ऑस्ट्रिया
ऑस्ट्रिया : मध्ययूरोपातील प्रजासत्ताक राष्ट्र. ४६° २२' उ. ते ४९° १' उ. व ९° २२' पू. ते १७° १०' पू.; दक्षिणोत्तर अंतर पूर्वेकडे सु. २९५ किमी., पश्चिमेकडे फक्त ६४ किमी.; पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त अंतर सु. ५८० किमी.; क्षेत्रफळ सु. ८३,८४९ चौ. किमी.; लोकसंख्या ७४,४३,८०९ (१९७१). राजधानी व्हिएन्ना.