टेनेसी
टेनेसी : अमेरिकेच्या ‘पूर्व दक्षिणमध्य’ विभागातील एक राज्य. क्षेत्रफळ १,०९,४११ चौ. किमी.पैकी पाण्याखाली १,२४८ चौ. किमी. लोकसंख्या ४१,२६,००० (१९७३). विस्तार ३५° उ. ते ३६° ४१' उ. आणि ८१° ४०' प. ते ९०० १८' प. यांदरम्यान. याच्या दक्षिणेस जॉर्जिया, ॲलाबॅमा व मिसिसिपी, मिसिसिपी नदीच्या पलीकडे पश्चिमेस आर्कॅन्सा व मिसूरी, उत्तरेस केंटकी व व्हर्जिनिया आणि पूर्वेस नॉर्थ कॅरोलायना ही राज्ये आहेत. नॅशव्हिल ही राजधानी आहे.