००,७४,१६९ (१९७० अंदाजे). २९० उ. ते ३७० ५०’ उ. व ३९० पू. ते ४८० पू. जास्तीतजास्त लांबी १,२०० किमी. व रुंदी ७६८ किमी. टायग्रिस आणि युफ्रेटीस या दोन नद्यांमधील प्रदेश (दोआब) म्हणून इराकला पूर्वी ‘मेसोपोटेमिया’ हे नाव होते.