तिबेट
तिबेट : हिमालयाच्या उत्तरेस हिमालयाच्या आणि कुनलुनच्या रांगांनी वेढलेले, अल्पाईन काळात भूहालचालींनी निर्माण झालेले, अत्युच्च व विस्तीर्ण तिबेटचे पठार आहे. त्याचे क्षेत्रफळ २० लाख चौ. किमी. असून सरासरी उंची ४,२५० मी. आहे. त्याला ‘जगाचे छप्पर’ म्हणतात.