आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४000 वर्षापूर्वी पासून आब्याची लागवड अस्तित्वात आहे. आंब्याच्या २००० पेक्षा जास्त जातीं भारत देशामध्ये अस्तित्वात आहेत. तसेच भारतातील अनेक राज्यांमध्ये आंबावृक्षांची अन्य वने अस्तित्वात आहेत आणि त्यामुळेच भारतीय उपखंड हें आब्याचे मूलस्थान मानले जातें. जागतिकस्तरावर भारत हा प्रमुख आबा उत्पादक देश असून, देशामध्ये २५१.६० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड असून त्यापासून अंदाजे १८४३.१३ दशलक्ष मे. टन इतके उत्पादन मिळते.
उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इ. प्रमुख आंबा उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासून १२.१२ लाख मे. टन इतके उत्पादन मिळते. महाराष्ट्रातील आंब्याची उत्पादकता २.५ मे. टन प्रति हेक्टर एवढी असून देशाच्या उत्पादकतेपेक्षा (७.३ टन/हेक्ट्र) कमी आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागात हापूस आंबा हे पारंपरिक फळपीक असून स्वाद. रंग, चव, टिकाऊपणा तसेच प्रक्रियेमध्ये टिकून राहणारा स्वाद यामुळे या जातीस देशांतर्गत तसेच नेिर्यातींसाठी मोठी मागणी आहे. अलीकडच्या काळामध्ये कोकणाबरोबरच मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आंब्याखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आंबा हे कोंकणातील पारंपरिक फळपीक असल्याने या विभागातील क्षेत्र, उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे सर्वकष संशोधन करण्यात आले असून त्याचा संक्षिप्त मागोवा या लेखामध्ये घेण्यात आला आहे.
कोणत्याही पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी त्या पिकाची अभिवृद्धी जलदगतीने करण्याची गरज असते. पारंपरिक पध्दतींमध्ये आंब्याची अभिवृद्धी कोयीपासून केली जाते. मात्र बियांपासून निर्मितीमध्ये येणा-या अडचणी व तोटे दूर करण्यासाठी कोय कलम तयार करण्याची साधीं-सोपी पध्दत विकसित करण्यात आली. या पध्दतीचा अवलंब आज संपूर्ण देशामध्ये होत असून एकट्या कोकणामध्ये दरवर्षी लाखो कलमे तयार करून संपूर्ण देशभरात लागवडीसाठी उपलब्ध होतात. कोय कलमांबरोबरच मृदूकाष्ठ कलम, व्हेिनियर कलम या पध्दतीने कलमे तयार करण्याची पध्दत विकसित करण्यात आली. कलमे तयार करण्याच्या या विविध पध्दतींमुळे उत्तम दर्जाची कलमे लागवडीसाठी उपलब्ध होऊन आंबा लागवडीखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ झाली.
महाराष्ट्रामध्ये आंब्याची व्यापारी तत्वावर लागवड करण्यासाठी हापूस, कैसर या प्रमुख जातींना प्राधान्य दिले जात होते. या जातींमध्ये काही दोष आहेत. उदा. ह्यापूस या जातींमध्ये वर्षाआड फळधारणा होणे, फळे पिंकताना त्यामध्ये साका होणे तसेच संयुक्त फुलांचे कमी प्रमाण व त्यामुळे कमी फळधारणा इ. तर केसरमध्ये फळांना आकर्षक रंग न येणे व काही प्रमाणामध्ये वर्षाआड फळे येणे इ. तसेच या दोन जातींव्यतिरिक्त नियमित व भरपूर उत्पादन देणा-या तसेच वातावरणातील बदलांना कमी बळी पडणा-या जातींची निर्मिती करणे आवश्यक होते. यादृष्टीने संशोधन करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट या सारख्या दर्जेदार संकरित आंबा जातींची निर्मिती करून कोकणासहू महाराष्ट्राच्या इतर भागामध्यें लागवडीसाठी प्रसारित केल्या. यामधील रत्ना ही जात भरपूर उत्पन्न देणारी, भरपूर रस (गर), मोठ्या आकाराची फळे देणारी असून ही जात संपूर्ण महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पसंतीला उतरलेली आहे. सिंधू या जातींमध्ये अतिशय पातळ कोय असून रसाचे प्रमाण भरपूर आहे. निव्वळ लोणच्यासाठी म्हणून कोंकण रुची ही जात विकसित केली आहे. कोकण राजा या जातीची फळे आकाराने मोठी असून या जातीची कची फळे सुध्दा गोड असतात. सुवर्णा आणि कोकण सम्राट या जातींची फळे आकर्षक रंग असलेली हापूसच्या आकाराची असलेली व नियमित फळधारणा देणारी आहे. निंद्यापीठाने विंकसित केलेल्या या जाती शेतक-यांच्या शेतावर देखील चांगले उत्पादन देत असून या जातींच्या कलमांसाठीची मागणी सातत्याने वाढत आहे.
कोणत्याही पिकाचे उत्पादन हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर अवलंबून असते. विद्यापीठाने यावर संशोधन करून आंबा लागवडीपासून तें पूर्ण वाढलेल्या झाडांना आवश्यक खतांची मात्रा निश्चित केली आहे. एक वर्ष वयाच्या झाडास १५ केिली कंपोस्ट खत, १५0 ग्रॅम नत्र, ५u ग्रॅम स्फुरद व १00 ग्रॅम पालाश ही खते पावसाळ्याच्या सुरुवातीस झाडासभोवती चर खोदून द्यावीत. दरवर्षी ही मात्रा समप्रमाणात वाढवून १० व्या वर्षापासून प्रत्येक झाडास ५५ किंली कंपोस्ट खत, १.५ किंलो नत्र, ५00 ग्रॅम स्फुरद व १ किलो पालाश बांगडी पध्दतीने जून महिन्यात देण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच फळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पालाश हे अन्नद्रव्य सल्फेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून द्यावे. आंबा हे कोरडवाहू पीक असून वरील खते पावसाळ्याच्या सुरुवातीस एकदाच दिली जातात. मोहोरापासून फळे तयार होण्याच्या कालावधींमध्ये झाडावर विंद्यापीठाने विकसित केलेल्या 'आम्रशक्ती' या बहुअन्नद्रविंय संयुगाच्या तीन फवारण्या अनुक्रमे मोहोर फुटताना करण्यात आल्या. या बहुअज्ञद्रक्यि संयुगामध्ये प्रत्येकी o.५ टक्के युरिया, सल्फेट ऑफ पोटॅश, सिंगल सुपरफॉस्फेट आणि प्रत्येकी 0.01 टक्के सॉड़ियम मॉलेिब्डेट यांचा समावेंश होंतों.
आंब्याच्या हापूस, दशेरी, लंगडा या सारख्या प्रमुख जातींमध्ये वर्षाआड फळे येण्याची विकृती आहे. साहजिकच दरवर्षी बागेतील सर्व झाडांपासून पॅक्लोब्यूटॅ्झॉलची आवश्यकता मात्रा (मी.ली.)/झाड = झाडाचा पूर्व-पश्चिम विस्तार + झाडाचा दक्षिणोत्तर विस्तार (मीटर)/२ * ३ अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने बागेची उत्पादकता कमी होते. वर्षाआड फळे येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मोहोर येण्यासाठी फांदीची आवश्यक असलेली पकृता. ही पक्र फांदीमधील विविध संजीवकांच्या प्रमाणावर अवलंबून असते. पालवी येते. त्यामुळे जिबरेलिनसचे प्रमाण कमी करण्यासाठी इथेफॉन, यांसारख्या खतांचा फवारणीचा परिणाम अभ्यासण्यात आला. परंतु त्यामधून अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही. त्यानंतर पॅक्लोब्युट्रॅझॉल या वाढ निरोधक संजीवकांचा वापर दरवर्षी मोहोर येण्यासाठी परिणामकारक दिसून आला.
पॅक्लोब्युट्रॅझॉलच्या वापरावर सखोल संशोधन करून आंबा कलमांना दरवर्षी मोहोर येण्यासाठी पॅक्लोब्युट्रॅझॉल हे वाढ निरोधक संजीवके झाडाच्या विस्तारानुसार (०.७५ ग्रॅम/प्रती मीटर विस्तार म्हणजेच ३ मि.ली. कल्टार/ सेलस्टार प्रती मीटर विस्तार) जमिनीतून देण्याची शिफारस करण्यात आली. कोकण विभागात पॅक्लोब्युट्रॅझॉल १oजुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये झाडाच्या बुध्यालगत १० ते १५ सेंमी. खोल चरीमध्ये किंवा भोकामध्ये पाण्यात मिसळून द्यावे. प्रत्येक झाडास आवश्यक असलेली पॅक्लोब्युट्रॅझॉलची मात्रा काढण्यासाठी वरील सूत्र वापरावे. वरील मात्रा २ ते ३ लीटर पाण्यामध्ये मिसळून हे द्रावण झाडाच्या बुध्यासभोवती भोकामध्ये अथवा चरीमध्ये समप्रमाणात विभागून द्यावे. नियमित उत्पादनासाठी पॅक्लोब्युट्रॅझॉल दरवर्षी देणे आवश्यक आहे, तसेच त्यासाठी झाडांना नियमित खते द्यावीत.
आंबा कलमांना मोहोर येताना व त्यानंतर फळधारणेच्या कालावधीमध्ये हवामान समाधानकारक असल्यास चांगली फcळधारणा होते. वाढीच्या विविध अवस्थांमध्ये जसे की, फळे वाटाणा, सुपारी व अंडाकृती असताना वेगवेगळ्या कारणांनी फळांची गळ होते. फळगळ मोठ्या प्रमाणावर झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. फळांची विविध प्रकारे होणारी ही गळ कमी करण्यासाठी कृषि विद्यापीठाने संशोधन करून विविध उपाय सुचविले आहेत. विविध अवस्थेमध्ये होणारी गळ ही प्रामुख्याने वाढणा-या फळांमध्ये अन्नद्रव्य, पाणी, संजीवके इ. साठी होणा-या स्पर्धेमुळे होते.
ही स्पर्धा कमी करून फळगळ रोखण्यासाठी एन.ए.ए. (२० पी.पी.एम) किंवा २, ४- डी (१० पीपीएम) च्या दोन फवारण्या अनुक्रमे फळे वाटाणा आकाराची असताना व त्यानंतर १५ दिवसांनी कराव्यात. तसेच प्रत्येक वेळी १५o ते २00 लिटर पाणी द्यावे. त्याचबरोबर फळगळ कमी करणे तसेच फळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) या पाण्यात विद्राव्य खताच्या १ टका तीव्रतेच्या (१o गॅम प्रति लीटर) च्या तीन फवारण्या फळे वाटाणा, सुपारी व अंडाकृती असताना कराव्यात. एकाच हंगामामध्ये पुन्हा पुन्हा येणारा मोहोर ही आंब्यामधील एक जटिल समस्या आहे. पहिल्या मोहोरास फळधारणा झाल्यानंतर त्याच फांदीला पुन्हा मोहोर येतो व त्यामुळे पहिल्या मोहोराची फळे गळून पडतात. कोकणासारख्या लवकर मोहोर येणा-या भागांमध्ये ही समस्या अधिक जटिल असून काही
वेळा अंडाकृती झालेल्या फळांची देखील गळ झालेली दिसून येते. या पुन्हा-पुन्हा येणा-या मोहोरास जिब्रेलिक आम्ल प्रतिबंध करू शकते. यावर उपाय म्हणून ५० पीपीएम जिब्रेलिक आम्लाच्या दोन फवारण्या करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यातील पहिली फवारणी पहिला मोहोर पुरेशा प्रमाणात आला असल्यास त्वरित करावी.
तर दुसरी फवारणी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना करावी. पीक संरक्षण आंबा हे सदाहरित फळपिक असल्याने विविध किडी व रोगांचे वास्तव्य जवळजवळ वर्षभर असते. नवीन पालवी तसेच मोहोर येणा-या कालावधीमध्ये त्यांची संख्या झपाट्याने वाढते व त्यामुळे पिकांचे नुकसान होते तसेच तापमानामध्ये अचानक होणारी वाढ, थंडीची लाट, बिगर मोसमी पाऊस, ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढलेली आद्रता यामुळे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो. विविध किडींमध्ये तुडतुडे, फुलकिडे, फळमाशी, पिठ्या ढेकूण, मिजमाशी, शेंडा पोखरणारी अळी, फळे पोखरणारी अळी आणि खोडकोड या प्रमुख किडी आहेत. तर करपा (पानावरील मोहोरावरील तसेच फळांवरील करपा), भुरी, फांदेमर, पिंकरोग, फळकुज हे प्रमुख रोग आहेत.
या किडी व रोगाचा प्रादुर्भाव पालवी येताना, मोहोर येताना तसेच फळवाढीच्या विविध कालावधीत जास्त असतो. या किडी व रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी एकात्मिक मोहोर संरक्षण वेळापत्रक विद्यापीठाने शिफारस केलेले आहे. किडीच्या तीव्रतेनुसार तसेच औषधांच्या उपलब्धतेनुसार यामध्ये वेळोवेळी बदल सुचविले जातात.
शेतक-यांसाठी सुचविलेले वेळापत्रक फळमाशीचा प्रादुर्भाव हा फळे तयार झाल्यानंतर वाढतो. यावेळी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणे इष्ट नाही. यामुळे फळमाशीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने 'कोकण रक्षक' हा सापळा विकसित केला असून फळधारणेपासून हेक्टरी ४ या प्रमाणामध्ये हे सापळे बागेमध्ये लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. या सापळ्यामध्ये ‘मिथाईल युजेनॉल' या रसायनाचा कामगंध म्हणून वापर करण्यात केला आहे. त्याच्या वासास नर माशी आकर्षित होऊन सापळ्यात अडकते व पुढील प्रजनन थांबून कोड आटोक्यात येते.
आंब्यामध्ये फळांच्या काढणी व हाताळणीचा थेट परिणाम पिकण्यावर व फळांच्या प्रतीवर होतो. कोवळी फळे काढल्यास पिकण्यास जास्त दिवस लागतात. पिकलेली फळे सुरकुततात तसेच फळांचा रंग व स्वाद यावर विपरीत परिणाम होतो. सहाजिकच अशा फळांना बाजारभाव मिळत नाही. अतिपक्र व झाडावर पिकलेली फळे काढल्यास देखील अपेक्षित रंग, स्वाद मिळत नाही. तसेच हापूससारख्या जातींमध्ये 'साका' ही विकृती अनेक फळांमध्ये दिसून येते. त्यामुळे फळे पिकल्यानंतर उत्तम रंग, स्वाद व चव मिळण्यासाठी आंबा फळे १४ आणे (८५ टक्के ) पकृतेची काढावीत. यावेळी फळांना लालसर रंगाची छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्यापासून फिकट हिरवा होतो. तसेच घनता १.0२ ते १.o४ एवढी असावी. केसरसारख्या जातीमध्ये फळावरील तैलग्रंथी अधिक गडद होतात, तर पायरीसारख्या जातीमध्ये फळांची चोच पूर्णपणे विकसित होते. यावेळी फळांची काढणी करावी. फळांची काढणी देठासहित करावी, त्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या 'नूतन' झेल्याचा वापर करावा. फळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चार नंतर काढावीत. काढणी केलेली फळे उन्हामध्ये राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. फळे उन्हामध्ये राहिल्यास त्यामध्ये 'साका' होण्याची शक्यता वाढते.
काढणी केलेल्या फळांच्या वजनावर आधारित प्रतवारी करावी. ३५o ग्रॅम पेक्षा मोठी, ३00 ते ३५१ ग्रॅम वजनाची, २५१ ते ३00 ग्रॅम वजनाची व २५o पेक्षा कमी वजन असलेली अशी प्रतवारी करावी. प्रतवारी झाल्यावर ही फळे ५oo पीपीएम कार्बन्डॅझिम (o.५ ग्रॅम कार्बनडेझिम १ लिटर पाण्यात) च्या द्रावणात १० मिनिटे बुडवावीत. त्यामुळे काढणीनंतर फळे कुजण्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर ही फळे पंख्याखाली वाळवावीत आणि छिद्रे असलेल्या विविध डिझाईनच्या पुठ्याच्या खोक्यामध्ये भरावीत. दोन थरांच्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.
काढणीनंतर आंबा फळे पिकण्यासाठी १o ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्यासाठी तसेच फळे एकसारखी पिकण्यासाठी '७ × ७ × ७' आकाराचा हा कक्ष सिलपाऊलिन (प्लॅस्टिक) आणि पी. व्ही. सी. पाईपच्या सहाय्याने तयार करण्यात आला असून यामध्ये
एकावेळी ५oo ते ७oo किलो फळे पिकवता येतात. या हवाबंद कक्षामध्ये फळे ठेवून बाहेर काढून २ तास उघडी ठेवून नंतर पुठ्याच्या खोक्यांमध्ये भरली जातात. या पद्धतीने फळे ४ ते ५ दिवसात व एकसारखी पिकतात. या व्यतिरिक्त निर्यातीसाठी आवश्यक असलेली साका विरहीत फळे मिळविण्यासाठी विद्यापीठाने 'क्ष' किरण प्रतिमांकन यंत्र (x-ray imagination technique) विकसित केले असून या यंत्राच्या सहाय्याने साक्यासहित इतर कारणांनी बाधित फळे वेगळी करता येतात. मात्र अद्याप हे यंत्र शेतकरी वापरासाठी उपलब्ध झालेले नाही.
गेल्या दशकभरापासून आंबा पिकाची महाराष्ट्रातील उत्पादकता कमी राहिलेली आहे याचे प्रमुख कारण म्हणजे बदलत्या हवामानाचा मोठा फटका या आंबा बागांना बसत आहे. बिगर हंगामी पाऊस, उशिरापर्यंत असणारी थंडी तापमानामध्ये अचानक होणारी वाढ, गारपीट यांसारख्या व्याधी आंबा उत्पादनास घातक ठरत आहेत. विशेषतः कोकणातील जुन्या बागांना याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसताना दिसतो आहे. या सारख्या नैसर्गिक आपत्तीपासून उत्पादन वाचवायचे असल्यास झाडांना सशक्त बनविणे आवश्यक आहे; त्यासाठी झाडांच्या शाखीय व्यवस्थापनाकडे लक्ष पुरविणे, जेणेकरून सूर्यप्रकाश व हवेचे वहन झाडामध्ये चांगल्या पध्दतीने होईल. प्रमाणावर होऊन शेतक-यांकडून अवलंब होणे आवश्यक आहे. जुन्या झाडांची उंची वाढल्याने आंतरमशागतीची कामे करणे दुरापास्त झाले आहे. तसेच या कामासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ दिवसेंदिवस दुर्मीळ होत आहे. यावर उपाय म्हणजे झाडांचा विस्तार आटोपशीर ठेवणे. म्हणजे जमिनीवरून सर्व धडक मोहिम राबविणे काळाची गरज आहे. शेतक-यांमध्ये या बाबतची जागरुकता होताना दिसत आहे. त्याला योग्य पाठबळ मिळाल्यास ही मोहीम जोर धरू शकेल.
झाडाचा विस्तार कमी झाल्यानंतर उपलब्ध होणा-या जागेमध्ये आंतर लागवड करून या बागांचे घन लागवडीमध्ये रुपांतर करण्याची गरज आहे. त्यामुळे हेक्टरी झाडांची संख्या १०० वरून ४०० पर्यंत वाढल्याने साहजिकच उत्पादन वाढल्यास मदत होईल. नवीन होणारी लागवड ही पारंपरिक ऐवजी घन लागवडीकडे शेतक-यांची मानसिकता वळविणे आवश्यक आहे. याचबरोबर हापूस, केसर यासारख्या जातींबरोबरच रत्ना, अन्य जातींचा पर्याय उपलब्ध आहे. या जाती बदलत्या हवामानामध्ये देखील चांगले उत्पादन देतात. आजमितीस आंबा बागांच्या होणा-या नुकसानामध्ये कोड व रोगापासून होणा-या नुकसानीचा वाटा मोठा आहे. बागायतदार त्यांच्या यावर खर्च कमी करण्यासाठी तसेच प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक पीक उत्पादन पध्दतीचा तसेच एकात्मिक कोड व रोग नियंत्रणाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
फळधारणा ते फळांची काढणी या कालावधीमध्ये येणा-या नैसर्गिक आपत्तीपासून फळांचे रक्षण करण्यासाठी 'बँगिग’ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. याबाबत विद्यापीठामध्ये संशोधन सुरू असून आशादायक निष्कर्ष हाती आले आहेत. फळे सुपारी ते अंडाकृती आकाराची असताना फळांना पिशव्या घातल्यास फळे डागविरहित राहून फळांना आकर्षक चकाकी येते, तसेच फळांचे वजन देखील काही प्रमाणामध्ये वाढते. याशिवाय या फळांना फळमाशी, साका, देठ कुजणे इ. चा प्रादुर्भाव होत नाही. गेल्या काही वर्षापासून अवेळी पडलेल्या पावसामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये पालवी येते. ही पालवी पक्र झाल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये मोहोर येतो, त्यामुळे बहुतांशी आंबापीक हे पावसाळ्याच्या तोंडावर तयार होते.
भविष्यामध्ये पावसाळ्यानंतर येणारी ही पालवी थांबविणे तसेच आलेली पालवी लवकर पकृ करणे यासारख्या प्रश्नांवर संशोधन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हवामानातील बदलास प्रतिकार करणारा तसेच उत्तम रंग, स्वाद, टिकाऊपणा आणि भरपूर उत्पादन देणारा वाण विकसित करणे हे देखील आव्हान पेलणे आवश्यक आहे. आजमितीस अांब्याचे २५ ते ३o टक्के उत्पादन फुकट जाते किंवा कवडीमोल भावाने विकले जाते. विद्यापीठाने कच्च्या आंब्यापासून चटणी, लोणची तसेच वाईन आणि पिकलेल्या पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे प्रक्रिया पदार्थ व्यापारी तत्त्वावर तयार करण्यासाठी समूह/सहकारी तत्वावर अत्याधुनिक प्रक्रिया केंद्रे उभारणे व त्याद्वारे दर्जेदार पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
हापूस आंबा गुणवत्ता केंद्र राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत भारत-इस्त्रायल कृती आराखड्यामध्ये हापूस आंबा गुणवत्ता केंद्राची दापोली येथे स्थापना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारत-इस्त्रायल कृती आराखड्यांतर्गत दापोली येथे सन २०१०-११ मध्ये हापूस आंबा गुणवत्ता केंद्र (Centre of Excellance for Alphanso Mango) हा प्रकल्प सुरु करण्यात आला.
यामध्ये रोगविरहित सदृढ रोपे तयार करणे, नवीन प्रशिक्षणाव्दारे मनुष्यबळ विकास हे प्रमुख घटक होते. या प्रकल्पामध्ये कृषि विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि इस्त्रायलमधील तंत्रज्ञान याची सांगड घालून शेतक-यांना उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. सदर तंत्रज्ञान विकसित करताना इस्त्रायलमधील शास्त्रज्ञांनी दापोली येथे नियमितपणे भेटी दिल्या. या प्रकल्पातंर्गत विद्यापीठाच्या तसेच शेतक-यांच्या शेतावर विविध प्रात्यक्षिके घेऊन जुन्या व अनुत्पादक आंबा बागांचे पुनरुजीवन करण्याबाबतचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. या तंत्रज्ञानाचे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर १५६o झाडांचे पुनरुजीवन करण्यात आले. तसेच कोकणातील १०३ गावांमधील २०२ शेतक-यांकडील १४०२ झाडांचे पुनरुजीवन प्रात्यक्षिके घेण्यात आली.
ही सर्व झाडे पुनरुजीवित झाली असून त्यापासूनची फळधारणा सुरू झाली आहे. या प्रकल्पांतर्गत २५ शेतक-यांकडे ५ × ५ मी. अंतरावर सघन लागवडीची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. तसेच विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर विविध बहुअंकुरीत जातींचा मूळकांड म्हणून हापूसवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी विविध अंतरावर सघन पद्धतीने लागवड करून करण्यासाठी मोठ्या आकाराच्या (१४ x १० इंच) प्लॅस्टिक बॅग मध्ये कलमे केंद्रांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४oo तज्ज्ञ प्रशिक्षकांना व ५ooo पेक्षा जास्त शेतक-यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
यामध्ये कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, विविध निमशासकीय संस्थाचे प्रतिनिधी, कृषि विद्यापीठाचे कर्मचारी आणि शेतकरी यांचा समावेश आहे. सदर प्रकल्पाची मुदत मार्च,२०१५ ला संपली असून विकसित केलेले तंत्रज्ञान शेतक-यांना उपलब्ध करण्यासाठी कृषि विद्यापीठ परिभ्रमण निधीच्या माध्यमातून सदर प्रकल्प सुरू ठेवण्यात आला आहे. यामध्ये शेतक-यांच्या मागणीप्रमाणे समूहुतत्वावर सशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम व छाटणीच्या प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येत आहे.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीन...
आंबा फळामध्ये साका पडतो, काही कलमे वठतात त्यासाठी ...
रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथील डॉ. विवेक भिडे य...
आंब्याला मोहोर येण्याच्या वेगवेगळ्या अवस्था आणि त्...