मांस, शेतीमालातून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केले जाताहेत प्रयत्न अन्नातून विविध परजिवींचा प्रादुर्भाव होत असून, दरवर्षी अन्नपदार्थांतून विषबाधा होण्यामुळे लक्षावधी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. जागतिक पातळीवर धोकादायक ठरणाऱ्या मुख्य दहा परजिवींची यादी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने (WHO) नुकतीच जाहीर केली आहे.
जागतिक पातळीवर सामाजिक आणि आर्थिक बाबतीत या परजिवींमुळे मोठे नुकसान होते. असे असले तरी या परजिवींचा प्रादुर्भाव, मानवी शरीरामध्ये नेमका कसा प्रवेश होतो, त्यांची लागण कशी होते, या विषयी नेमकी माहिती उपलब्ध नाही. या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून अन्न आणि कृषी संघटनेने अधिक धोकादायक अशा पहिल्या दहा परजिवींवर लक्ष केंद्रित केले आहे. अन्नामध्ये बाधा करणाऱ्या परजिवींची निवड करण्यासाठी अनेक निकष लावले आहेत.
शास्त्रीय नाव- | मराठीतील नाव | कुठे आढळतात |
---|---|---|
1. तायनिया सोलियम (Taenia solium)- | वराहातील पट्टकृमी | वराहाच्या मांसामध्ये |
2. इचिनोकोक्कस ग्रॅन्युलोसस (Echinococcus granulosus)- | कुत्र्यातील पट्टकृमी | ताज्या मांसामध्ये, पदार्थामध्ये. |
3. इचिनोकोक्कस मल्टीलोक्युलॅरीस (Echinococcus multilocularis)- | पट्टकृमीचा एक प्रकार- | ताज्या मांसामध्ये. |
4. टॅक्सोप्लाझ्मा गोन्डिई (Toxoplasma gondii) | आदीजीव | वराह, गाय आणि कोंबडीचे मांस (रेड मीट) |
5. क्रिप्टोस्पोरीडिअम स्पे. (Cryptosporidium spp) | आदीजीव | -ताज्या खाद्य पदार्थात, फळाचे रस, दूध. |
6. -इन्टामोइबा हिस्टोलियटिका (Entamoeba histolytica ) | आदीजीव | ताज्या खाद्यपदार्थात. |
7. ट्रिचिनेल्ला स्पायरॅलिस (Trichinella spiralis )- | वराहातील कृमी | वराहाच्या मांसामध्ये. |
8. ओपिस्थोर्चिडीई (Opisthorchiidae) | पट्टकृमीच्या कुळातील | गोड्या पाण्यातील मासे. . |
9. अस्कारीस स्पे. (Ascaris spp ) | लहान आतड्यातील गोलकृमी- | ताज्या खाद्यपदार्थामध्ये. |
10. ट्रायपॅनोसोमा क्रुझी (Trypanosoma cruzi) | आदीजीव | फळांच्या रसामध्ये. |
सध्या जागतिक दहा मुख्य परजिवींची यादी ही सर्व देशातील प्रमुख दहा परजिवींची यादी असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये अत्यंत अचूक माहिती मिळवावी लागणार असल्याचे एफएओच्या अन्नसुरक्षा आणि दर्जाविषयक मुख्य रेनाटा क्लार्क यांनी सांगितले.
सध्या या परजिवीकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र, या यादीमुळे प्रत्येक देशामध्ये या विषयांचा धोरणकर्ते, माध्यमे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये गांभीर्याने विचार सुरू होईल.
परजिवींच्या प्रादुर्भावाचा धोका कमी करण्यासाठी...
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तोंडामध्ये अंकुश अथवा आकडे असलेल्या परजीवी, अपायका...
हे कवकांच्या (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीं...
सूक्ष्म, कृमीसारख्या, परजीवी (दुसऱ्या जीवांवर जगणा...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...