इटली
इटली : यूरोपच्या दक्षिणेकडील, आल्प्सपासून भूमध्य समुद्रात शिरलेले, बुटासह पायाच्या आकाराचे प्रजासत्ताक राष्ट्र. मुख्य द्वीपकल्पाशिवाय यात सार्डिनिया (२४,०८० चौ. किमी.) व सिसिली (२५,७४८ चौ. किमी.) या मोठ्या आणि एल्बा, जील्यो, इस्किया, काप्री, लिथारी, पांतेल्लेरीया, लँपडूसा इ. सु. ७० लहान बेटांचा समावेश होतो.