वानशिएन
विद्यमान वानशियान. मध्य चीनमधील सेचवान प्रांतातील एक प्रमुख व्यापारी नदीबंदर व शहर. लोकसंख्या १,६०,००० (१९८२ अंदाज). ते नानचुंगच्या पूर्वेस सु. १७८ किमी. व चुंगकिंगच्या ईशान्येस २१९ किमी. वर यांगत्सी नदीच्या डाव्या काठावर वसले आहे. सेचवान प्रांताच्या पूर्व भागाचे ते प्रशासकीय केंद्र आहे.