मेघालय
मेघालय : भारताच्या २२ घटक राज्यांपैकी ईशान्य भागातील एक राज्य. क्षेत्रफळ २२,४२९ चौ. किमी. लोकसंख्या १३,३५,८१९ (१९८१). मेघालयाच्या उत्तरेस व पूर्वेस भारतातील आसाम राज्य, तर दक्षिणेस व पश्चिमेस बागंला देश आहे. शिलाँग हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण तसेच राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे (लोकसंख्या १,७३,०६४–१९८१)