অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिक स्पर्धा

उद्देश :

कोल्हापूर जिल्हयातील कृषि उत्पादन व उत्पादनामध्ये वाढ करताना शेतक-यामध्ये जास्तीत जास्त चुरस निर्माण व्हावी यासाठी सन १९५९-६० पासून पिक स्पर्धा सुरु करण्यात आल्या आहेत.

अटी व शर्ती :

  • शेतक-याकडे त्याचे नावावर जमिन असली पाहिजे व ती जमिन तो स्वतः करत असला पाहिजे.
  • ऊस पिक स्पर्धेत प्रवेश मिळविण्यासाठी पात्र होण्याकरीता लहान शेतक-याकडे कमीत कमी ०.२० हेक्टर तर इतर शेतक-याकडे ०.४० हेक्टर एकत्रीत ऊसाचे क्षेत्र असणे आवश्यक आहे.
  • कोणत्याही पातळीवरील स्पर्धामध्ये ज्या स्पर्धकांना भाग घेवून बक्षीस मिळालेले नसेल अथवा ज्यानी स्पर्धेत नियमानुसार माघार घेतलेली असेल तर त्यांना पुन्हा त्याच पातळीवर त्याच हंगामासाठी त्याच पिकासाठी बक्षीस मिळेपर्यंत भाग घेता येतो.
  • ज्या स्पर्धकांना स्पर्धेत दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळालेला आहे अशा स्पर्धकांची इच्छा असलेस पुन्हा पुढील वर्षी त्याच पिकासाठी त्याच हंगामात त्याच पातळीवर प्रवेश फी भरुन भाग घेता येईल.
  • खालच्या पातळीवरील स्पर्धेत चालू सालच्या स्पर्धेत मागील ३ वर्षात पिक उत्पादनाच्या क्रमांकापुढे नमुद केल्याप्रमाणे आला असेल तर अशा शेतक-यांना नजीकच्या वरच्या पातळीवरील स्पर्धेत भाग घेता येईल.
  • स्पर्धा नियमावलीनुसार पुरेसे अर्ज न आल्यास स्पर्धा घडून येत नाहीत. त्यामुळे स्पर्धकाला वरच्या पातळीवरील स्पर्धेत भाग घेता येणार नाही. म्हणून विशेष पातळीवर सतत दोन वर्ष स्पध्रकाने अर्ज करुन देखील स्पर्धा घडून न आल्यास ती पातळी वगळून त्यापुढील नजीकच्या पातळीवर त्या स्पर्धकांना भाग घेता येईल
  • एकाचवेळी एकाच पिकासाठी दोन पातळीवरील स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
  • स्पर्धेसाठी पात्रता ही वैयक्तीक गुणवत्तेनुसार प्राप्त होत असल्याने स्पर्धकाचे वारसदारास स्पर्धेसाठी आवश्यक असणारी पात्रता ही वारस हक्काने प्राप्त होवू शकणार नाही. स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांपैकी सर्वसाधारण गटासाठी कमीत कमी सहा स्पर्धकांच्या पिकांची कापणी होणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत निरनिराळया पातळीवरील बक्षीसांची रक्कम खालिल तक्त्यांत दर्शविलेली आहे.

पातळी १ ला क्रमांक २ रा क्रमांक ३ रा क्रमांक
तालूका पातळी २५००/- १५००/- १०००/-
जिल्हा पातळी ५०००/- ३०००/- २०००/-
राज्य पातळी १००००/- ७०००/- ५०००/-

-----------------------------------------------------------------------------------------------

 

स्त्रोत :

अंतिम सुधारित : 6/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate