उलाल (कर्नाटक) येथील काजू संशोधन केंद्राने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन प्रचलित जातींपेक्षा अ धिक उत्पादन देणारी एनडीआर 1-2 ही जात विकसित केली आहे. या संशोधन केंद्रावर नुकताच शेतकरी दिन साजरा करण्यात आला. या वेळी काजूच्या विविध जातींची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या जातीसंबंधी माहिती देताना संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. लक्ष्मण म्हणाले, की या जातीचे बी मोठ्या आकाराचे आहे. या जातीपासून सरासरी 21.4 किलो प्रति झाड इतके उत्पादन मिळते. ही जात केरळ मधील मड्डकाथरा येथील काजू संशोधन केंद्राने विकसित केली आहे. ही जात विकसित करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला.
किनारपट्टी भागासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे उत्पादन उलाल-1, उलाल-2, उलाल-3 आणि यूएन-50 या जातींपेक्षा जास्त आहे. उलाल-1 या जातीचे प्रति झाड उत्पादन 20 किलो इतके आहे. देशांतर्गत काजू उत्पादनवाढीसाठी सरकारने अनुदान योजनेत वाढ करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. काजूबोंडापासून इथेनॉल निर्मितीसाठीचा प्रकल्प आम्ही कृषी विद्यापीठाला सादर केला आहे. या प्रकल्पाच्यादृष्टीने आम्ही केंद्रावर डिस्टिलेशन युनिटची उभारणी केली आहे.
काजू उत्पादनाबाबत प्रा. लक्ष्मण म्हणाले, की कर्नाटकातील प्रति हेक्टरी काजू उत्पादन 461 किलो आहे, तर महाराष्ट्रातील काजू उत्पादन 1186 किलो आहे. त्यामुळे येत्या काळात कर्नाटकातील काजू उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, पीक व्यवस्थापन, काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत मा हिती देण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य एस. डी. संपत सम्राज्य म्हणाले, की भारतीय काजूला जाग तिक स्थावर चांगली मागणी आहे. परंतु ही मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादकता वाढवावी लागणार आहे. सध्या दरवर्षी आपल्याकडे पाच लाख टन काजूचे उत्पादन होते. परंतु देशातील काजू प्रक्रिया केंद्रांची मागणी ही 12 लाख टनांची आहे. ही परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांपर्यंत अधिक उत्पादनक्षम जाती पोचवाव्या लागतील. शेतकऱ्यांनी देशील सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन कशा पद्धतीने वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
हे मूळचे ब्राझील देशातील पीक १६ व्या शतकात पोर्तुग...
काजू बी टरफलाच्या आतील व बाहेरील आवरणामध्ये ज्या म...
काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. काजू उत्पादनापासून...
काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर ...