অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गंधपुरा

गंधपुरा

गंधपुरा

(सं.हेमंत-हरित; इं. विटरग्रीन; लॅ. गॉल्थेरिया फ्रॅग्रँटिसिमा ; कुल-एरिकेसी). हे सु. ३ मी.उंच, बहुशाखित (खूप फांद्या असलेले), सदापर्णी व सुगंधी क्षुप (झुडूप) पूर्व हिमालय, खासी टेकड्या, दक्षिण भारत (निलगिरी) येथे आढळते. याचे खासी नाव ‘जिऱ्हाप’ आहे.

साल शेंदरट तपकिरी; पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), चिवट, दातेरी, प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त). फुले लहान, हिरवट पांढरी, कक्षास्थ (बगलेतील) मंजरीवर येतात. बोंडे गोलसर, निळ्या मांसल संवर्ताने (पुष्पकोशाने) वेढलेली व खाद्य असतात [→ एरिकेलीझ].

ताज्या पानांपासून बाष्पनशील (उडून जाणारे) तेल (‘विंटरग्रीन तेल’) काढतात; ते संधिवातावर लावतात, मलमे व लेपात घालतात आणि अंकुशकृमीवर (तोंडात आकड्यासारखी संरचना असलेल्या कृमीवर) पोटात देतात.

ते जंतुनाशक, उत्तेजक व वायुनाशी असते. ते रंगहीन असून त्याचा स्वाद सौम्य असतो; पेये, मिठाई व दंतधावनात घालतात. कर्करोग व गुल्मावर ते परिणामकारक असल्याचे काही प्राण्यांवरील प्रयोगांत आढळले आहे.

अमेरिकेत गॉल्थेरि या प्रोकंबेन्स या जातीपासून ‘गॉल्थेरिया तेल’ काढतात, तेही विंटरग्रीन तेलाप्रमाणेच असते. गॉल्थेरियाच्या काही जाती शोभेकरिता बागेत लावतात.

 

लेखक - शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate