अल्यूशन बेटे
अल्यूशन बेटे : उत्तर पॅसिफिकमधील बेरिंग समुद्राच्या दक्षिणेकडील बेटे. क्षेत्रफळ १७,६६६ चौ. किमी.; लोकसंख्या ६,०११ (१९६०). विस्तार ५२° ते ५५° उ. व १७२° पू. ते १६३° प. अलास्काच्या नैर्ऋत्य टोकापासून रशियाच्या कॅमचॅटका द्वीपकल्पापर्यंत सु. १,९०० किमी. पसरलेल्या या द्वीपसमूहाचे फॉक्स, आंद्रे आनॉफ, रॅट आणि निअर आयलँड्स असे चार विभाग असून ते अमेरिकेच्या अलास्का राज्यात मोडतात.