Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:16:8.328479 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मत्स्यपालनासाठी - तलाव
शेअर करा

T3 2019/05/26 00:16:8.333470 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:16:8.359862 GMT+0530

मत्स्यपालनासाठी - तलाव

मत्स्यसंवर्धन गावतळी, लहान - मोठे नैसर्गिक तलाव, कृत्रिम पाझर तलाव व जलाशयात चांगल्या पद्धतीने करता येते. मत्स्यशेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे.

मत्स्यसंवर्धन गावतळी, लहान - मोठे नैसर्गिक तलाव, कृत्रिम पाझर तलाव व जलाशयात चांगल्या पद्धतीने करता येते. मत्स्यशेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे. तलावासाठी जमिनीची निवड करताना हलकी, उताराची जमीन असल्यास नैसर्गिकरीत्या पाणी बाहेर काढून टाकता येते. सपाट जमीन असेल तर मत्स्यतळे बांधताना तळाच्या बुडाला उतार द्यावा. तळ्याचा विस्तार 0.1 हेक्‍टर ते एक हेक्‍टर असावा. पाण्याची खोली दोन ते अडीच मीटर ठेवल्यास जास्तीत जास्त मत्स्यपालन करता येते.

सुरवातीला 0.1 हेक्‍टर जलक्षेत्र तयार करून मत्स्यपालन सुरू करावे. संवर्धनासाठी मोठ्या आकाराच्या, सोपी प्रजनन पद्धती असणाऱ्या व पाण्यातील परिवर्तनास तोंड देऊन प्रमाणित वनस्पतिजन्य नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरोगी माशांच्या जातींची निवड फायदेशीर ठरते, तसेच पाण्यातील विविध थरांत उपलब्ध नैसर्गिक अन्नाचा पुरेपूर वापर करून कार्प जातीच्या माशांची एकत्रित किंवा मिश्रशेती करता येते.

भारतीय प्रमुख कार्प जातींमध्ये कटला, रोहू व मृगळ या जाती अनुक्रमे पृष्ठभागाजवळ, मध्यभागातील व तळामधील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती आहेत. याबरोबर काही प्रमाणात गवत्या, चंदेरी, कॉमन कार्प वाढविल्यास या अन्नावर उपजीविका करून भारतीय प्रमुख कार्पबरोबर जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्‍य होते. या माशांना चांगली मागणी आहे.

- 022 - 27452775 
खार जमीन संशोधन केंद्र, 
बंदर रोड, पनवेल, जि. रायगड 
- 0712 - 2567192
मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर

स्त्रोत: अग्रोवन

 

2.92537313433
अमजद Aug 04, 2017 02:32 PM

मि पुणे मधे 35बाय35 चा तलाव केला आहे व तात मांगुर हा मासा सोडला आहे
तरी मला तात कोनते औषध सोडावे लागेल हे सांगावे ही विनंती माझा नं-95*****15

किरण पवार Jun 01, 2017 11:59 AM

मला नाशिक जिल्ह्यात नांदगाव येथे मत्स्यव्यवसाय करायचा आहे मी मुंबईत राहतो मला प्रशिक्षण घ्यायचे आहे त्याचा पत्ता हवा आहे

सूर्यकांत कासे May 17, 2017 10:38 PM

मी रायगड जिल्हा माणगाव तालुक्यातील तिलोरे गावचा रहिवाशि असून मि नदिकिनारी 33बाय33मीटर लाम्बिचे तलाव खोदले आहे तरी त्यात कोणत्या जातीचे मासे सोडावे या विषयी कृपया खाली दिलेलयामोबाइल वर मार्गदर्शन करावे करावे 70*****24

फैसल पटेल Mar 30, 2017 10:07 AM

मी तलाव तयार केला आहे.ही तलाव माळ जमिनी वर आहे.तिथे मी मासे पालन करू शकते काय ?पिलिज हा क्रमांकावर माहिती पटवून सहकार्य करा ८००७२५३७४४
*****@gmail.com

Santosh zore Feb 14, 2017 12:21 PM

मला privaite तलाव मासे शेती साठी करावयाचे आहे त्यासाठी मला लाम्बी , रुंदी & खोलीं या बाबत् मार्गदर्शन करावे ही नम्र विनती pliz fast my mobile number 82*****54

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:16:8.618260 GMT+0530

T24 2019/05/26 00:16:8.624378 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:16:8.265436 GMT+0530

T612019/05/26 00:16:8.285287 GMT+0530

T622019/05/26 00:16:8.318151 GMT+0530

T632019/05/26 00:16:8.318937 GMT+0530