कटक
कटक : ओरिसा राज्याची १९५८ पूर्वीची राजधानी; आता कटक जिल्ह्याचे प्रमुख ठाणे, लोकसंख्या औद्योगिक व शासकीय वस्तीविभागांसह २,०५,७५९(१९७१). महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या शिखरस्थानी, पाण्याने वेढलेल्या या ठिकाणी, संरक्षक तटबंदी करून अनंगभीमदेव राजाने तेराव्या शतकात येथे बाराबती नावाने प्रसिध्द असलेला किल्ला बांधला. हा किल्ला नऊ मजल्यांचा होता.