Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/08/07 01:33:3.100945 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / प्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता
शेअर करा

T3 2020/08/07 01:33:3.106594 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/08/07 01:33:3.137440 GMT+0530

प्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता

बियाणे' हे सामुदायिक संपत्ती असुन हजारो वर्षापासून त्यांच्यामार्फत परंतू काळजीपुर्वक जतन संवर्धन होत आहे. हे आता व्यापारी तत्वावरील संसाधन म्हणून परावर्तीत झालेले आहे.

बियाणे स्वावलंबन

'बियाणे' हे सामुदायिक  संपत्ती असुन हजारो वर्षापासून त्यांच्यामार्फत परंतू काळजीपुर्वक जतन संवर्धन होत आहे. हे आता व्यापारी तत्वावरील संसाधन म्हणून परावर्तीत झालेले आहे. शेतकरी पुरस्कृत बियाणे संवर्धन आणि सुधारीत वाणांच्या विकास कार्यक्रमामुळे फक्त शेतीमधील जैवविविधताच जतन करणे नव्हे तर अन्न सुरक्षा व शाश्वत जिवनाधार निर्मितीची आशा देखिल जागृत झालेली आहे.

महाराष्ट्रात ठाणे जिल्हयामधील जव्हार तालुका डोगराळ भागात असुन हा पश्चिम घाटाचा भाग आहे. हा संपुर्ण प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून संपन्न आहे. हा सपुंर्ण भाग धानाच्या वेगवेगळ्या प्रजाती तसेच ज्वारी, तुर, उडीद इत्यादी पिकांमध्ये आग्रक्रमावर आहे .धान व अन्न धान्य पिकांमधील विविधता संर्वधनाच्या हेतुने बायफ व मित्र या संस्थांनी मिळुन समुदायाच्या पुढाकाराने विविध पिकांचे जतन व सवर्धन प्रयोग सुरु केला . सदर प्रयोगामध्ये स्थानीक ज्ञानावर भर देऊन शेतक-यांना विविध प्रात्यक्षिक  व सेंद्रिय  शेती पध्दती आत्मसात करण्याकरीता प्रोत्साहीत केले जाते.

सहभागातुन वाण निर्मिती

सुरुवातीला 5 ते 10 सदस्यांचा गट तयार करुन शेतक-यांना एकत्रीत करण्यात आले. या गटामधील शेतक-यांसाठी वाण संर्वधनाच्या विविध पध्दती संदर्भात अभ्यास दौऱ्याचे आयोजन तसेच मूळजंतू द्रव केंद्राला भेट जेथे पारंपारिक पिंकाची धान, रागी, बारली इत्यादी पिंके वेगवेगळया जमिनीवर लागवड केलेली आहे. शेतकरी एकमेकांशी संवाद साधत प्रिंकांची पडताळणी करतात. ज्यांचा मुख्य आधार धान्य व चारा उत्पादन, रोग व किंडी प्रती प्रतीकार शक्ती, फुटव्यांची व मुळांची संख्या , दुष्काळामध्ये टीकुन राहण्याची क्षमता इत्यादी बार्बीवर भर दिला.

225   शेतकरी ज्यामध्ये युवक, महिला, शेतकरी इत्यांदींना सहभागी पध्दतीने बियाणे , वाण निवड बाबत प्रशिक्षित करण्यात आले. प्रशिक्षणामुळे शेतकर्यांना  र्बियाणांची शुध्दता राखुन ठेवण्यासाठी मदत झाली. अंदाजात 360 शेतक-यांना रागी व बारली पिंक उत्पादनाचे विविध अंगाबाबत प्रशिक्षीत करण्यात आले. ज्यामध्ये बियाणे प्रक्रिय़ा , नर्सरी, एकल पध्दतीने धानाची लागवड, सरी, वरंबा पध्दत इ. विविध प्रयोगांच्या शेवटी स्थानिक विश्वासू उत्पादकाकडील मुळ वाण निवडक शेतक-यांना बीजोत्पादलना करीता दिली गेली. ज्यामध्ये सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतले जाते. खरीप 2013  हंगामामध्ये 26 शेतकरी धान रागी, बारली बिजोत्पादन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. यामध्ये पारंपारीक पिके सहभागी पध्दतीने निवड करुन सामुदायीक बिज बँकेंमध्ये त्यांच जतन केल्या गेले.

जैवविविधता संवर्धन र्क्षाणि प्रगत जिवनाधार

या प्रयोगाच्या पुर्वी शेतकरी बियांणाकरीता पुर्णपणे बाजारांवर अवलंबुन होते. परंतु आता त्यांच्याकडे धान, रागी बारली ची भरपुर पारंपारीक वाण उपलब्ध आहेत. जी दुष्काळामध्ये तग धरणारी रोग किंडीस प्रतीकारक व पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे . पारंपारिक धन उदा. कोळपी , कसबाई, लाल्या जुना कोलम , राजगुध्या , मसुरी , राहवूलल, बांगल्या इ पारंपारिक वाणे शेतकऱ्यांनी  व्यापक पातळीवर लागवड करण्याकरीता स्विकारली. पारंपारीक रागी मध्ये कलपेरी, धवलपेरी, शिंतोली,नागली, दसरबेदरी, तसेच बारली मध्ये दुधमोगरा, घोशी , सकाळी वरई इत्यादी पांरंपारीक वाणे शेतक-यांमध्ये आता सुपरीचीत झाली . पिंक उत्पादनाच्या सुधारीत पध्दती सह शेतकरी जास्तीचे उत्पादन घेत आहेत. धानाचे उत्पादनामध्ये 12 ते 15क्विटल  एकर बरुन 20 ते 25 क्विंटल, एकर पर्यत बाढ़ झाली. त्याचप्रमाणे रागी मध्ये 10-12 क्विंटल एकर वरुन उत्पादन 17-22 किंवा. एकर पर्यत बाढ़ले.

सामुदायिक बीज संकलन बरी पिक

शेतकरी आता दर्जेदार सेंद्रिय  निर्विष्ठांची निर्मिती व वापर करीत आहेत ज्यामुळे गांडूळखत  व्हर्मीवॉश नैसर्गिक कीटक नाशके यांच्या समाने आहे .  त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च खुप कमी झाला. व बाहेरील निविष्ठांवरील अवलंबित्व सुद्धा कमी झाले.

शेतक-यांकडे आता धान रागी, बारली चे विविध पारंपारीक वाण उपलब्ध आहेत की जे दुष्काळ परिस्थिती मध्ये तग धरणारे रोग व क्रिडोस प्रतीकारक आणि पोषक तत्व युक्त आहेत. धानांमधील लागतखर्च 12400 रु ! एकरावरुन 7500 रु एकर पर्यंत कमी झाला. तसेच रागीमध्ये 7500 / एकृरावरुन / 5300 रु एकर झाला. सेंद्रिय निर्विष्ठाच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता व पाणी साठवण्याची क्षमता यामध्ये प्रचंड वाढ़ झाली.

समुदाय स्तरावरील बीजोत्पादन

बोजोत्पादन कार्यक्रमाच्या शाश्वतेकरीता समुदाय स्तरावर यंत्रणा असणे गरजेचे आहे. ज्यामुळे बियाणे निवड निर्मिती, आदानप्रदान व स्वतंत्र पध्दतीने वाणांची सुरक्षितता राखल्या जाईल. बीज बचाव समीती तयार झाल्यात ज्यांच्यामार्फत दर्जेदार बीजोत्पादन, बियाणे देवाणघेवाण, व्यवस्थापन व बाजारव्यवस्था इत्यांदीची व्यवस्था केली जाते. शिवार फेरीच्या माध्यमातुन याची खात्री वाढते. ही समीती दर्जेदार बीजोत्पादनाकरीता बियाणे प्लॉटचे संनियंत्रण करते. आता हया समीतीच्या वतीने धानाचे तसेच पारंपारीक रागी, बारली चे स्थानीक संवर्धन केंद्राचे व्यवस्थापन केल्या जात आहे. सद्यस्थितीमध्ये 3 बिज बचाव समीती तयार असुन त्यामध्ये 11 गावांमधील 250 पेक्षा जास्त वेगवेगळी पारंपारीक धान, रागी, बारली , मका, ज्वारी च्या समुदाय स्तरावरील बिज बँकेमध्ये 11 गावामधील 724 पेक्षा जास्त शेतकरी प्रत्यक्षपणे सहभागी झालेले आहेत.

पिकातून बियाणांची निवड करताना महिला

व्यापक पातळीवर याची जाणीव जागृती प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीकोनातुन 10 युवकांना इतर गावामध्ये प्रचार बसतो म्हणून क्षेत्र भेटी,शेती शाळाचे नियमीत आयोजन होते. ब्रिज सवर्धनाची गरज व वैवीधता या संदर्भात समुद्रायामध्ये जागृती होण्याच्या दृष्टीकोनातुन समुदाय स्तरावरील बिज मेळा, बियाणे प्रदर्शनी च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळया भागामधील4200शेतक-यापर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली. फळबागेमधुन विविधता जोपासणे: आदिवासी समुदायामध्ये त्यांच्या घरामागे/परसामध्ये वेगवेगळय़ा प्रकारची वैविधतापुर्ण अम, भाजीपाला घेतल्या जातो. ज्यामधुन आरोग्यदायी व पोषक अम मिळते. आदीवासी समुदायामध्ये पुर्ववत पारंपारीक पध्दतीने प्रत्येक विविध वनस्पती, रोपे । औषधी वनस्पती, हंगामी भाजीपाला तसेच काही प्रमाणात बहुवार्षिक झाडे कुंपनामध्ये घेतली जातात.

यामधुन निघणा-या भाजीपाला, अन्नाच्या माध्यमातून कुंटुंबाची वर्षभराचीअम सुरक्षा राखली जाते. मान्यता प्राप्ती : बिज बचाव समीती/गटास प्रोटेक्शन ऑफ प्लांट्रोव्हेरायठी आणि फार्मर राईटस ऑथारीटी (पी. पी. व्ही व एफ.आर.ए) कृषी मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत दिल्या जाणारा प्लांट जिनोम सेवर कम्युनीटी अवार्ड 2011-12 ने सन्मानीत केल्या गेले. पिकांमधील जनुक संवर्धन क्षेत्रामध्ये हा मानाचा मावनजी पवार व कमाहीपाडा गावांमधील सुनिल कमाडी यांना सुध्दा प्लांट जिनोम सेबर कम्युनाठी पुरस्कार 2011-12ने वनस्पती मधील जनुक संवर्धन या बहुमोल कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.

टेबल 1 पारंपारीक धानाचे संवर्धन त्याच्या विविध गुणधर्मा सह.

गुणधर्मपारंपारिक वाणांची यादी
दुष्काळामुळे तग धरणारी व कमी कालावधीची वाण काळी कुदइ,काली खडसी , दुला १ दुला २ हरी बाट धवल डांगी (लाल) डांगी (पांढरी)धवल
जास्त उत्पादन देणारी कोपी(लवकर येणारी)कसबाई,रघुदया, सुरती कोलम ,लाल्या ,जावयाची गुंडी.
बाजार मूल्य देणारी बंगाल्या,कसबाई,चीमनसाई,सुरती कोलम,झिनी (वडा)कोळपी,डांगी (पांढरी)रघुद्या महाडी
औषधी मूल्य महाडी (अशक्तपणा जखम भरणे ,फ्रँक्चर)काळी खड्सी(अशक्तपणा डांगी पांढरा(कांजी द्रव बनवण्याकरिता उपयोगी)लाल डांगी मालगुध्या बाळंतपणामधून आलेला अशक्तपणा कमी करणे )
चारा मूल्य कोळपी,रघुदया,पचेकी,वाकवेल डांगी ,कसबाई,झिनी वाद बंगाल्या,पहाडी
खूप पाणी कसवेल
अंतिम उपयुक्तता बिर्याणी पुलाव ,बंगाल्या कसबाई,कोळपी,मसूर,राजघुदया सुरती कोलम रघुदया कांजी – डांगी लाल व पांढरा ,महाडी पापड –धुनदुने , राजगुदया,मालगुदयापोहा,कुरकुरे – दुला १ दुल२ ,सागभात

पुढील दिशा

बीजोत्पादन व पिक उत्पादनाच्या विविध पध्दती संदर्भातील शेतक-यांचे ज्ञान वृध्दीगत करुन त्यांचा जिवनाधार यशस्वीपणे सुनीक्षित केल्या जाऊ शकतो. तेव्हा भविष्यामध्ये कामाचा दायरा वाढवून द्वाळी, भाजीपाला तसेच आदिवासी समुदयाला पोष्टिक तत्वे मिळून देणारी कंद मुळे यांमधील वाणांचे संवर्धन होणे शक्य आहे

आशेचे बियाणे भविष्याचे  बीयाणे.

कमाडीपाडा गांव तालुका जव्हार , ठाणे जिल्यामधील 35 वर्षीय श्री सुनील कामडी हा एक तरुण शेतकरी त्याचे 7 सदस्य असलेले कुंटुंब 3 एकर कोरडवाहु शेती करते. 2008  मध्ये   सुनीलला जमिनीच्या सुपीकता तसेच पाणी धरुन ठेवण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात खालावत असल्याचे लक्षात आले. कारण म्हणजे रासायनीक खंतांचा अती वापर. बायफ़ मित्र संस्थेच्या तात्रीक सहकार्याने सेंद्रीय खत निर्मिती व जमीनीची सुपीकता वाढवण्याच्या विविध पध्दती सुनीलने आत्मसात केल्यात तसेच त्याला एस.आर.आय पध्दतीने धानाची लागवड व  सेंद्रिय  खत निर्मिती बाबत प्रशिक्षण मिळाले. 2010 मध्ये सुनील बायफ़ च्या पीकांचे जनुक संवर्धन कार्यक्रमामध्ये सहभागी झाला व त्यांनी धानाच्या 21 पारंपारीक प्रजातींचे मुळस्थळी संवर्धन केले व धान ,रागी , बारली बियाणे निवडीमध्ये तज्ञ झाला

तांदुळाच्या अश्विनी जाती प्लॉट मध्ये सुनील कानडी
सुनीलने कंद वर्गीय , फळ वर्गीय भाजीपाला , हिरवा भाजीपाला (करंटी,कोची , सुरण ,कारल, दुधीभोपळा , वांगी , कोहळ , बरबटी,आलू ,वाटणा ,तोंडली ) चे स्थानीक वाण सुध्दा संकलिंत केलेत. व कुटुंबापुरती त्याची लागवड सुध्दा तो करतो. या कामामध्ये त्याचे संपुर्ण कुटुंब सहभागी आहे. धानाच्या प्रिंकाची पाहणी करीत असताना सुनीलला काही वेगळे, असामान्य ऑर्बी निदर्शनास आलीत. या ऑब्यामधील धान्याच्या आकार मोठा होता तसेच संख्याही जास्त होती. या ओमब्यान मधील धान सुनीलने वेगळे ठेवून त्याची पुढील उन्हाळी 2010, खरीप 2011, उन्हाळी 2012 व खरीप 2013 च्या हंगामामध्ये लागवड केली. बायफ़ च्या तज्ञाच्या सल्याने सुनीलने सदर वाणाचे तिन वर्ष सलग लागवड करुन भौतीक व अनुवाशींक शुध्द्रता राखुन त्यांनी यशस्वीपणे नवीन वाण विकसीत केले.

भागामधील शेतक-याकडून सुनीलने विकसीत केलेल्या बाणास उत्पादकता, छोटे आकारांचे धान्य, निसर्गत, काटक रोग व किंडीस प्रतीकारक वैशिष्टय़ांमुळे मोठी मागणी आहे. खरीप 2012 हंगामामध्ये सुनीलने या वाणाचे 5 क्विंटल उत्पादन घेतले व बिज बँकेंमध्ये त्याचा पुरवठा करुन जास्तीतजास्त शेतक-यापर्यंत ते नवीन विकसीत वाण पोहोचवीले. डेंगाचीमेठ बिज बचाव समीती मध्ये सुनील हा एक सक्रीय सदस्य आहे. हे नवीन वाण विकसीत करण्यामध्ये सुनीलने जे प्रयत्न केलेत. निवड पध्दतीने त्याची दखल म्हणुन 2011-12 मध्ये प्लांटार्जिनोम सेवर फार्मर रेकगनेशन अवार्ड नवी दिल्ली येथे सुनीलला मिळाला. सुनीलने त्याच्या मुलीच्या नावावरुन या धानाच्या नवीन विकसीत वाणास अश्विनी हे नाव दिले. सुनील हा त्याच्या सारख्या अनेक शेतक-यांना पिकांमधील विविधता जोपासण्या मध्ये मदत करीत आहे.

सामुदायीक बिज बँकेंचे नेटवर्क जाळे तयार करुन अधिक जास्त शेतकयापर्यंत पोहचता येईल. त्यादिशेने नेटवर्कच्या माध्यमातुन सामुदायीक पध्दतीने बाजारापर्यंत पोहोच व मुल्य बूध्दी साठवणुक, सुंविधा या करीता मदत होईल. अर्थात यासाठी ग्रामीण/ आदिवासी परिसरात सुधारित साठवणुक व्यवस्था असण्याची गरज आहे. या सर्वधनाच्या कार्यामध्ये शेतकरी समुदायाला सहभागी करणे तसेच स्थानीक वाणांचे संरक्षणाच्या दृष्टीकोनातुन काही सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात आणणे ज्यामध्ये शेतक-यांच्या वाणांची पी.पी.व्ही व एफ. आर अॅक्ट नुसार नोंदणी करणे महत्वाचे आहे .तसेच पारंपारिक पिकांचे बार कोडींग , पोषक तत्व यासंदर्भातील लोकांचे ज्ञान  पडताळणी/वृध्द्रींगत होण्याकरीता पुढील सुक्ष्म स्तरावरील अभ्यास करणे गरजेचे वाटले.

 

स्रोत - लिजा इंडिया

 

3.10416666667
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/08/07 01:33:3.788612 GMT+0530

T24 2020/08/07 01:33:3.796910 GMT+0530
Back to top

T12020/08/07 01:33:2.933717 GMT+0530

T612020/08/07 01:33:2.953705 GMT+0530

T622020/08/07 01:33:3.089304 GMT+0530

T632020/08/07 01:33:3.090367 GMT+0530