महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळ (लिडकॉम)
महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळ (लिडकॉम) : चर्मोद्योग हा महाराष्ट्र राज्यातील एक महतत्त्वाचा उद्योग असून त्यामध्ये दुर्बल वर्गांमधील व्यक्ती मोठ्या संख्येने काम करतात. या उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळाची स्थापना केली.