Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/06 10:28:49.898752 GMT+0530
मुख्य / मदत
शेअर करा

T3 2020/06/06 10:28:49.900944 GMT+0530

T4 2020/06/06 10:28:49.902542 GMT+0530

मदत

पोर्टलचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी खालील विषय आपणांस मदत करतील.

या पोर्टलमध्ये विभाग

ह्या पोर्टलद्वारे आपणांस सहा मुख्य विषय विभागाशी संबंधित माहिती पुरवली जाते - शेती, आरोग्य, शिक्षण, -शासन, समाजकल्याण आणि ऊर्जा. प्रत्येक विषय विभाग अंतर्गत पुरवल्या जाणार्‍या माहितीचा सारांश खाली दिला आहे.

मुख्य विषय

शेती

शेती ह्या विभागामध्ये शेतीविषयक पतपुरवठा, धोरणे व योजना, उत्पादन-तंत्रज्ञान, पशुपालन व मस्त्यपालन, हवामान, बाजारपेठांची माहिती, सर्वोत्तम कार्यपद्धती, शेती आधारित व्यवसाय तसेच इतर व्यवसायांची आणि शेतीविषयक संस्थांची माहिती दिली आहे.

आरोग्य

आरोग्य विभागातील माहितीचा भर महिला व बालकांच्या आरोग्यावर असून ह्यामध्ये मलनिःस्सारण व स्वच्छता, सर्वत्र आढळणारे आजार, धोरणे व योजना, प्रथमोपचार आणि मानसिक आरोग्य अशा इतरही विविध विषयांची माहिती दिली आहे.

शिक्षण

ह्या विभागाद्वारे विद्यार्थी व शिक्षकांना शैक्षणिक स्रोत पुरवले जातात तसेच बालहक्क, दर्जेदार शिक्षण ह्याबाबतची माहिती दिली जाते

इ-शासन

ह्या विषयाद्वारे सध्या ऑनलाइन मिळू शकणार्‍या नागरी सुविधा, इ-शासनासंबंधात विविध राज्यांनी घेतलेले पुढाकार, शासन आपल्या दारी, माहितीचा अधिकार इ. बाबतची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते

समाजकल्याण

ह्या विषयामधून आपणांस महिला व बालविकास, अनुसूचित जाती-जमाती, अलपसंख्यांक, अपंग तसेच ज्येष्ठ नागरिकांचेचे कल्याण, गरिबी दूर करणे, आपत्ती व्यवस्थापन इ. बाबींची माहिती मिळते.

ऊर्जा

ऊर्जा विभागाद्वारे वाचकांना तंत्रज्ञान, सर्वोत्तम कार्यपद्धती, धोरणे व योजना तसेच ऊर्जा, ऊर्जाबचत, सुधारित ऊर्जा-कार्यक्षमता, पुनर्वापरयोग्य स्रोतांमधून अधिकाधिक ऊर्जा मिळवणे ह्यांसंबंधीची साठवलेली माहिती पुरवली जाते.

ऑनलाइन सेवा

व्यापार

हा ऑनलाइन ग्राहक-विक्रेता मंच आपणांस आपली उत्पादने तसेच सेवांसाठी चांगली बाजारपेठ मिळविण्याची संधी देतो. कृषि, पशुधन, हस्तकलेच्या वस्तू, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. शी संबंधित माहिती आपण पाठवू शकता. तसेच, वस्तू किंवा सेवा भाड्याने घेणे तसेच सल्लासेवेबाबतचे तपशीलही आपणांस मिळू शकतात.

तज्ञाला विचारा

हा ऑनलाइन मंच निवडक विषयांवरील समस्यांना तज्ञांकडून निवारण मिळवून देतो. प्रश्नकर्ते आपल्या भाषेत प्रश्न पाठवू शकतात आणि इमेलद्वारे तज्ञांचा सल्ला मिळवू शकतात.

सामान्यज्ञान चाचणी

शाळकरी मुलामुलींचे सामान्यज्ञान तपासणे आणि त्यांची कामगिरी तसेच आत्मविश्वास वाढवणे हाच ही ऑनलाइन चाचणी विकसित करण्यामागील हेतू आहे. ह्या प्रश्न-चाचणीमध्ये इयत्ता तिसरी ते दहावीतील विद्यार्थी भाग घेऊ शकतात.

स्मरणक

वेबवर आधारित असलेल्या ह्या सेवेच्‍याद्वारे नोंदणीकृत वापरकर्त्याला त्याच्या महत्त्वाच्या आर्थिक बाबींविषयी एसएमएस तसेच ईमेलने आठवण करून दिली जाते. ह्यामुळे लोकांना आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन चांगल्या रीतीने करता येते.

व्हीएलई कट्टा

हा मंच संपूर्ण भारतातील सामाईक सेवा केंद्रांच्या खेडेपातळीवरील उद्योजकांना (VLEs) उपयुक्त स्रोत-साधने पुरवितो. तसेच ह्यामुळे VLEs ना आपले अनुभव इतरांना सांगण्याची संधी मिळते.

इ-शिक्षण अभ्यासक्रम

महिला, विद्यार्थी, युवावर्ग आणि वंचित जमातीतील व्यक्तींचे शेती, माहितीचा अधिकार, वित्तीय समावेश इ. विषयांबाबतचे ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी अनेक अभ्यासक्रम विविध भाषांतून येथे सादर केले आहेत

गर्भारपणातील आरोग्यासंबंधी जागृती करणारी, मोबाइल फोनवर आधारित, सुविधा – आई (MOTHER)

आई ही मोबाइल फोनवरून दिली जाणारी सुविधा आहे. प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतरचे आरोग्य, बाळाची काळजी इ. बाबतची माहिती गर्भवतींना तसेच स्तनपान करवणार्‍या मातांना, व्यक्तिगत स्वरूपाच्या आवाजी संदेशांद्वारे, त्यांच्या मोबाइल फोनवर थेट पुरवली जाते.

शिक्षणाचे स्रोत

मुलामुलींसाठी शिक्षणाचे डिजिटल स्रोत

विविध संस्था आणि तज्ञांनी तयार केलेले शास्त्र, गणित, भाषा इ. विषयांच्या शिक्षणाचे डिजिटल स्रोत येथे वापरकर्त्यांसाठी सादर केले गेले आहेत

शिशुसंरक्षक

शिशुसंरक्षक हे बहुभाषिक मल्टिमीडिया सादरीकरण युनिसेफने तयार केले आहे. गर्भवतींचे आणि स्तनपान करवणार्‍या मातांचे आरोग्य तसेच नवजात आणि अगदी कमी वयाच्या बाळांची काळजी घेण्यासंबंधीची माहिती ह्याद्वारे पुरवली जाते

ज्ञान केंद्राच्या चालकांसाठी माहिती तंत्रज्ञानाची मूलतत्त्वे

ह्या पुस्तिकेमध्ये संगणकाची मूलतत्वे, इंटरनेट आणि इमेलची संकल्पना, कळफलकाचे (किबोर्ड) शॉर्टकटस्, उपयुक्त वेबसाइट्सची निर्देशिका, स्थानिक भाषेतून संगणक वापरणे ह्यांसारख्या विषयांची माहिती दिली आहे. हि माहिती हिंदी, तेलगू आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध.

ज्ञान केंद्राच्या चालकांसाठी माहिती तंत्रज्ञानाची मूलतत्त्वे

ह्या पुस्तिकेमध्ये संगणकाची मूलतत्वे, इंटरनेट आणि इमेलची संकल्पना, कळफलकाचे (किबोर्ड) शॉर्टकटस्, उपयुक्त वेबसाइट्सची निर्देशिका, स्थानिक भाषेतून संगणक वापरणे ह्यांसारख्या विषयांची माहिती दिली आहे. हि माहिती हिंदी, तेलगू आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध.

हार्डवेअरमधील प्राथमिक समस्यांचे निवारण

ह्या पुस्तिकेमध्ये हार्डवेअरच्या समस्या सोडवण्याबाबतची माहिती आणि उपयुक्त सूचना पुरवल्या आहेत. ही पुस्तिका हिंदी, तेलगू आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

मल्टिमीडिया उत्पादने

पोषण आणि आरोग्य

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय पोषण संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन – NIN) ह्या महत्त्वपूर्ण संस्थेच्या सहकार्याने ही सर्वसमावेशक बहुभाषिक सीडी विकसित केली गेली आहे. ह्या सीडीमधील आशयाचे चार मुख्य शीर्षकांखाली वर्गीकरण केले आहे – आपले अन्न जाणून घ्या, पोषणमूल्यांची गरज आणि त्यांचे स्रोत, अन्न आणि आजार, अन्न-सुरक्षितता. सांप्रदायिक पातळीवर काम करणारे आरोग्यसेवक, उप-वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, वैद्यकीय व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी तसेच आरोग्यपूर्ण जीवनशैलीतील अन्नपदार्थांची भूमिका समजून घेणार्‍या आणि अन्नाविषयी अधिक माहिती हवी असलेल्या सर्वांनाच ही सीडी उपयोगी पडेल. ही सीडी इंग्रजीसोबत अन्य सहा मुख्य भारतीय भाषांमध्ये मिळते.

औषधी, सुगंधी आणि रंगद्रव्ययुक्त पिकांचे उत्पादन

ह्या परस्परसंवादी (इंटरऍक्टिव्ह) सीडीमध्ये महत्त्वाच्या ५४ औषधी, सुगंधी आणि रंगद्रव्ययुक्त पिकांची माहिती आहे. ह्यामध्ये राष्ट्रीय औषधी वनस्पती बोर्डाने प्राधान्य दिलेल्या पिकांचाही समावेश आहे. ह्या सीडीद्वारे उत्पादन, उत्पादने आणि त्यांच्या विपणनाबाबतची (मार्केटिंग) सर्वसमावेशक माहिती स्थानिक भाषेमध्ये मिळते. ही सीडी हिंदी, तेलगू, तमिळ आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

तांदुळाचे पीक तयार होण्याच्या सुमारास उद्भवणारी जोखीम कमी करण्यासाठी मार्गदर्शन

तमिळनाडमधील मदुराई येथे असलेल्या CCD च्या सहयोगाने तयार केलेल्या मल्टिमीडिया सीडीमधून आपत्तींचे परिणाम कमी करण्याच्या मूलभूत गरजेसंबंधीच्या धोरणातील चार मुख्य मुद्द्यांची संपूर्ण माहिती मिळते. तमिळनाडूतील कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशातील सुनामीग्रस्त शेतकर्‍यांच्या सहभागातून चार वर्षे केलेल्या एका प्रयोगातून ह्या सीडीचा आशय तयार केला गेला आहे. ह्या प्रयोगातून पुढे आलेली धोरणे राबवण्याच्या उपयुक्त पद्धतींची थोडक्यात माहिती ह्या सीडीद्वारे मिळते. ह्या मल्टिमीडिया माहिती-स्रोताचा वापर स्वतःच शिकण्यासाठी तसेच प्रत्यक्ष शेतावर विकास-कार्य करणार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी करता येईल. ही सीडी संशोधक आणि विस्तार-अधिकार्‍यांसाठीही उपयुक्त आहे. हे उत्पादन तमिळ आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.

सुस्थिर व्यवसायम्

पिकाचे उत्पादन घेण्याच्या शाश्वत (टिकाऊ) कार्यपद्धतींची चर्चा ह्या उत्पादनात केली आहे. ह्यामध्ये भरपूर चित्रे तसेच प्रत्यक्ष शेतावर उपयोगी पडतील असे व्हीडिओ आहेत. शेतकरी तसेच स्वयंसेवी संस्थांना (NGOs) ह्यातील माहिती उपयुक्त आहे. ह्या आशयास शाश्वत शेती केंद्र आणि हैद्राबाद येथील SERP चे समर्थन आहे. हे उत्पादन तमिळ भाषेत उपलब्ध आहे.

शोध सुविधेचा वापर करणे

शोध कार्यान्वितता

शोध (सर्च) सुविधेमुळे वापरकर्त्यांना इच्छित आशयापर्यंत चटकन पोचणे सोपे जाते. पोर्टलवरील प्रत्येक पानासाठी शोध-सुविधा उपलब्ध आहे. तसेच ह्या सुविधेमुळे शोध पोर्टलवरील आशयापुरता मर्यादित ठेवणे शक्य होते, संपूर्ण इंटरनेट शोधण्याची गरज राहात नाही.

खालील बाबींचा वापर करून पोर्टलमधील ह्या शोध सुविधेद्वारे शोध घेता येतो –

 • विशिष्ट अक्षर, शब्द अथवा शब्दसमूह.
 • शब्द अथवा शब्दसमूहांमधील जागा.
 • शब्दामधील विकल्प बोधक (जसे आणि, किंवा).
थेट (लाइव्ह) शोध

थेट शोध ह्या सुविधेमुळे पोर्टलमधील शोधाची क्षमता वाढते. वापरकर्ता शोधपट्टीमध्ये अक्षरे टाइप करीत असताना संपूर्ण शोध प्रक्रिया सुलभ होते आणि घेतल्या जाणार्‍या शोधाशी जुळणार्‍या सर्व संभाव्य बाबी शोध-खिडकीमध्ये दाखवल्या जातात. शोधाला मिळणार्‍या ह्या थेट प्रतिसादामुळे आशय जलद गतीने तसेच अधिक परिणामकारक रीतीने शोधता येतो.

 

पोर्टल वापरणे

अनेक व्यक्तींनी स्वतःहोऊन पुरवलेली माहिती, चित्रे, फाइल्स तसेच त्यांच्या विशिष्ट ज्ञानशाखेशी संबंधित बाबींमुळेच पोर्टलवर दिसणारा आशय दाखवणे शक्य झाले आहे.हे पोर्टल चार प्रकारच्या वापरकर्त्यांना पाठिंबा देते –

 • निनावी अथवा अज्ञात वापरकर्ता
 • नोंदणीकृत सदस्य
 • आशय-लेखक
 • आशय-परीक्षक
प्रत्येक प्रकारच्या वापरकर्त्याला मिळणारे लाभ खालील विभागांमध्ये थोडक्यात सांगितले आहेत.

निनावी अथवा अज्ञात वापरकर्ता

निनावी अथवा अज्ञात वापरकर्त्याच्या रूपाने आपण –

 • आशय ब्राउझ करू शकता
 • आशयाचा शोध घेऊ शकता
 • इमेल किंवा सोशल मीडियामार्फत आशयाचा सामाईक वापर करू शकता (आशयाची देवाण घेवाण करू शकता)
 • पृष्ठाचे मूल्यांकन करा
  • स्क्रोल करून पृष्ठाच्या शेवटापर्यंत जा
  • ‘पृष्ठ मूल्यांकन’ विभागातील त्या पृष्ठासाठीच्या तार्‍यावर क्लिक करा
 • एखाद्या पृष्ठासाठी सूचना करा / पृष्ठावर टिप्पणी करा
  • स्क्रोल करून पृष्ठाच्या शेवटापर्यंत जा
  • आपली सूचना पोस्ट करा विभागात आपले नाव आणि सूचना एंटर करा
  • ‘सादर करा’ वर क्लिक करा
 • मतचाचणीमध्ये मत नोंदवा
  • मुख्य पृष्ठावरील ‘मतचाचणी’ वर क्लिक करा
  • आपण निवडलेला पर्याय आणि ‘मत नोंदवा’ वर क्लिक करा
  • ह्यापूर्वी घेतलेल्या मतचाचण्यांचे निकाल पाहण्यासाठी ‘ह्यापूर्वीच्या मतचाचण्या’ वर क्लिक करा
 • वार्तापत्राचे सभासद व्हा
  • ‘मुख्य पृष्ठ’ वरील ‘वार्तापत्राचे सभासद व्हा’ वर क्लिक करा
  • स्वतःची इमेल आयडी एंटर करा आणि ‘सादर करा’ वर क्लिक करा
 • पोर्टलवर अभिप्राय व्यक्त करा
  • ‘मुख्य पृष्ठ’ वरील ‘आपला अभिप्राय नोंदवा’ वर क्लिक करा
  • स्वतःचे ‘नाव’, इमेल आणि अभिप्राय एंटर करा
  • सादर करा वर क्लिक करा
 • RSS फीडचे सभासद व्हा
  • स्क्रोल करून पृष्ठाच्या तळपट्टीवर जा
  • तेथील प्रतीकचिह्नावर क्लिक करा
  • तत्काळ अद्यतने मिळवण्यासाठी कोणत्याही विभागाचे सभासद व्हा
 • सदस्य किंवा आशय-लेखक व्हा
  • उजवीकडील वरील कोपर्‍यातील ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा
  • पर्याय निवडा – सदस्य किंवा आशय-लेखक
  • आवश्यक तपशील भरा
  • ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा

नोंदणीकृत सदस्य

नोंदणीकृत सदस्य झाल्यानंतर आपणांस निनावी अथवा अज्ञात वापरकर्त्याला मिळणारे सर्व लाभ मिळतात. ह्याशिवाय आपण –

 • आपली प्रोफाइल अद्यावत करू शकता
  • उजवीकडील वरील कोपर्‍यात दर्शवल्या गेलेल्या आपल्या वापरकर्त्याचे नाव वर क्लिक करा
  • तेथे दर्शवल्या जाणार्‍या सूचीतील ‘प्रोफाइल’ वर क्लिक करा
  • आपली प्रोफाइल दर्शवली जाते आणि आपण तीमध्ये बदल करू शकता
 • आपला डॅशबोर्ड अनुकूलित (कस्टम) करू शकता
  • उजवीकडील वरील कोपर्‍यात दर्शवल्या गेलेल्या आपल्या वापरकर्त्याचे नाव वर क्लिक करा
  • तेथे दर्शवल्या जाणार्‍या सूचीतील ‘डॅशबोर्ड’ वर क्लिक करा
  • तेथे डॅशबोर्डचे नित्यचित्र (डीफॉल्ट) दर्शवले जाते
  • डॅशबोर्डचे अनुकूलन करण्यासाठी ‘संपादन करा’ वर क्लिक करा
 • आपण दिलेले अंशदान पाहू शकता
  • उजवीकडील वरील कोपर्‍यात दर्शवल्या गेलेल्या आपल्या वापरकर्त्याचे नाव वर क्लिक करा
  • तेथे दर्शवल्या जाणार्‍या सूचीतील ‘माझे अंशदान’ वर क्लिक करा
  • आपण आत्तापर्यंत केलेले सर्व अंशदान (अभिप्राय, सूचना, चर्चेचे मुद्दे इ.) दर्शवले जातात
 • चर्चामंचावर विषयांची चर्चा करू शकता
  • कोणत्याही विभागामधील एखाद्या चर्चामंचावर क्लिक करा
  • आपल्या आवडीनुसार एक चर्चामंच निवडा
  • त्या मंचावर सूचित केलेले विषय पहा
  • आपल्या आवडीचा एक विषय निवडा
  • चर्चा पहा आणि आपले मत नोंदवण्यासाठी ‘ह्याला उत्तर द्या’ वर क्लिक करा

आशय लेखक

आशय लेखक झाल्यानंतर आपणांस नोंदणीकृत सदस्याला मिळणारे सर्व लाभ मिळतात. ह्याशिवाय आपण –

 • आशयाची पृष्ठे सामील करू शकता
  • ज्या विभागामध्ये आपणांस आशय-लेखक रूपात मान्यता असेल तेथे आपण नवीन पृष्ठ सामील करू शकता
  • ज्या मेनू-पृष्ठामध्ये आपणांस नवीन पृष्ठ सामील करायचे असेल तेथे उपलब्ध असलेल्या ‘नवीन सामील करा’ पर्यायावर क्लिक करा
  • पृष्ठाचे ‘शीर्षक’ तसेच ‘सारांश’ एंटर करा आणि ‘मुख्य मजकूर’ मध्ये आशय एंटर करण्यास आरंभ करा
  • बदल दर्शवणारी टिप्पणी शेवटी सामील करा
  • ‘जतन करा’ वर क्लिक करा
 • आशय पृष्ठांचे संपादन करू शकता
  • ज्या विभागात आपणांस आशय-लेखक रूपात मान्यता असेल त्यामधील पृष्ठांचे आपण संपादन करू शकता
  • पृष्ठाची स्थिती समजण्यासाठी ‘हिरव्या पट्टी’ च्या वरील उजव्या कोपर्‍यात क्लिक करा. जी पृष्ठे ‘संपादनासाठी खुली’ किंवा ‘परीक्षण सुरू आहे’ स्थितीमध्ये असतील त्यांचे संपादन आपण करू शकता.
  • ‘संपादन करा’ वर क्लिक करा. ‘संपादन करा’ खिडकी दर्शवली जाईल. योग्य ते बदल करा
  • ‘जतन करा’ वर क्लिक करा

आशय परीक्षक

आशय परीक्षक झाल्यानंतर आपणांस आशय-लेखकाला मिळणारे सर्व लाभ मिळतात. ह्याशिवाय आपण –

 • अलिकडील आयटेम्स पाहू शकता
  • उजवीकडील वरील कोपर्‍यात दर्शवलेल्या आपल्या वापरकर्त्याचे नाव वर क्लिक करा
  • तेथे दिसणार्‍या सूचीमधील ‘अलिकडील आयटेम्स’ वर क्लिक करा
  • ज्या पृष्ठांमध्ये बदल झाले असतील अशी सर्व पृष्ठे सूचित केली जातात
 • परीक्षण सूची पाहू शकता
  • उजवीकडील वरील कोपर्‍यात दर्शवलेल्या आपल्या वापरकर्त्याचे नाव वर क्लिक करा
  • तेथे दिसणार्‍या सूचीमधील ‘परीक्षण सूची’ वर क्लिक करा
  • ज्या पृष्ठांमध्ये बदल झाले असतील आणि ज्यांचे परीक्षण करणे आवश्यक असेल अशी सर्व पृष्ठे सूचित केली जातात
 • आशय पृष्ठाचे परीक्षण / संपादन करू शकता
  • ज्या विभागामध्ये आपणांस ‘आशय परीक्षक’ रूपात मान्यता असेल त्यामधील पृष्ठांचे आपण परीक्षण करू शकता
  • एखाद्या पृष्ठामध्ये केलेल्या बदलांचा इतिहास पाहण्यासाठी ‘इतिहास(संपादन)’ वर क्लिक करा
  • केलेल्या बदलांचे परीक्षण करा
  • ‘परीक्षणाचा दिनांक’ वर क्लिक करा
  • परीक्षणामध्ये दिनांक सामील करा
  • सर्व बदलांचे परीक्षण पूर्ण झाले असल्यास स्थिती ‘प्रकाशित करा’ अशी बदला. अन्यथा स्थिती ‘परीक्षण करा’ अशी बदला व त्यानंतर ‘जतन करा’ वर क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी माहिती पुस्तिका डाऊनलोड करा


T5 2020/06/06 10:28:49.940220 GMT+0530

T24 2020/06/06 10:28:49.946218 GMT+0530
Back to top

T12020/06/06 10:28:49.874717 GMT+0530

T612020/06/06 10:28:49.889506 GMT+0530

T622020/06/06 10:28:49.890002 GMT+0530

T632020/06/06 10:28:49.890472 GMT+0530