मध्यप्रदेश राज्य
मध्यप्रदेश राज्य : भारताच्या २२ घटक राज्यांपैकी एक राज्य. देशातील मध्यवर्ती स्थानामुळे याला मध्य प्रदेश हे नाव पडले. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील हे सर्वात मोठे (४,४२,८४१ चौ.किमी.) तर लोकसंख्येच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचे (५,२१,३८,४६७- १९८१ ) राज्य आहे. १७०४७ उ. ते २६०३५ उ. अक्षांश आणि ७४० पू. ते ८४०३० पू. रेशांश यादरम्यान पसरलेल्या वा राज्याच्या उत्तरेला उत्तर प्रदेश ,ईशान्येला उत्तर प्रदेश व बिहार, पूर्वेला बिहार व ओरिसा, दक्षिणेला आंध्र प्रदेश, नैऋत्येला, महाराष्ट्र, पश्चिमेला गुजरात आणि वायव्येला राजस्थान ही भारतातील घटक राज्ये आहेत.