प्रस्तावना
राज्यात खरिपात पाऊस न झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे कोणतेही पीक शेतक-यांच्या हाती लागले नाही. ओलात्यावरही येतात. पिकांची योग्य निवड करून त्यासाठी शिफारस केलेले आधुनिक तंत्रज्ञान अवलंबिल्यास उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होऊ शकते.
जमिनीची निवड, मशागत व ओलावा
कोरडवाहू पिकासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडाची. खरिपातील मूग व उडीद यांचे पीक काढल्यानंतर वखराच्या सहाय्याने उताराला आडची मशागत करावी. त्यामुळे पावसाचे पिकांची वाढ व उत्पादनासाठी होईल. सोयाबीन काढल्यानंतर जमिनीची मशागत करून पेरणी केल्यास ओलाव्याच्या अभावामुळे पिकांची उगवण कमी होते.
अति उथळ जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असल्याने रब्बी हंगामात कोणतेही पीक घेणे या जमिनीवर फायदेशीर राहत नाही. मध्यम खोल आणि खोल जमिनीसाठी खरीप पिकाबरोबर रब्बी पिके तसेच आंतरपीक पद्धती आणि दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा.
पिकांच्या लागवडीची सूत्रे : रब्बी ज्वारी
- पेरणीपूर्व एक महिना मध्यम ते भारी जमिनीमध्ये बळीराम नांगराने उताराला आडव्या सन्या काढून पावसाचे पाणी जमिनीत मुरवावे.
- जमिनीच्या प्रकारानुसार मालदांडी-३५–१, ज्योती, एस.पी.व्ही.- ८३९, एस.पी.व्ही.-६५५, यशोदा, परभणी मोती या वाणांचा वापर
- हेक्टरी १० किलो बियाणे पेरावे व खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळेवर पेरणी करून बियाण्थाला ३५ टक्के थायोमिथोक्झॅम ५ ग्रॅम प्रतिकिलो चोळून बीजप्रक्रिया करावी.
- कोणी रोगाच्या प्रतिबंधासाठी ३QQ मेष गंधक ४ ग्रॅम प्रतिकेिली या प्रमाणात बियाण्याला चोळून वापर करावा.
- ओलाल्यासाठी दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी. (१८ इंच) करावे. विरळणी पहिल्या २० दिवसांत करून दोन रौपांतील अंतर १५ ते १७ सॅमी. ठेवावे. हेक्टरी ताटांची संख्या १ लाख ३५ हजार ठेवावी.
जमीन व पिके
मध्यम जमीन : सूर्यफूल, करडई मध्यम खोल जमीन : रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, रब्बी ज्वारी + करडई, करडई + हरभरा.
खोल जमीन : रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही सलग पिके करडई, हरभरा या दुबार पीक पद्धती घ्याव्यात.
सरी काढून पेरणी : यामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामात ४ अथवा ६ ओळींनंतर सरी काढणे, रुंद वरंबा-सरी पद्धतीचा अवलंब करणे हे जमीन आणि पाणी संवर्धनासाठी महत्त्चाचे आहे. या तंत्राने पावसाचे पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणात साठविलें जाते. त्यामुळे रब्बी पीक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते. पेरणीपूर्व एक महिना मध्यम ते भारी, ४५ सेंमी. खोल जमिनीवर ४५ सेंमी. ठेवून सन्या काढन्यात. योग्य ओलावा असताना तिफणीच्या सहाय्याने पेरणी करावी.
सरीमध्ये पेरणी केल्यानंतर रासणी करू नये. यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमधील पावसाचे पाणी जमिनीत मुरून पिकाला ओलाचा उपलब्ध होतो. सोयाबीन या पिकांमधील तणांचा बंदोबस्त योग्य वेळी केल्यास जमिनीमध्ये दीर्घ काळ ओलाचा टिकून रब्बी हंगामातील दुबार पिकाचे उत्पादन अधिक मिळते. रब्बीसाठी मृदा संधारण, सुधारित जातींची निवड, वेळेवर मशागत व पेरणी, तणांचा ओलावा, आपत्कालीन पीक योजनांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
सिंचनाची सोय असल्यास पीक पोटरीत असताना किंवा फुलोन्यात असताना किंवा कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादनात भरघोस चाढ़ होते.
- खोडमाशी, माचा, चिकटा इ. प्रादुर्भाव आढळल्यास शिफारशीनुसार कीटकनाशकांच्था फवारण्था कराव्थात.
हराभरा
- जमिनीच्या प्रकारानुसार विजय, आकाश, विशाल, विराट, बीडीएन९३. जी-१२, आयसीसीन्ही-२ या जाती पेराव्यात.
- कोरडवाहू परिस्थितीमध्ये हरभप्याची पेरणी सप्टेंबरचा तिसरा आठवडा ते १५ ऑक्टोबरपर्यंत करावी. हेक्टरी ६० ते ६५ केिली बियाणे वापरावे.
- हरभरयामध्ये मर रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्व प्रतिकेिली ३ ग्रॅम किंवा २ ग्रॅम काबॅडझिम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. त्यानंतर रायझोबियम व पीएसबी हे जिवाणुसंवर्धक बियाण्यास चोळावे.
- हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद पेरताना खोल पेरून द्यावे.
- पीक तीन आठवड्यांचे झाल्यावर १० ते १५ दिवसांच्या अंतराने ३ कोळपण्या कराव्यात.
- हरभरापिकास २ टक्के डीएपी (२०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा २ टक्के युरिया द्रावणाची पहिली फवारणी फुले येण्यापूर्वी आणि त्यानंतर १० ते १२ दिवसांनी दुसरी फवारणी केल्यास दाणे चांगले भरुन उत्पादनात वाढ होते.
- हरभ-याला घाटे भरण्याच्या अवस्थेत 1 टका १३.०.४५ (पोटॅशियम नायट्रेट)ची फवारणी करावी.
घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादनात २८ टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच दोन पाणी उपलब्ध असल्यास पहिले पाणी फुलोरा अवस्था व दुसरे पाणी घाटे भरण्याच्या अवस्थेत दिल्यास उत्पादनात ५२ टक्के वाढ होते. घाटेअळीचा बंदोबस्त अळी लहान असतानाच एकात्मिक कोड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
करडई
- जमिनीच्या प्रकारानुसार पीबीएनएस- १२, भीमा, शारदा, तारा, अनेगिरी या जातींचा वापर करावा. हेक्टरी १० ते १२ केिली बीजप्रक्रिया केलेलं बियाणे वापरावे. पेरणी १८ ×२० सेंमी. अंतरावर करावी.
- ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात पेरणी करावी.
- करडईमध्ये मर रोगापासून संरक्षणासाठी पेरणीपूर्व प्रतिकिलो बियाण्याला ३ ग्रॅम किंवा २ ग्रॅम काबँडझिम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. त्यानंतर अॅसेटोबॅक्टर व पीएसबी जिवाणुसंवर्धक बियाण्याला चोळावे.
- हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरदबियाणे पेरताना खोल पेरुन द्यावे.
- पीक तीन आठवड्यांचे झाल्यावर १o ते १२ दिवसांच्या अंतराने कोळपण्था कराव्यात. पाण्याची उपलब्धता असल्यास सोंडओळ पद्धतीने किंवा रुंद वरंबा पद्धतीने पाणी द्यावे. जमिनीत पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. पिकाला बाल्यावस्था, फुलोरावस्था तसेच बोंड भरण्याच्या वेळी पाणी द्यावे. - करडईवर मान्याचा प्रादुर्भाच मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी डायमिथोएट ३० ईसी. ७५० मिलि/हे. ५०० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कोरडवाहू आंतरपीक पद्धती
रब्बी हंगामात आपत्कालीन परिस्थितीत एक पीक नष्ट झाले, तरी दुस-या पिकापासून उत्पादन मिळण्यासाठी सलग पिकाऐवजी सुधारित पीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनात स्थिरता राहते.
- रब्बी ज्वारी अ करडई : ही आंतरपीक पद्धती, ज्या क्षेत्रात रब्बी जचारी मोठ्या प्रमाणात घेतली जाते अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्थात आली आहे. वातावरणातील उष्ण तापमानातील तफावतीमुळे ज्वारी अथवा करडई सलग पिकातील येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते ही आंतरपीक पद्धत ज्वारी : करडई (६:३) या ओळींच्या प्रमाणात शिफारस केलेली आहे.
- करडई अ हरभरा : मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आली आहे. ४:२ अथवा ६:३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतल्यास जास्त फायदा होतो.
- जवस अ हरभरा : मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. ६:३ अथवा ३:३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धत घेतल्यास जास्त फायदा होतो. याप्रकारे वरील दर्शविलेल्या सर्व तंत्रांचा शेतक-यांनी अवलंब केल्यास कोरड़वाहू रब्बी पीक उत्पादनात वाढ़ होईल .
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन