गुग्गूळ
गुग्गूळ : (हिं. गुगूळ; गु. गुग्गुळे, मुकुल; क. गुग्गुळा; सं. देवधूप, उदीप्ता, गुग्गुळ; इं. गम-गुगूल; लॅ. कॉमिफोरा मुकुल, बाल्समोडेंड्रॉन मुकुल; कुल-बर्सेरेसी). हा सु. १·२ — १·८ मी. उंच, पानझडी वृक्ष बलुचिस्तान, सिंध, अरबस्तान व भारत (खानदेश, सौराष्ट्र, राजस्थान, बिहार, कर्नाटक इ.) या देशांत रुक्ष व खडकाळ जमिनीवर आढळतो.