অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुलशेतीचे जागतिकीकरण व विक्री व्यवस्थापन

फुलशेती : भारताची जुनी परंपरा

फुलशेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली तरी सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीने एक शास्त्र म्हणून फुलशेती अतिशय महत्वाची कामगिरी बजावत आहे. देशाच्या कानाकोप-यात लहान-लहान क्षेत्रावर ती खूप प्राचीन काळापासून होत असली तरी व्यापारी तत्वावरील आधुनिक फुलशेती ही अलीकडची संकल्पना आहे. पूर्वीपासून उघड्यावर फुलप्योती केली जात असल्याने त्यांना जैविक तसेच अर्जेविक घटकांशी सामना करावा लागतो त्यामुळे या पैिकापासून भरपूर दर्जेदार उत्पादन मिळत नव्हते. आताच्या जागतिकीकरणाच्या युगात मात्र निर्यातक्षम फुलोत्पादनास महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या संज्ञानुसार सध्याच्या स्पर्धात्मक युगात उचप्रतेिचे दर्जेदार फुलोत्पादन घेणे क्रमप्राप्त आहे. जगात सध्या फुलांचा व्यापार तेजीत आहे. त्यामध्ये ६ ते २० टक्के प्रतिवर्षी वाढ होत आहे. परंतु फुलांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा अतिशय नगण्य (०.०७ टक्के ) आहे. गेल्या काही वर्षांमधील फुलशेती विषयी केंद्र शासनाची धोरणे लक्षात घेता मुंबई, पुणे, बेंगलोर, हैद्राबाद, दिर्ली यासारख्या मोठ्या शहरांच्या आसपास अत्याधुनिक फुलोत्पादनासाठी उभारलेल्या उच्च तंत्रज्ञान हरितगृहांची उभारणी वाढ्ल्याचे दिसून येत आहे. तमिळनाडू हे भारतातील फुलोत्पादनात अग्रेसर असलेले राज्य असून त्याखालोखाल कर्नाटक राज्य आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भारतात फुलशेतीखाली असलेल्या एकूण क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्र आहे. तसेच कर्नाटकमध्ये बंगळूर शहरात भारतातील पहिले फुलांचे संगणकीकृत लिलाव विक्री केंद्र कर्नाटक अॅग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने सुरु केले आहे.

फुलांचे जागतिकीकरण

जगातील बहुतांश देशामधील फुलशेती ही खेळते भांडवल निर्माण करणारा व्यवसाय आहे. फुलपिके व शोभिवंत झाडे ही देशी आणि परदेशी व्यापारासाठी लागवड करण्यास उपयुक्त असून त्यांच्यापासून प्रती एकर मिळणारे उत्पादन हे तुलनात्मकदृष्ट्या शेतीतील इतर नगदी पिके. भाजीपाला पिकांपेक्षा जास्त आहे. शेती उत्पादन हे बाजारात केिलो अथवा फ्रेिंटलमध्ये विकले जाते, परंतु फुलांच्या दांड्यांची विक्री ही नगावर केली जाते. त्यामुळे फुलदांड्यापासून मिळणारे उत्पादन जास्त असते. साधारणत: ग्लॅडओलस, गुलाब, जरबेरा, कानेंशन, ऑर्केड्स, अॅन्थुरियम इत्यादि फुलांपैकांचे बाजारात फुलदांडे विकले जातात. तुलनात्मकदृष्ट्या फुलपिके ही हंगामी असून लागवडीपासून त्यांना फुलावर येण्यासाठी कमी काळ लागतो. म्हणजे उत्पादकता अवस्था लवकर सुरू होते.

सध्याच्या आधुनिक युगात फुलशेती करणे म्हणजे बाजारात चढ्या दराने विक्री होणा-या लांब दांड्याच्या फुलपिकांची शेती करणे असे मानले जाते. उचप्रतिची लांब दांड्याची फुले प्रामुख्याने घराच्या आतील भाग सुशोभिंत करण्यासाठी, सभा, संमेलन व समारंभासाठी लागणारे स्टेज डेकोरेशन करण्यासाठी तसेच फुलांचे गुच्छ, पाकळ्या, तुरे इ. तयार करण्यासाठी वापरतात. भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण व समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू अॅस्टर, शेवंती, गॅलार्डिया इत्यादिंच्या सुट्या फुलांना मोठी मागणी असते आणि असे सण, समारंभ आणि उत्सव भारतात वर्षभर चालूच राहतात. फुलांचा वाढता उपयोग व्यक्तीजीवनात करण्याला सध्या भारतात वेगळेच महत्व येत आहे. अगदी मानसाच्या जीवनशैलीला फुलांचा उपयोग जोडला जात आहे. असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. याशिवाय क्रियेक लोक फुलशेती, लँड्स्केप, हरितगृहातील फुलशेती या महत्वपूर्ण विषयाचे सलागार म्हणून काम करत आहेत. तर काही लोक या विषयाच्या अद्ययावत ज्ञानाचे धडे घेऊन इतरांना प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय करतात. फुलशेतीतील काही यशस्वी उद्योजक आपल्या या व्यवसायात इतर सुशिक्षित लोकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देताना दिसतात.

याशिवाय फुलशेतीमध्ये संशोधन आणि फुलपिकांचे उत्पादन या व्यवसायामध्येही खूप मोठी संधी आहे. मोठ्या शहरामध्ये सुंदर शहराचे नियोजन, त्याचा आराखडा तयार करणे, आखणी करणे आणि स्मार्ट सिटीची उभारणी करणे ह्या हृलीच्या वाढ्या शहरीकरणामध्ये अतिशय उचप्रतिचा आणि फायदेशीर व्यवसाय झाला आहे. जगामध्ये जवळजवळ १४६ देश फुलांचे उत्पादन व विक्री या व्यवसायामध्ये अग्रेसर आहे.

अशा या व्यापारी दृष्टिकोनातून महत्व असलेल्या फुलशेतीला सध्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातूनही फार महत्व आलेले आहे. स्मार्ट सिटीची संकल्पना आणि सध्या केंद्र शासनाने भारतातील ४६ शहरांची सुंदर शहरांमध्ये परिवर्तन करण्याची तसेच अनेक स्मार्ट सिटीची उभारणी करण्याची महत्वाकांक्षी योजना सुरू करून त्याअंतर्गत करोडो रुपयांचे उत्पादन देणारा बांधकाम उद्योग नावारूपाला येत आहे. यामध्ये फुलशेती, शोभिवंत झाडे, वनश्री. लॅप्ड स्केपींग हेच मुळात स्थावर मालमत्तेचे तसेच घर व वास्तू मूल्यवर्धेित करण्याचे प्रमुख साधन झाले आहे. त्यासाठी शहरांची निर्मिती ही प्रामुख्याने जैव-सौंदर्यपूर्ण अशी करावयास हवी.

म्हणजेच ती शहरे प्रदूषणमुक्त विकसलेली करणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शहरे ही इमारतीने न बहरता झाडझुडपांनी, फुलाफुलांनी, बागबगीचांनी, हिरवाईने नटलेली असायला हवीत. तेव्हाच देश सदृढ व संपन्न होईल. शहराच्या सौंदर्याबरोबर घराचे आंतर्बाह्य सौंदर्य वाढवायला हवे. घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी शोभिवंत पानाफुलांच्या कुंडीतील झाडांची व फुलांची कल्पकतेने सौंदर्यपूर्ण मांडणी करून घराच्या आतील शोभा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. तर अशाचप्रकारे घर, व्हरांडा, खेिड़कया, गचों आणि घराच्या सभोंवतालचा मोकळा परेिसर यामध्ये बागेला वेिकसित करुन शोभिवंत घस्कुलासाठी कल्पकतापुर्वक सौंदर्यवृद्धी केल्यास घराची किंमत तर वाढतेच परंतु त्याचबरोबर मन प्रफुलित राहून आरोग्यसंपन्न जीवन जगता येते. शुद्ध व खेळती हवा, सुंदर प्रसन्न वातावरण आणि सभोवार पसरलेली हिरवळ माणसाच्या मनाची उमेद वाढवते. मन निरोगी ठेवते. मन निरोगी ठेवण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे.

जगामध्ये जागतिकीकरण झाल्यानंतर कृषी क्षेत्रात फुलशेती एक महत्वाचा व्यवसाय ठरला आहे व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठीचा एक चांगला मार्ग छ्दयास आला आहे. कमीतकमी क्षेत्रावर अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचे साधन म्हणून अल्पभूधारक असलेला शेतकरी याच्याकडे आकर्षित होत आहे. जागतिकीकरणामुळे विविध बाजारपेठा फुलांसाठी खुल्या झाल्या आहेत आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये फुलांची विक्री करण्याची संधी आहे. असे करून त्यातून बरीच परकीय गंगाजळी आपल्या देशात येऊ शकते व शेतक-यासोबतच देशाचीही प्रगती होण्यास मदत होईल. जगभरात फुलशेतीचा विकास १० टक्के दराने होत आहे आणि ५0 पेक्षाही जास्त देश मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन व व्यवसाय करत आहेत. फुलांच्या उत्पादनमूल्यानुसार अमेरिका, जपान, इटली, जर्मनी आणि कॅनडा हे देश अग्रेसर आहेत तर चीन आणि भारतामध्ये फुलांखालील लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. जगामध्ये जास्तीतजास्त फुलांचा वापर करणाच्या देशांमध्ये युरोप, अमेरिका आणि जपानचा समावेश होतो. परंतु बरेच आफ्रिकन देश आता या क्षेत्रामध्ये आगेकूच करत आहेत व उत्पादन करण्यासाठी एक नवा मार्ग उपलब्ध होत आहे. सन २o१३ साली जगामध्ये फुलांच्या निर्यातीचे मूल्य हे २0.४ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते. यामध्ये फुलदांड्या, पाने, कुंड्यामधील शोभेच्या वनस्पती, फुलांचे कंद यांचा समावेश आहे.

वर्ष क्षेत्र (००० हेक्टर ) उत्पादन (०००मे. टन)
२००१-०२ १०६ ५३५
२००२-०३ ७० ७३५
२००३-०४ १०१ ५८०
२००४-०५ ११८ ६५९
२००५-०६ १२९ ६५४
२००६-०७ १४४ ८८०
२००७-०८ १६६ ८६८
२००८-०९ १८७ ९८७
२००९-१० १८३ १०२१
२०१०-११ १९१ १०३१
२०११-१२ २४५ १६५२
२०१२-१३ २३३ १७२९
२०१३-१४ २५५ २२९७

विक्री व्यवस्थापन

उत्तम दर्जाच्या  फुलांचे उत्पादन करणे आणि त्यास योग्य तो भाव मिळवणे हा शेतक-यांचा एक मुख्य उद्देश असतो. परंतु उत्तम प्रकारे फुलांचे उत्पादन करणे हे त्याचाच हातात असते पण योग्य तो भाव मिळणे याची शाश्वती नसते. बाजारभाव निश्चित होण्यासाठी बरीच कारणे आहेत. मुख्य ग्राहकांच्या हातात अंतिमतः कोणत्या गुणवत्तेची फुले मिळतात हे फुलांच्या काढणीपूर्व आणि काढणीपश्चात हाताळणीवर अवलंबून असते कारण फुले फार नाजूक असतात. फुलांच्या गुणवत्तेवर फुलांची बाजारातील किंमत ठरते तसेच फुलांच्या दर्जानुसार ग्राहकाला आनंद व समाधान प्राप्त होते. फुले हा अतिशय नाशवंतमाल आहे. कारण ती फार नाजूक असतात. फुलांची काढणी करताना ती आपण मातृवृक्षापासून कापून अलग करतो. काढणी केलेली फुले ही अन्न, पाणी, क्षार आणि संजीवके यांच्यापासून फुलांच्या उत्पादनापैकी जवळजवळ ३० टक्के फुलांची नासाडी ही फक्त विक्री होऊन ग्राहकाच्या हाती फुले जाईपर्यंत त्याची गुणवत्ता व दर्जा टिकून ठेवण्यासाठी काढणीपश्चात फुलांची हाताळणी शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे.चांगला बाजारभाव मिळण्यासाठी व काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल

फुलांच्या उत्पादनाची वेळ

फुलांचे उत्पादन करण्यासाठी मार्केटचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. मार्केटमध्ये कोणत्या फुलांना कधी बाजारभाव उत्तम असतो त्यानुसार फुलांची लागवड करणे आणि योग्य त्या वेळी त्यांची विक्री करणे याचा अभ्यास करणे गरजेच आहे. भारतामध्ये फुलांचा वापर एका विशिष्ट पद्धतीने केला जातो. त्या तुलनेने पश्चात देशात फुलांचा वापर सरांस होतो. तेथे फुले ही त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक भाग असून ताजी फुले घरामध्ये ठेवण्याची पद्धत आहे. वेगवेगळ्या समारंभामध्ये फुलांना फार महत्व आहे. त्यामानाने भारतात ही संस्कृती अजून रुजू होत आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या समारंभामध्ये फुलांचे महत्व वाढत आहे. अनेक प्रकारचे दिवस व सण भारतात साजरे होत आहेत आणि त्यासाठी आणि योग्यवेळी लागवड करून हवी तेव्हा फुले विक्रीसाठी तयार असतील तरच तुमचे विक्री व्यवस्थापन योग्य पद्धतीने होईल.

फुलांची काढणी

काढणीपश्चात फुलांचे आयुष्य हे अनेक बाबींवर अवलंबून असते. फुलांची काढणीपश्चात आयुष्य हे फुलांची जात व प्रजातीनुसार वेगवेगळे असते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याचे आनुवंशिक गुणधर्म होय. त्यामध्ये फुलपिकाची वाढ, शरीराची रचना, भौतिक, जैव-रासायनिक व आनुवंशिकबंध इत्यादी घटक येतात. फुलांचे काढणीपश्चात आयुष्य हे फुलदांड्यात/ कुमांत साठलेले कर्बोदकांचे प्रमाण, एकूण पाकळ्यांची संख्या, फुलांच्या देठाची लांबी व जाडी, झायलेम व फ्लोयमची कार्यक्षमता, प्रतिकारक्षमता, संजीवकांचे प्रमाण, पेशीजालाची तिव्रता, रोग व किडीला बळी पडण्याची क्षमता इ. गोष्टी कारणीभूत असतात. फुलांचे काढणीपश्चात आयुष्य हे खालील दोन बाबीवर परिणाम करतात. म्हणजे फुलांचे काढणीत्तयम आयुष्य हे पीक व्यवस्थापनेतील आणि हवामानातील घटकावर काढणीपश्चात फुलांचे आयुष्य कमी-जास्त होऊ शकते. फुले काढणीची वेळ, स्थिती व पद्धती यावर फुलांचे फुलदाणीतील सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा वातावरणातील तापमान कमी झाल्यानंतर काढावीत. कमी तापमानात झाडांचा श्वसनाचा वेग कमी होऊन शरीरांतर्गत पाण्याचा विनियोग कमी होतो.

शक्यतो फुले ही संध्याकाळी काढण्याचा सल्ला दिला जातो. कारण दिवसभराच्या प्रकाशसंश्लेषनाच्या क्रियेने फुलदांड्यात भरपूर अन्नद्रव्ये साठली जातात. फुले काढणी केल्यानंतर ती लगेच पाणी अथवा फुलांचे संरक्षित करणाच्या काढणीसाठी धारदार सुरी अथवा सिकेटरचा उपयोग करावा. काढणी साह्याने तिरपा काप द्यावा, त्यामुळे दांड्याचा जास्तीतजास्त भाग उघडा होऊन दांडे भरपूर पाणी शोषून घेऊ शकतील. काढणी ही फुले/दांड्याची लांबी, फुलपिकाचा उपयोग व बाजारातील मागणी यावर अवलंबून ठेवावी. व पकृतेची लक्षणे वेगवेगळी असतात.

ग्रेडिंग आणि पॅकेजिंग

आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तावान फुलांचे उत्पादन करण्यासाठी अतिशय परिश्रम करावे लागतात. फक्त उत्पादनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्थरावर निर्धारित केलेल्या मानकानांचा काटेकोरपणे अवलंब करावा लागतो. उत्तम दर्जाच्या पिकवलेल्या फुलांना योग्य ते मूल्य मिळवण्यासाठी फुलांची योग्य पद्धतीने वर्गीकरण करणे गरजेचे असते. फुलोत्पादन करण्यासाठी जितकी पुष्पदांड्यांची काढणी केल्यानंतर लगेच त्यांना पाण्यामध्ये ठेवणे अत्यंत गरजेच असते. स्वच्छ पाणी, अवजारे (कात्री/कटर), फुले ठेवण्याची बादली/भांडे, इत्यादी साहित्यांची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. काढणी झाल्यानंतर ही फुले वर्गीकरणासाठी वर्गीकरण विभागात ठेवण्यात येतात. मार्केटमध्ये पाठवण्याअगोदर फुलांच्या प्रतीनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. फुलांच्या वर्गीकरणासाठी जगामध्ये वेगवेगळी मानांकाने अस्तित्वात आहेत व ती प्रत्येक देशानुसार वेगळी असू शकतात. गरजेनुसार वर्गीकरण केल्यानंतर फुलांचे पॅकिंग केले जाते. पॅकिंग करण्यासाठी विविध प्रकारचे बॉक्स उपलब्ध आहेत. क्रोरुगेटेड फायबर बॉक्सचा वापर फुले जास्त अंतरावर पोचवण्यासाठी केला जातो. विविध आकारात लांबी-रुंदीचे बॉक्सेस बाजारात उपलब्ध आहेत, त्यानुसार व फुलांच्या प्रकाराप्रमाणे त्याची योग्य निवड करावी. ही पूर्ण प्रक्रिया वातानुकूलित क्षेत्रात करणे फायद्याचे असते

फुलांची प्रतवारी करण्यासाठीचे मुद्दे

  1. दांड्याची लांबी : समान लांबीच्या फुलदांड्याचे प्रतवारी करावे. प्रत्येक प्रतीमध्ये १o सेंमी. लांबीचा फरक असावा.
  2. दांड्याची क्षमता : दांडा भक्रम, ताट व रसरशीत असावा. दांडयाअंगी फुलांचे वजन पेलण्याची क्षमता असावी.
  3. दिखाऊपणा : दांड्यावरील प्रत्येक पान व फुल दिखाऊ असावे दांडीवर असलेले फुल/ फुले सर्व बाजूला समान पद्धतीने विखुरलेली असावीत.
  4. फुलांची संख्या : स्टँडर्ड प्रकारात प्रत्येक दांडीवर एकच फुल असते तर स्प्रे प्रकारातील फुलदांड्यावर एकापेक्षा जास्त फुले असतात. फुलांची संख्या कमी व जास्त कळ्या असतात.
  5. रोगमुक्तता : फुले व फुलदांडे निरोगी असावेत. फुले/ फुलदांड्यावर कोणत्याही प्रकारच्या रोग व किडीच्या प्रादुर्भावाच्या खुणा नसाव्यात तसेच पाने स्वच्छ व चकचकीत असावीत
  6. वजन : काही फुले वजनावर विकली जातात. अशा फुलांची प्रतवारी वजनानुसार करतात.
  7. रंग : प्रतवारी करताना फुलांचा रंग लक्षात घ्यावा. फुले/ दांडे यांची रंगानुसार प्रतवारी करावी.
सांकेतिक क्रमांक दांड्याची लांबी (से.मी.)
५-१०
१५ १५-२०
२० २०-३०
३० ३०-४०
४० ४०-५०
५० ५०-६०
८० ८०-१००
१०० १००-१२०
१२० १२० पेक्षा जास्त

कार्नेशन

प्रत फुलांचा व्यास (मी.मी.) दांड्याची लांबी (से.मी.)
निळा/मोहक ७.५ ५५
लाल/आदर्श ५.६ ४३
हिरवा / लहान ५० पेक्षा कमी ३०

ग्लॅडीओलस

अ.क्र. प्रत फुलदांड्याची लांबी (से.मी.) कमीतकमी फुलदांड्यावरील फुलांची संख्या
मोहक /फॅन्सी ग्रेड ए १०७ पेक्षा लांब १६
विशेष /स्पेशल (ग्रेड बी) ९६-१०७ १४
आदर्श /स्टॅडड(ग्रेड सी) ८१-९६ १२
उपयुक्तता /युटीलिटी (ग्रेड डी) ८१ १०
प्रतवारी फुलांचा व्यास (से..मी.) कमीतकमी लांबी (से.मी.)
ब्लू/फॅन्सी १४ ७६
रेड/स्पेशल १२.१ ७६
ग्रीन / शॉर्ट १०.२ ६१

वाहतूक व साठवण

फुले अत्यंत नाशवंत प्रकारात मोडली जातात, त्यामुळे त्यांची योग्य हाताळणी करावी लागते. काढणीनंतर फुलांचा/ फुलदांड्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी तापमान व्यवस्थापनेला अनन्यसाधारण महत्व आहे. काढणीनंतर ताबडतोब फुले/ फुलदंडे थंड करावेत. त्यामुळे फुलदांड्यातील ’फिल्ड हिट म्हणजे वनस्पतीच्या शरीरांतर्गात वाढवलेले तापमान.

सततच्या श्वसनामुळे शरीरात तापमान वाढते त्यामुळे शरिरांतर्गत साठवलेल्या अन्नाचे ज्वलन होते आणि पाण्याचे बाष्पीभवनही होते. परिणामी साठवलेल्या अन्न आणि पाण्याचा नाश होतो. या सर्व चयापचयाच्या क्रियांना विरोध करण्यासाठी अथवा त्यांचा वेग मंद करण्यासाठी काढणीनंतर शेतमालाचे अंतर्गत तापमान कमी करण्यासाठी साठवणुकपुर्व हा माल थंड श्वसन कमी होते. शिवाय अन्न व पाण्याचा नाश कमी होतो. अनावश्यक वाढ मंदावते. एका प्रयोगाअंती असे आढळून आले की, २० अंश सें. तापमानाला ठेवलेल्या गुलाब व कानेंशनच्या फुलदांड्याचे श्वसन ० अंश सें. तापमानास ठेवलेल्या फुलदांड्यापेक्षा २० पटीने कमी झाल्याचे आढळून म्हणून बहुतांश फुले/ फुलदांड्याचे काढणीनंतरचे शरिरांर्तगत तापमान कमी करण्यासाठी त्यांचे पॅकिंग करून अथवा सुटी फुले/फुलदांडे थंड तापमानात ठेवतात. फिल्ड हिट कमी करण्यासाठी साधारणतः फुले/ फुलदांडे ६-१o तास कुलिंग चेंबरमध्ये ठेवतात. प्रिकुलिंगसाठी लागणारे तापमान हे प्रत्येक फुलांचा प्रकार व जात यानुसार असते.

अ. क्र.फुलपीक प्रीकुलिंग तापमान (अंश से.ग्रे.)
गुलाब १-३
अन्ठूरीअम १३
जरबेरा
डेन्डोबियम ५-७
कार्नेशन ०.५-१
शेवंती ०.५-४
सिम्बीडीयम ०.५-४
ग्लॅडीओलस ४-५
बर्ड ऑफ पॉरोडाइज ७-८

फुलांचा नियमित पुरवठा करण्याच्या दृष्टीने त्यांची योग्य पद्धतीने साठवणूक करणे फार महत्वाचे असते. फुलांच्या तुटवड्याच्या काळात तसेच ज्यावेळी उत्पादन भरपूर होते तेव्हा साठवणूक करून दर वाढल्यानंतर साठवलेला माल बाजारात विक्रीसाठी आणता येतो. हा फायदा साठवणुकीमुळे होतो. फुले साठवणुकीवर जी फुले/ फुलदांडे साठवून ठेवावयाची आहेत त्यांचा दर्जा, काढणीची वेळ, लक्षणे, तापमान, आद्रता, रोग व किडीचे प्रमाण, मालाला झालेली इजा अथवा दुखापत इ. घटक परिणाम करत असतात. फुले नेहमी कमी तापमानाला साठवून ठेवली जातात. त्यामुळे साठवणुकीदरम्यान साठवणुकीचे तापमान व आद्रता व्यवस्थापन करणे महत्वाचे असते. साठवणुकीदरम्यानचे तापमान व आद्रता हे दोन घटक फुलांच्या काढणीत्तोर आयुष्यमानावर परिणाम करतात. त्यासाठी साठवणुकीच्या तापमानात बदल न होता ते स्थिर असणे गरजेचे असते. तसेच कोल्डरूममध्ये सतत जास्तीतजास्त (९o-९५ टके) आर्द्रता असायला हवी. जर आर्द्रता कमी झाली तर फुले सुकतात तसेच नेहमी साठवणूकीसाठीचे शीतगृहे स्वच्छ ठेवणे गरजेचे असते अन्यथा रोगांचा फैलाव होऊन शीतगृहातील फुले लवकर नाश पावतात. साधारणपणे फुलांच्या साठवणुकीसाठी ९० ते ९५ टक्के आर्द्रता लागतेच. परंतु फुलांच्या प्रकारानुसार लागणारे तापमान व साठवणुकीचा काळही भिन्न असतो. तो खालील तक्त्यामध्ये दिला आहे.

साठवणुकीची पद्धत फुलपीक साठवणुकीचे तापमान ( अंश.से.ग्रे.) साठवनुकीचा काळ (दिवस)
सुकी पद्धत कार्नेशन ०-१ १६-२४
शेवंती ०.५-१ २१
जरबेरा 2.०
ग्लॅडीओलस ४-५ ५-७
गुलाब ०.५-२
ओली पद्धत अनथूरीयम १३ १४-२८
कार्नेशन ०.५-२ २१-२८
डेन्ड्रोबियम ५-७ १०-१४
जरबेरा ४-७
ग्लॅडीओलस ४-५ ५-७
निशिगंध ७-१० ३-५
गुलाब २-३ ५-७

आशिया) बाजारपेठाच्या जवळ आहे शिवाय निसर्गातच भारतामधील हिवाळा सौम्य आहे. युरोपीन देशामधील हिवाळ्याइतका तो तीव्र नसतो. त्यामुळे अतिशय उत्तम आल्हाददायक वातावरणात उच्चदर्जाच्या फुलांचे उत्पादन घेऊन फुलांची निर्यात करण्यास मोठा वाव मिळतो कारण युरोपमध्ये हिवाळी हंगामातच तेथील महत्वाचे सण व उत्सव साजरे करतात. अशावेळी युरोपातून फुलांना खूप मागणी असते. सध्या युरोपमध्ये मंदीचे वातावरण आहे. तसेच अति थंडीमध्ये वाढणारा उत्पादन खर्च व मजुरांच्या वाढलेल्या समस्या यामुळे बरेच युरोपिअन देश फुलांचे उत्पादन न करता दुस-या देशातून आयात करत आहेत.

भारतात असलेली वातावरणाची विविधता आणि आधुनिक पद्धतीने केलेली शेती ही एक जमेची बाजू आहे आणि त्याचमुळे भारतातून मोठ्या प्रमाणावर फुले उत्पादन करू शकतो व युरोपियन देशांची गरज भागविण्याचे सामथ्र्य त्यामध्ये आहे. फुलांची वाढती मागणी पुरवण्याची क्षमता भारत देशात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतासारखेच काहीचे हवामान असणा-या नेदरलँन्ड, जपान व इस्राईल देशामधील मजुरांपेक्षा भारतातील मजूर १० ते १५ टक्के स्वस्त आहेत. शिवाय, भारतामध्ये ते सहज उपलब्ध होतात. शेतक-यांचे हित लक्षात घेऊन या गोष्टींचा फायदा उठवण्यासाठी भारत सरकारनेसुद्धा फुलांच्या निर्यातीसाठी काही सोयी व सुविधा पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. भारत गॅट करारामध्ये सहभागी झाल्यापासून युरोपियन देशांनी फुले व फुलांचे उत्पादने यांच्यावरील आयातकर जवळजवळ १५ टक्क्यांनी कमी केला आहे.

फुलांचा आंतरराष्ट्रीय बाजार

फुलांचे आंतरराष्ट्रीय बाजार ८ ते १० टक्क्यांनी प्रतिवर्षी वाढत असून फुलांची जागतिक स्थरावरील वार्षिक मागणी ही १०० अब्ज वाढत आहे. दैनंदिन जीवनात जागतिक फुलांचा उपयोग २० टक्क्यांनी उपयोग वाढत आहे. त्यामुळे भारतातील फुलउत्पादकांना भरपूर व दर्जेदार फुलांच्या उत्पादनाचे आव्हान पेलवे लागणार आहे. भविष्यातील फुलोत्पादनाचे आव्हान पेलण्यासाठी भारत सरकारमार्फत फुलोत्पादनाचा उद्योग वाढावा म्हणून मुंबई, पुणे, बंगलोर, दिली, कोलकता, चेन्नई, हैद्राबाद, नागपूर इ. मोठ्या सर्व जातीधर्माच्या लोकांची वसाहत असलेल्या मोठ्या शहरांच्या सभोवार हा उद्योग वाढावा म्हणून उद्योजक शेतक-यांना मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अपेडासारख्या सरकारी संस्था फुले व फुलांची उत्पादने निर्यात करण्याच्या व्यवसायिकांच्या व्यवसायवृद्धीसाठी आर्थिकसाह्य करत आहेत. त्याचबरोबर उच्च तांत्रिक फुलोत्पादन व्यवसायात पडू पाहणा-या नव तरुण शेतक-यांना बँकाची सहज व सुलभ पद्धतीने आर्थिक मदत करण्याची उद्दिष्ट्ये ठरलेली आहेत. या गोष्टींचा फायदा घेऊन पुणे, हैद्राबाद, बंगलोर, दिली, गुरगाव, म्हैसूर, लोणावळा, इ. ठिकाणी १o0 टक्के निर्यातक्षम उत्पादन घेणारी अनेक हरितगृहे शेतक-यांनी व उद्योजकांनी उभारली आहेत.

१०० टक्के निर्यातक्षम फुलोत्पादन करणा-या या संस्थांना सरकारकडून सुध्दा ५० टक्क्यापर्यंतचे अनुदान हरितगृहातील पुष्प उत्पादनांसाठी दिले जात आहे, शिवाय अशा उत्पादनातून निघणा-या मालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असेल तर ५0 टक्के माल स्थानिक बाजारामध्ये विकण्याची सवलतही या संस्थांसाठी आहे. निर्यातक्षम फुलोत्पादनाचा उद्योग भारतात वाढावा म्हणून भारत सरकारने उद्योग उभारणीसाठी लागणा-या कच्च्या मालावरील १o टक्के करसवलत दिली आहेत. तसे आयात/निर्यातीवरील या उद्योगाशी निगडीत असलेले नियमही शिथिल केले आहेत. यामुळे भारतात हरितगृहातील फुलशेती हा उद्योग सध्या नावारुपाला आला आहे. याची कारणेही अनेक आहेत. एक म्हणजे भारताच्या जवळ सिंगापूसारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. भारताचे हवामान या उद्योगाला अत्यंत पोषक आहे. कारण भारताच्या वातावरणात भरपूर सूर्यप्रकाश असून येथील हिवाळा अतिशय कृत्रिम प्रकाश व तापमान याची भारतातील हरितगृहांना गरज पडत नाही तो त्यांना योग्य प्रमाणात नैसर्गिकरीत्या वर्षभर उपलब्ध होतो. त्यामुळे साहजिकच फुले व फुलोत्पादनांच्या निर्यातीमुळे देशाला २० ते २५ टक्के जास्त परकीय चलन इतर शेती उत्पादनाच्या तुलनेत मिळते. तसेच प्रति हेक्टर उत्पादनही इतर पिकांच्या तुलनेत फुलशेतीपासून जास्तच मिळते.

फुलांच्या निर्यातीत असलेला वाव व फायदे लक्षात घेऊन अपेडा या संस्थेने भारतात नोयडा, बंगलोर, मुंबई या ठिकाणी फुलांचे लिलाव केंद्र स्थापन केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक केंद्र पुणे येथेसुद्धा लवकरच स्थापन होत आहे. याशिवाय भारतातील पुष्प उद्योजकांना फुले निर्यातीस प्रोत्साहित करण्यासाठी 'आल्समेर' (नेदरलँन्ड) येथे फुलांचे बाजारकेंद्र उपलब्ध आहे. मानवी जीवनातील फुलांचे महत्व व फुलोत्पादनात असलेला वाव लक्षात घेऊन भारत सरकारनेही देशातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून व फुलपिकांवर संशोधन करून त्याचा विकास करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रादेशिक विभाग पाडले आहेत.

अशा प्रकारे फुलशेतीस असलेले महत्व विचारात घेऊन शेतकरी बंधूनी उच्चतंत्रज्ञानावर आधारित फुलशेती करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा निश्चित प्रयत्न करावा .

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 7/12/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate