‘नीश’ : अर्थात, ‘या सम हा!’
'नीश' बद्दलच्या विविध जीवशास्त्रज्ञांच्या मतांचा गोषवारा काढल्यास, थोडक्यात असे म्हणता येईल की, सजीवाचे पर्यावरणातील विशिष्ट कार्य आणि भूमिका यांना अनुसरून असलेले एकमेव स्थान म्हणजे त्या सजीवाचा ‘नीश’; आणि ‘नीश’ मध्ये समाविष्ट असणारे प्रमुख घटक म्हणजे, सजीवाचा अधिवास, सजीवाची विशिष्ट कार्यपद्धती आणि त्या कार्यपद्धतीद्वारे अधिवासातून सजीव स्वतःसाठी प्राप्त करीत असलेली संसाधने. या सर्व वर्णनांतून आपल्या लक्षात येईल की, ‘नीश’चा अभ्यास, निसर्गातील प्रत्येक सजीवाचे स्वतंत्र अस्तित्त्व मान्य करणारा, त्याला केंद्रस्थानी किंवा नायकाच्या भूमिकेत ठेवणारा आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा असा अभ्यास आहे.