অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प

घेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प

प्रस्तावना

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतक-यांच्या दरडोई उत्पन्न वाढविणारा शाश्वत शेतीचा घेवडा लागवड प्रकल्प वाठार स्टेशन येथे २o१५-१६ च्या खरीप हंगामात राबविण्यात आला होता. या प्रकल्प यशस्वी होऊन शेतक-यांना त्याचा फायदाही झाला आहे.

मागील २ ते ३ वर्ष घेवडा पिकास चांगला दर मिळू लागला असून ४ ते १० हजार रुपये प्रति किंटल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा या पिकाकडे वळू लागला आहे.

महाराष्ट्राच्या शेती प्रगतीतील एक महत्वपूर्ण जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. हा जिल्हा ऊस उत्पादक म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा पश्चिम भाग हा बागायती तर पूर्व भाग दुष्काळी आहे. दुष्काळी भागामध्ये माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा व फलटण हे तालुके येतात. कोरेगाव तालुक्यातील उत्तर भाग हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. असे असले तरी कोरेगाव तालुक्यात घेवड्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

घेवडा पिकाची परंपरा संपूर्ण कोरेगाव तालुक्यात 'वाघ्या' घेवडा हे पीक पुर्वपार घेतले जाते. साधारणतः १९५० पासुन घेवडा पीक व्यापारी तत्वावर घेण्यात येऊ लागले. उत्तर भारतात हा घेवडा 'कोरेगाव राजमा' किंवा 'किंग राजमा' या नावाने ओळखला जातो. कोरेगाव तालुक्यातील घेवड्याला पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश भागातून खूप मागणी आहे. परंतु मागील ७ ते ८ वर्षापासून घेवडा पिकाखालील क्षेत्र फारच कमी झाले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ या हवामान बदलांमुळे घेवडा पिकाची उत्पादकता खूप कमी झालेली आहे. या पिकाला जास्त किंवा कमी प्रमाण यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.

घेवडा पिकातून फायदा येथील हवामान घेवडा पिकास अनुकूल आहे. परंतु बाजारपेठेत घेवडा पिकाचे दर देखील कोसळलेले होते. यामुळे येथील शेतकरी इतर पिकांकडे वळला होता. घेवडा पिकाखालील क्षेत्र हे प्रामुख्याने सोयाबीन पिकाने व्यापले होते. मागील २ ते ३ वर्ष घेवडा पिका चांगला दर मिळू लागला आहे. घेवडा पिकाला ४ ते १o हजार रुपये प्रति क्रिटल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा या पिकाकडे वळला आहे. तसेच महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (एम.ए.सी.पी) सातारा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा यांच्या

वतीने वाघ्या घेवडा पिकाची भौगोलिक मानांकन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. ह्या मुळे घेवडा पिका जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुणवू लागले आहेत. 'आत्मा' चे सहकार्य घेवडा पिकाचे उच्च प्रतीचे बियाणे शेतक-यांना उपलब्ध व्हावे. तसेच घेवडा पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ व्हावी, यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) अंतर्गत नावीन्यपूर्ण बाबी अंतर्गत घेवडा पिकाचे बियाणे उपलब्ध करावयाचे नियोजन करण्यात आले. यासाठी प्रकल्प राबविण्यात आला.

प्रकल्प अंमलबजावणी

घेवडा पीक प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत शेतक-यांच्या गरजेनुरूप नियोजन करण्यात आले. शेतक-यांना उद्य प्रतीच्या घेवडा बियाण्याची गरज होती. तसेच घेवडा हे पीक पारंपरिक पद्धतीने घेतले जात होते. तसेच पिकावरील कोड व रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन व सिंचन यांच्या नियोजनासाठी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रात्यक्षिके

या प्रकल्पांतर्गत 'वरुण' घेवड्याचे २५ क्रिटल प्रमाणित बियाणे सहयोगी संशोधन संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे येथून उपलब्ध करण्यात आले. पीक प्रात्यक्षिक बाबींतर्गत खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये प्रत्येकी 0.४o हे. क्षेत्राची एकूण ८३ प्रात्यक्षिके राबविण्यात आली. ही प्रात्यक्षिके राबवताना शेतक-यांना पेरणी करताना बिजप्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पेरणी ही फक्त कृषी विभागामार्फत विविध योजनांद्वारे वाटप करण्यात आलेल्या रुंद सरी वरंबा (बीबीएफ) यंत्राद्वारे करण्याची अट घालण्यात आली. यामुळे शेतक-यांनी घेवडा पिकाची पेरणी रुंद सरी-वरंबा (बीबीएफ) यंत्राद्वारे केली.

प्रशिक्षण

पीक प्रशिक्षणांतर्गत पिंपोडे बुद्रक (ता. कोरेगाव) येथे १oo शेतक-यांचे जिल्हांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये प्रा. एम.यादगीरवार, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव (ता. जि. सातारा) यांनी घेवडा पिकाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये लागवडीची योग्य याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्रकल्पाचे यश : घेवडा पीक प्रात्यक्षिक प्रकल्पांमुळे घेवडा पिकाच्या उत्पादनात वाढ झाली. प्रकल्पापूर्वी घेवडा पिकाची सरासरी उत्पादकता एकरी ३ ते ४ क्रॅिटल होती. प्रकल्प साध्यतेनंतर उत्पादकता ५ ते ६ क्रिटल एकरी झाली. ज्या शेतक-यांनी पिकास टंचाई परिस्थितीत संरक्षित सिंचन केले त्या शेतक-यांना एकरी ९ ते १o क्विंटल उत्पादन मिळाले आहे. तसेच आगामी रब्बी हंगामासाठी व खरीप हंगामाकरिता उद्य प्रतीचे घेवडा बियाणे आपल्याच भागात शेतक-यांना उपलब्ध झाले आहे.

उत्पादित घेवडा शेतकरी वर्ग बियाणे म्हणून विक्री करत आहे. तसेच काही शेतक-यांनी आगामी खरीप हंगामासाठी व जास्त उत्पादनाकरिता घेवडा पीक 'वेअर हाउस’ मध्ये ठेवण्याचा मनोदय दाखवला आहे. यासाठी सातारा येथील अजिंक्यतारा फळे, फुले खरेदी मानांकन प्रक्रियेत कोरेगाव व खटाव तालुक्यातील घेवडा उत्पादक शेतक-यांची जय तुळजाभवानी शेतकरी सहकारी खरेदी विक्री कृषिमाल संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेमध्ये २३o पेक्षा जास्त शेतकरी सभासद झालेले आहेत. वाघ्या घेवडा पिकाचे इतर घेवडा पिकांपेक्षा वेगळी असणारी जनुकीय संरचना (डी.एन.ए.) तपासण्यासाठी पुणे येथील आघारकर इन्स्टिट्यूट येथे तपासणीसाठी देण्यात आलेले आहेत.

हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी गणेश घोरपडे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा, विकास बंडगर प्रकल्प उपसंचालक आत्मा सातारा, प्रकाश सूर्यवंशी, प्रकल्प उपसंचालक, आत्मा सातारा व मा. सुनील दिलीप जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कोरेगाव, श्री. मोहनलाल सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक कोरेगाव, सी. चव्हाण कृ. स. देऊर, सी. राऊत कृ. स. सोनके, श्री कोलवडकर कृ. स. पिंपोडे बु, श्री यादव कृ. स. अनपटवाडी, श्री. कदम कृ. स. आसनगाव यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate