कृत्रिम उष्मायनात, इन्क्यूबेटरच्या मदतीने अंडी उबवितात. तापमान आणि सेटरमधील सापेक्ष आर्द्रता आणि उष्मनकारक खालील प्रमाणे आहेत:
तपमान (डिग्री फे.)
|
सापेक्ष आर्द्रता (%)
|
सेटर 99.5
|
61-63
|
उष्मनकारक (हॅचर) 99.5
|
85-90
|
अंडी दर रोज एका तासाभराच्या अंतराने फिरवावीत. अंडी वारंवार एकत्र करावीत म्हणजे ती मळणार व फुटणार नाहीत तसेच चांगले उष्मायन ही मिळेल.
|
उष्मायन (अंडी उबविणे)
टर्कीच्या बाबतीत 0-4 आठवड्यांच्या काळास उष्मायन काळ म्हणतात. तथापि, हिवाळ्यात उष्मायन काळ 5 ते 6 आठवड्यांपर्यंत वाढतो. मुख्यत्वे टर्कीच्या लहानग्यांना कोंबडीच्या पिलांच्या तुलनेत घिरट्या घालण्यासाठी दुप्पट जागेची गरज असते. एक दिवस वयाच्या पिलांना उबविण्यासाठी तांबड्या (लाल) रंगाच्या बल्बचा वापर केला जाऊ शकतो किंवा गॅस ब्रूडर आणि परंपरागत उष्मायन पध्दतीदेखील वापरता येतात.
|
ब्रूडिंगच्या काळांत लक्षात ठेवण्यासारख्या बाबी:
- 0-4 आठवडे वयाच्या प्रत्येक पक्ष्यासाठी 1.5 चौ.फू. जागेची आवश्यकता असते.
- लहानग्या पिलांच्या आगमनाच्या कमीत कमी दोन दिवस आधी उष्मायन गृह तयार ठेवावे.
- लहानग्या पिलांनी उष्णतेच्या स्त्रोतापासून लांब हिंडू नये म्हणून, कमीत कमी 1 फूट उंचीचे कुंपण लावावे.
- 2 मीटर व्यास असलेल्या वर्तुळाकृती जागेत केर-कचरा पसरवून ठेवावा.
- आरंभिक तपमान 95 डिग्री फे. ठेवावे ज्यामध्ये 4 आठवड्याच्या वयापर्यंत दर आठवडा 5 डिग्री फे. कपात करावी.
- उथळ पाण्याचा वापर करावा.
- जन्माच्या 4 आठवड्यांच्या दरम्यान सरासरी मृत्यु दर 6-10 टक्के आहे. सुरूवातीच्या काही दिवसांत लहानगी पिले, अंधुक दृष्टी आणि गोंधळल्यासारखी अवस्था असल्याने, मुळातच जास्त खात-पीत नाहीत. म्हणून, त्यांना बळेच भरवावे लागते.
|
|
लहान पिलांना खायला घालणे (बळेच भरवणे)
लहानग्या पिलांमध्ये उपाशी राहण्याची समस्या अकाली मृत्यु दराच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. म्हणून खायला घालतांना आणि पाणी पाजतांना फार जासत काळजी घ्यावी लागते. बळेच भरवितांना, पंधरा दिवसांपर्यत दर 10 पिलांना प्रत्येकी 1 ह्या दराने दर 1 लीटर पाण्यासह 100 मिली दूध आणि एक उकडलेले अंडे द्यावे. ह्यामुळे पिलांमध्ये प्रथिने आणि पोषक आहार यांची भरपाई होईल.
बोटांनी डब्यावर थापटून हलका आवाज केल्याने लहानगी पिले खाद्याकडे आकर्षित होतात. खाद्य व पाण्यात रंगीत गोट्या किंवा खडे टाकल्यासदेखील देखील पिलांना खाण्याकडे आकर्षित करता येईल. टर्कीना हिरवा पाला आवडतो त्यामुळे चिरलेली हिरवी पाने त्यांच्या खाद्यात वाढ करण्यासाठी घालता येतात. तसेच सुरूवातीच्या 2 दिवसांत अंड्यांची रंगीत फिलर्स देखील वापरता येतील.
|
केर कचरयाची सामग्री
उष्मायनासाठी वापरण्यात येत असलेली सामान्य केर-सामग्री म्हणजे लाकडी भुसा, तांदुळाचा पेंढा, इत्यादी. सुरूवातीस ह्या सामग्रीचा 2 इंच उंचीचा थर घालावा ज्यामध्ये हळू-हळू भर घालत 3 ते 4 इंच करू शकता. केर सामग्री सडू नये म्हणून वारंवार फिरवित राहावे.
|
पालन पध्दती
टर्कीचे पालन मुक्त सीमा किंवा गहन प्रणालीच्या अंतर्गत केले जाऊ शकते.
ए) मुक्त सीमा पालन पध्दत:
लाभ: • खाद्य मूल्य पन्नास टक्के कमी लागते. • कमी गुंतवणुक. • लागत लाभाची सरासरी जास्त आहे. मुक्त सीमा पध्दतीत, कुंपण असलेल्या एक एकर क्षेत्रात 200-250 प्रौढ टर्कीचे पालन करता येते. रात्रीच्या वेळी प्रत्येक पक्ष्यास 3 ते 4 चौ.फू. दराने जागा देण्यात यावी. त्यांना शिकार्यांपासून संरक्षण देण्यात आले पाहिजे. सावली आणि थंड वातावरण देण्यासाठी झाडे लावावीत. परजीवी संसर्ग होऊ नये म्हणून रेंज वारंवर फिरवित राहावी. मुक्त सीमा खाद्य: टर्की फार चांगले स्वव्छताकर्मी असल्यामुळे, ह्यामध्ये गांडुळे, लहान कीटक, गोगलगाई, स्वयंपाकघरातील केर आणि उधई हे सर्व खाऊ शकतात, ज्यांत उच्च प्रथिने असतात आणि अशाप्रकारे खाद्य मूल्यात 50 टक्केची कपात केली जाऊ शकते. ह्या खेरीज शेंगा असलेले खाद्य जसे विलायती गवत, डिस्मँथस, स्टायलो इत्यादी देऊ शकता. मुक्त सीमेत असलेल्या पक्ष्यांच्या पायांत बळकटी यावी आणि पाय अधू होऊ नयेत म्हणून प्रत्येक पक्ष्याला दर आठवड्याला 250 ग्राम शिंबुकाच्या स्वरूपात कॅल्शियम द्यावे. खाद्यमूल्यात 10 टक्के कपात आणण्यासाठी भाज्यांचा पालापाचोळासुध्दा देता येतो. आरोग्य आच्छादन :
मुक्त सीमा पध्दतीतील टर्कींना जंत (राउंड वर्मस्), आणि बाह्य परजीवी संसर्ग (फाउल माइटस्) ची लागण होण्याची अत्यंत शक्यता अधिक असते. म्हणून पक्ष्यांचे आरोग्य कायम राखण्यासाठी त्यांना महिन्यांतून एकदा डीवर्मिंग आणि डिपिंग करविणे अत्यंत गरजेचे आहे.
|
|
बी) गहन प्रणाली पालन पध्दत
• सुधारित उत्पादन क्षमता. • चांगले व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण. गृह-व्यवस्था
- चांगल्या गृह-व्यवस्थेमुळे ऊन, पाऊस, वारा, परजीवी यांपासून तुर्कींचे संरक्षण होते व त्यांना आरामाने राहता येते.
- देशांतील उष्ण क्षेत्रांमध्ये निवा-यांचा अक्ष पूर्व ते पश्चिम असावा.
- दोन निवा-यांतील अंतर कमीत कमी 20 मीटर असावे आणि लहानग्यांच्या निवासांत आणि प्रौढांच्या निवासांतील अंतर कमीत कमी 50 ते 100 मीटर असावे.
- खुल्या घराची रूंदी 9 मीटरपेक्षा जास्त नसावी.
- घराची उंची जमिनीपासून ते आढ्यापर्यंत 2.6 ते 3.3 मीटर असू शकते.
- एक मीटरचा ओव्हरहॅन्ग द्यावा म्हणजे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होईल.
- घराची फर्शी/लादी स्वस्त, टिकाऊ आणि आर्द्रतेपासून सुरक्षित असावी.
जेव्हां तुर्कींचे पालन गहन कचरा पध्दतीने करण्यात येते, तेव्हां सामान्य व्यवस्थापकीय परिस्थिती कोंबडीच्या पिल्लांप्रमाणेच असतात पण तरी ही पुरेशी जमीन, पाणी आणि खाद्य स्थळ उपलब्ध करवून मोठ्या पक्ष्यांची काळजी घेतली जाऊ शकते.
|
|
|
|
टर्कीना पकडणे आणि हाताळणे
सर्व वयोगटातील टर्कींना छडीच्या सहाय्याने एका जागेतून दुसरीकडे सहजपणे घेऊन जाता येते. तुर्कींना पकडण्यासाठी अंधारलेली खोली/कक्ष चांगला असतो जेणे करून त्यांना इजा न करता दोन्ही पायांनी धरून पकडले जाऊ शकते. तथापि, प्रौढ तुर्कींना 3 ते 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लोंबकळत ठेवू नये.
|
|
टर्कीसाठी फर्शी/लादी, फीडर आणि पाण्याच्या जागेची आवश्यकता
वय
|
फर्शीची जागा (चौ.फू.)
|
फीडरची जागा (सें.मी) (लीनिअर फीडर)
|
पाण्याची जागा (सें.मी.) (लीनिअर फीडर)
|
0-4 आठवडे
|
1.25
|
2.5
|
1.5
|
5-16 आठवडे
|
2.5
|
5.0
|
2.5
|
16-29 आठवडे
|
4.0
|
6.5
|
2.5
|
टर्की ब्रीडर
|
5.0
|
7.5
|
2.5
|
टर्कीचा स्वभाव साधारणपणे मवाळ असतो; म्हणून त्या नेहमीच गोंधळलेल्या असतात. म्हणून टर्कीच्या निवासांत पाहुण्यांना प्रवेश प्रतिबंधित असावा.
|
|
चंचुविच्छेदन (चोच मोडणे)
आपसांतील जीवघेणी भांडणे आणि पिसे उपसून काढणे ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लहानग्या टर्कींचे चंचुविच्छेदन केले पाहिजे. चंचुविच्छेदन 3 ते 5 आठवड्याच्या वयांत करण्यात यावे. नाकपुडीपासून चोचीपर्यंतच्या अर्ध्या लांबीत चंचुविच्छेदन करावे.
|
|
आगवळ काढणे
आगवळ काढण्याचे कारण म्हणजे भांडणात डोक्याला काही इजा होऊ नये. एक दिवसाचे पिलू असतांना फक्त बोटांनी दाबूनच आगवळ काढता येते. 3 आठवडे झाल्यानंतर तीक्ष्ण कात्रीने डोक्याजवळून आगवळ कापावी लागते.
|
|
अंगुली विच्छेदन
एक दिवसांचे पिलू असतांना संपूर्ण पायाच्या बोटांच्या नखांच्या बाह्यतम पॅडसह अग्रटोक कापून टाकतात.
|
|
आहार/खाद्य
मॅश फीडिंग आणि पॅलेट फीडिंग ह्या खायला घालण्याच्या पध्दती आहेत.
- कोंबडीच्या पिल्लाच्या तुलनेत टर्कीच्या गरजा उर्जा, प्रथिने, व्हिटॅमिन आणि खनिजे ह्या उच्च आहेत.
- दोन्ही लिंगांसाठी प्रथिनांची आवश्यकता भिन्न असल्यामुळे चांगले परिणाम मिळविण्यासाठी त्यांचे पालन वेग-वेगळे करायला पाहिजे.
- खाद्य फीडरमध्ये द्यावे जमिनीवर नाही.
- खाद्य परिवर्तन केव्हाही केल्यास हळू-हळू करावे.
- टर्कींना नेहमीच एक स्थिर आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याची गरज असते.
- उन्हाळ्यात तुर्कींना जास्त पाणी द्यावे.
- उन्हाळ्यात तुर्कींना दिवसाच्या थंड भागांतच खायला द्यावे.
- प्रत्येक पक्ष्याला दर रोज 30-40 ग्राम शिंबुक शल्व खायला द्यावे म्हणजे पायांत बळकटी येईल.
हिरवे खाद्य
गहन पध्दतीत, एकूण आहाराच्या 50 टक्के हिरवा पाला वाळवून चुरून खायला द्यावा. सर्व वयोगटातील तुर्कींसाठी ताजे विलायती गवत (अश्व तृण) सर्वोत्तम खाद्य आहे. डिस्मॅन्थस व स्टायलोखेरीज हे गवत चिरून तुर्कींना खायला घातल्यास लागत मूल्यात कपात करता येते.p>
|
|
शारीरिक वजन आणि खाद्याची गरज
वय (आठवड्यांमध्ये)
|
सरासरी शारीरिक वजन (कि.ग्रा.)
|
एकूण खाद्य खप (कि.ग्रा.)
|
एकूण खाद्य दक्षता
|
|
नर
|
मादी
|
नर
|
मादी
|
नर
|
मादी
|
4थ्या आठवड्यापर्यंत
|
0.72
|
0.63
|
0.95
|
0.81
|
1.3
|
1.3
|
8व्या आठवड्यापर्यंत
|
2.36
|
1.90
|
3.99
|
3.49
|
1.8
|
1.7
|
12व्या आठवड्यापर्यंत
|
4.72
|
3.85
|
11.34
|
9.25
|
2.4
|
2.4
|
16व्या आठवड्यापर्यंत
|
7.26
|
5.53
|
19.86
|
15.69
|
2.8
|
2.7
|
20व्या आठवड्यापर्यंत
|
9.62
|
6.75
|
28.26
|
23.13
|
3.4
|
2.9
|
|
|
|
|
प्रजनन पध्दती
नैसर्गिक सहवास:
प्रजननक्षम नराच्या प्रजनन वर्तनास स्ट्रट असे म्हणतात, ज्या काळाच्या दरम्यान हा नर पंख पसरून एक विशिष्ट प्रकारचा आवाज निरंतर काढत राहतो. नैसर्गिक सहवासाच्या दरम्यान, मध्यम प्रकारच्या तुर्कींमध्ये नर:मादी सरासरी प्रमाण 1:5 आहे आणि मोठ्या पक्ष्यांमध्ये 1:3 आहे. सरासरी प्रमाणात एका मादीकडून 40-50 पिल्लांची अपेक्षा केली जाते. प्रौढ नरांचा वापर पहिल्या वर्षानंतर प्रजनन क्षमता कमी होण्याने क्वचितच केला जातो. एकाच विशिष्ट मादीकडे आकर्षित होण्याचा प्रौढ नराचा कल असतो त्यामुळे दर 15 दिवसांनी नर बदलावे लागतात.
|
|
कृत्रिम गर्भाधान:
टर्की संचाकडून/कळपाकडून संपूर्ण ऋतुभरात उच्च प्रजनन क्षमता प्राप्त करण्यासाठी कृत्रिम गर्भाधान फार लाभदायी ठरते.
|
|
प्रौढ नराकडून वीर्य संग्रह करणे
- वीर्यदाता नराचे वय 32-36 आठवडे असावे.
- वीर्यदान करण्यापूर्वी नरास कमीत कमी 15 दिवस एकांतात ठेवावे.
- नरास नियमितपणे हाताळावे आणि वीर्य संग्रह करण्याचा काळ 2 मिनिटाचा असावा.
- नर हाताळण्याबाबत अत्यंत संवेदनशील असतात त्यामुळे प्रत्येक वेळी जास्तीत जास्त वीर्य घेण्यासाठी तोच कर्मचारी असावा.
- वीर्याचे सरासरी प्रमाण 0.15 ते 0.30 एमएल असते.
- वीर्य प्राप्तीनंतर एका तासांत त्याचा वापर करण्यात यावा.
- एका आठवड्यांत तीनदा किंवा एक दिवसाआड वीर्य संग्रह करावा.
|
|
कोंबड्यांचे गर्भाधान:
- जेव्हा कळप/संच 8-10 टक्के अंडी उत्पादनापर्यंत पोहोचतो तेव्हा कृत्रिम गर्भाधान करण्यात येते.
- दर तीन आठवड्यांनी 0.025-0.030 मिली अनडायल्यूटेड वीर्याने कोंबड्यांचे गर्भाधान करा.
- ऋतुसमाप्तीनंतर 12 आठवड्यांनी पंधरा दिवसांनी एकदा गर्भाधान करावे.
- कोंबडीचे गर्भाधान सायंकाळी 5-6 वाजता करावे.
- 16 आठवड्यांच्या प्रजनन काळांत सरासरी 80-85 टक्के प्रजजन व्हायला पाहिजे.
|
|
|
|
टर्कींचे सर्वसाधारण रोग
रोग
|
कारण
|
लक्षणे
|
बचावात्मक उपाय
|
ऍरिझोनोसिस
|
सॅल्मोनेला ऍरिझोना
|
कोंबड्या बेचैन होतात आणि त्यांच्यात अंधत्वाचा विकास होऊ शकतो. संवेदनशील वय 3-4 आठवडे
|
संसर्ग झालेल्या प्रजननक्षम संचास बाहेर काढणे आणि चांगल्या प्रकारे जंतुनाशके वापरून स्वच्छता करणे
|
ब्लू कोंब डिसीझ (नील फणी रोग)
|
कोरोना व्हायरस
|
औदासिन्य, वजन कमी होणे, पाण्यासारखे जुलाब होणे, डोके व त्वचेची कांती काळवंडणे
|
फार्मवर जनसंचार आणि प्रदूषण थांबविणे. विश्रांती काळ द्यावा.
|
असाध्य श्वसनक्रिया संबंधी रोग
|
मायकोप्लाझ्मा गॅलिसॅप्टियम
|
खोकणे, घशात घरघर, शिंकणे, नाक वाहणे
|
मायकोप्लाझ्मा मुक्त कळपास/संचास सुरक्षित ठेवणे
|
एरिसिपेलस
|
एरिसिपलोथ्रिक्सह्रयूसियोपॅथिडे
|
अचानक संख्या कमी होऊ लागणे, गळ्याखाली सूज येणे, तोंडाच्या काही भागांचा रंग बदलणे
|
व्हॅक्सिनेशन/लस टोचणे
|
फाउल कॉलरा
|
पास्च्युरेला मल्टोसिडा
|
डोक्याचा रंग जांभळट होणे, हिरवट-पिवळी विष्ठा, आकस्मिक मृत्यु
|
स्वच्छता आणि मृत पक्ष्यांस तेथून हालविणे
|
फाउल पॉक्स
|
पॉक्स व्हायरस
|
कलगीवर लहान पिवळे पुरळ आणि फोड आणि खपल्या होणे
|
व्हॅक्सिनेशन/लस टोचणे
|
हॅमरेजिक ऍन्टरीटिस
|
व्हायरस
|
एक किंवा जास्त मृत पक्षी
|
व्हॅक्सिनेशन/लस टोचणे
|
संसर्गजन्य सायनुव्हायटिस
|
मायकोप्लाझ्मा गॅलिसॅप्टियम
|
मागील पायांच्या घोट्यांवर सूज येणे, पायांचे तळवे सुजणे, पायांत अधूपणा, छातीवर पुरळ किंवा फोड येणे
|
स्वच्छ कळप/संच विकत घेणे
|
संसर्गजन्य सायनुसायटिस
|
बॅक्टेरिया
|
नाक वाहणे, सायनसवर सूज येणे आणि खोकला
|
रोगमुक्त प्रजननकर्त्या पक्ष्यांपासून पिलांस वाचविणे
|
मायकोटॉक्सिकोसिस
|
फगल ओरिजिन
|
हॅमरेज, फिकटपणा, सुजलेले लिव्हर आणि किडनी
|
खाद्याचा दुरूपयोग टाळणे
|
न्यू कैसल डिसीझ
|
पॅरामिक्सो व्हायरस
|
मान हलणे, थरथरणे, अधा्रंगवायू होणे, सौम्य टरफलाची अंडी घालणे
|
व्हॅक्सिनेशन/लस टोचणे
|
पॅराटायफॉइड
|
सॅल्मोनेला प्यूलोरम
|
कोंबड्यांना डायरिया होणे
|
स्वच्छता करणे आणि कळपाचा बचाव करणे
|
टर्की कोरिझा
|
बोर्डेटेलाएव्हियम
|
भेगा पडणे आणि नाकातून खूप जास्त शेंबूड वाहाणे
|
व्हॅक्सिनेशन/लस टोचणे
|
कॉकिडिऑसिस
|
कॉकिडिआ एसपीपी
|
जुलाबात रक्त पढणे आणि वजन कमी होणे
|
योग्य ती स्वच्छता आणि केराचे व्यवस्थापन
|
टर्की व्हनरल डिसीझ
|
मायकोप्लाझ्मा मॅलाग्रिस
|
प्रजनन आणि उष्मायन क्षमता कमी होणे
|
अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छता करणे
|
|
|
लस टोचण्याचे वेळापत्रक
एक दिवस वयाचे
|
ND – B1 स्ट्रेन
|
4था व 5वा आठवडा
|
फाउल पॉक्स
|
6वा आठवडा
|
ND – (R2B)
|
8वा-10वा आठवडा
|
कॉलरा लस
|
|
|
टर्कीची विक्री
16व्या आठवड्यांत प्रौढ नर आणि मादी टर्कीचे वजन 7.26 कि.ग्रा. आणि 5.5 कि.ग्रा. असते. टर्कीच्या विक्रीसाठी हे अधिकतम वजन असते.
तुर्कींची अंडी:
- वयाच्या 30व्या आठवड्यापासून टर्की अंडी घालू लागते आणि तिचा प्रजनन काळ अंडी घालण्याच्या पहिल्या दिवसापासून 24 आठवडे असतो.
- योग्य आहार देणे आणि कृत्रिम प्रकाशव्यवस्थापनाच्या अंतर्गत टर्की कोंबडी वर्षातून 60-100 अंडी घालते.
- सुमारे 70 टक्के अंडी दुपारच्या वेळी घातली जातात.
- टर्कीच्या अंड्यावर किरमिजी रंगाची छटा असते आणि त्याचे वजनसुमारे 85 ग्राम असते.
- अंडे एका बाजूने लक्षांत येईलसे टोकेरी असते आणि कवच बळकट असते.
- टर्कीच्या अंड्यातील प्रथिने, लिपिड कर्बोदके आणि खनिज घटक 13.1%, 11.8%,1.7% आणि 0.8% अंदाजे असतात. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण पिवळ्या भागाच्या/अंड्यातील बलकाच्या 15.67-23.97एमजी/ग्राम असते.
|
|
टर्कीचे मांस:
अत्यंत मऊशार असल्यामुळे लोकांना टर्कीचे मांस आवडते. टर्कीच्या दर 100 ग्राम मांसामध्ये प्रथिने आणि मेद 24 टक्के, 6.6 टक्के उर्जा मूल्ये आणि 162 कॅलरी असतात. पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोहतत्व, सेलेनियम, झिंक आणि सोडियम सारखी खनिजेदेखिल यात असतात. तसेच ह्यामध्ये उच्च प्रमाणात ऍकमनो ऍसिड आणि नियासिन, व्हिटॅमिन बी6 आणि बी12 देखील असतात. ह्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् आणि सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् असून कोलेस्ट्रॉलचे प्रमाण फार कमी असते.
24 आठवड्यांचा 10 ते 20 किलो वजनाचा, रू.300 ते 450 लागत मूल्य असलेला एक नर टर्की रू.500 ते 600चा नफा देतो. तसेच 24 आठवड्यांची मादी रू.300 ते 400 चा नफा मिळवून देते. ह्या शिवाय, टर्कीचे पालन केर-कचरायुक्त आणि सेमी स्केव्हेंजिंग परिस्थितींमध्ये देखील करता येते.
|
|
|
|
स्त्रोत :
अधिक माहितीसाठी संपर्क करा: संचालक, सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑग्रनायझेशन (एसआर), हेस्सरघट्टा, बंगळुरू-560088. दूरध्वनी: 080-28466236 / 28466226 फॅक्स: 080-28466444 ई-मेल cpdosr@yahoo.com वेबसाइट :http://www.cpdosrbng.kar.nic.in
|