‘सावाना’चे अनोखे वस्तूसंग्रहालय
पावणेदोनशे वर्षाचा इतिहास असलेले सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) वाचकांसाठी पंढरी ठरली आहे. वाचनालय म्हटले की आपण पुस्तकांपुरताच विचार करतो. मात्र नाशिकशी नाळ जोडायला लावणाऱ्या दुर्मिळ अशा वस्तुंच्या संग्रहासाठीही सावानाने मोलाची कामगिरी केली आहे.